प्रस्तावना:
आजोबा हे आपल्या कुटुंबातील सर्वात मोठे सदस्य आणि आपल्यासाठी आदर्श पात्र असतात. घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांचे म्हणणे ऐकतो आणि त्यांचा आदर देखील करतात. तसेच आजोबा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर प्रसन्न अशी मूर्ती समोर येते.
माझे आजोबा
माझ्या आजोबांचे नाव मनोहर लेले असे आहे. त्यांचे वय ६० वर्ष आहे. आम्ही सगळी नातवंडे त्यांना आबा म्हणून हाक मारतो. माझे आजोबा रोज सकाळी सगळ्यांच्या आधी उठतात आणि मॉर्निंग वॉक कारण्यासाठी जातात.
तेथून आल्यावर ते आयुर्वेदिक चहा घेतात. चहा सोबत त्यांना नाश्त्याला फक्त मरीची बिस्किटे लागतात. त्यानंतर ते अंघोळ करतात. अंघोळ करून झाल्यावर देवाची पूजा करतात. पूजा करताना सर्वप्रथम गणपतीपुढे उदबत्ती लावतात आणि प्रार्थना करतात.
ते इतकी सुंदर पूजा करतात आणि फुलांची अत्यंत सुंदर प्रकारे रचना करतात. त्यामुळे संपूर्ण घर हे प्रसन्न वाटतं. माझे आजोबा श्लोक आणि आरत्या म्हणतात.
ताज्या भाज्या
माझे आजोबा मला दररोज स्कुटरवरून शाळेत सोडायला येतात आणि थोड्या अंतरावर भाजी आणायला जातात. आईला रोज ताजी भाजी आणून दिली की, आई खुश होते. माझ्या आजोबाना भाजी नीट निवडून आणायला आवडते.
त्याच बरोबर माझे आजोबा मला सांगतात की, हवामानातील सर्व भाज्या खायला आवडतात. ते सांगतात की, हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि कोथिंबीर नेहमी खाल्ल्या पाहिजेत. हिरव्या भाज्या खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते. तसेच आपले आरोग्य सुद्धा निरोगी बनते.
रुबाबदार
माझे आजोबा सर्व हिरव्या भाज्या खातात. म्हणून त्यांची तब्बेत आज सुद्धा ठणठणीत आहे. तसेच ते खूप रुबाबदार दिसतात.
माझ्या आजोबांची उंची ६ फूट, सडसडीत बांधा, चष्मा, बारीक मिशी यामुळे ते रुबाबदार दिसतात. ते आपल्या खणखणीत आवाजात बोलायला लागले की, घरातील सर्वजण शांत होतात.
खेळाची आवड
माझ्या आजोबांना खेळ खूप आवडतात. आम्हा नातवंडांसोबत आजोबा बॅडमिंटन, क्रिकेट आणि बुद्धिबळ हे खेळ खेळतात.
तसेच ते कधी – कधी आपल्या मित्रांसोबत पत्ते सुद्धा खेळतात. बुद्धिबळ या खेळात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही.
लोकांना सल्ला आणि मदत
माझ्या आजोबांची विशेषता म्हणजे – अडचणीत असणाऱ्या सर्व लोकांना मदत करण्यास नेहमी पुढे असतात. आमच्या घरी सकाळपासून – रात्रीपर्यंत माणसांची ये – जा असते.
कोणत्याही व्यक्तीला कुठलीही अडचण असली तरी ते सल्ला घेण्यासाठी माझ्या आजोबांकडे येतात. फक्त गावातलाच लोक नाही तर इतर ठिकाणचे लोक सुद्धा माझ्या आजोबांकडे सल्ला घ्यायला येतात.
त्या सर्वानाच बोलणे ते शांतपणे ऐकून घेतात आणि जर कोणाला पैशांची आवश्यकता असेल तर त्यांना मदत करतात. जर कोणाला मदत हवी असेल तर त्यांचे ओळख – संबंध वापरून सहायता करतात.
शिक्षण आणि वाचन
माझ्या आजोबांनी ४० वर्ष सेवा करून झल्यावर ते आता सरकारी नोकरीतून सेवा निवृत्त झाले आहेत. अजूनही त्यांचा मित्र परिवार मैत्री टिकवून आहे. त्यामध्ये आता सध्याच्या काळात नोकरीला लागलेले तरुण लोक सुद्धा आहेत.
माझ्या आजोबांना बोलायला खूप आवडते. त्यांचे शिक्षण आणि वाचन अधिक असल्या कारणामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत कोणाशीही कोणत्याही विषयावर बोलू शकतात.
माझे आजोबा जर का रागावले तर त्यांचा चेहरा पाहून भीती वाटते. आमच्या बागेतील फुले एक माणूस गपचूप तोडत होता.
तेव्हा तो माणूस त्यांना दिसला आणि ते जोरजोराने ओरडू लागले की, कोण आहे तिकडे. हे शब्द ऐकताच तो उभा होत्या त्या ठिकाणीच शांत उभा राहिला. त्यानंतर माझ्या आजोबांनी त्याला विचारले की, तू फुल का तोडत होतास.
तेव्हा तो माणूस काही बोलला नाही. त्यांनी सांगितले की, कधी माणसाने चोरी करू नये आणि जर कोणतीही वस्तू हवी असेल तर सांगून न्यावी.
निष्कर्ष:
माझे आजोबा हे खूप प्रेमळ व्यक्ती आहेत. माझे आजोबा हे माझ्यासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. मला माझे आजोबा खूप – खूप आवडतात.