प्रस्तावना:
ज्या प्रमाणे आपल्या जीवनात आई – वडिलांचे स्थान असते. त्याच प्रमाणे आजी – आजोबा हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. कारण आजी – आजोबांसोबत राहणे ही एक मजेदार भावना आहे.
आजी – आजोबा हे केवलाच ज्ञानाचे मोतीच नसतात तर प्रेम आणि काळजीने आपले जीवन आनंदाने भरण्याचे कार्य करतात. आजी – आजोबानी दिलेले प्रेम आणि आपुलकी यांचा कोणताच मेळ नाही. आजी – आजोबा आणि नातवंड यांचा विशेष संबंध असतो.
माझे आजोबा
माझे आजोबा हे कुटुंबातील सर्वात मोठे सदस्य आणि एक आदर्श आहेत. माझ्या आजोबांचे नाव प्रकाश असे आहे. त्यांचे वय ६० वर्ष आहे. माझे आजोबा हे एक सभ्य माणूस आहेत. तसेच ते सकाळी सगळ्यांच्या आधी उठतात. तसेच ते आपली रोजची कामे करायला सुरुवात करतात.
सगळे लोक त्यांचा खूप आदर करतात. तसेच घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांचे ऐकतो. तसेच त्यांच्याकडून सल्ला सुद्धा घेतात. माझे आजोबा हे सरकारी शाळेत एक शिक्षक होते. कधी – कधी त्यांचे शिष्य हे त्यांना भेटण्यासाठी आमच्या घरी येतात.
तसेच माझे आजोबा मला शाळेत घेऊन जातात. शाळेत जाताना मी त्यांच्या नेहमी पाया पडतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. जेव्हा मी शाळेतून घरी येतो तेव्हा आम्ही दोघे मिळून जेवतो.
माझे आजोबा रात्री झोपताना मला सुंदर – सुंदर गोष्टी सांगतात. माझे आजोबा नेहमी गरज असलेल्या किंवा गरीब लोकांना नेहमी मदत करतात. मी रोज माझ्या आजोबांबरोबर बाजारात भाजी आणायला जातो.
देवाची पूजा
आमच्या घरामध्ये एक मंदिर आहे. त्या मंदिरात माझे आजोबा दररोज सकाळी देवाची पूजा करतात आणि पूजा करून झाल्यावर ते गावातील मंदिरात जातात.
कधी – कधी ते आपल्या सोबत मला सुद्धा घेऊन जातात. मंदिरात गेल्यावर खूप छान वाटत. कारण तेथील वातावरण हे शांत असत.
माझे आजोबा जेव्हा माझा वाढदिवस असतो तेव्हा माझ्यासाठी सुंदर कपडे घेऊन येतात. तसेच ते माझ्यासाठी चॉकलेट आणि मिठाई सुद्धा आणतात.
प्रामाणिक व्यक्ती
माझे आजोबा मला नेहमी सांगतात की, मोठ्या लोकांचा आदर केला पाहिजे आणि त्यांची प्रत्येक शब्द पाळला पाहिजे. माझे आजोबा हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत.
ते भ्रष्टाचार आणि बेईमानी पासून दूर राहतात. ते मला सांगतात की, आपल्या जीवनात नेहमी प्रामाणिकपणाने वागले पाहिजे आणि प्रामाणिक पणाने पैसे कमावले पाहिजेत.
माझे आजोबा मला सत्याच्या मागार्वर चालायला सांगतात. तसेच ते मला सत्याच्या मार्गावर चालण्याचा मार्ग दाखवितात.
वाचनाची आवड
माझ्या आजोबांना पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचायची खूप आवड आहे. तसेच त्यांनी घराच्या एका खोलीमध्ये एक ग्रंथालय बनून ठेवले आहे. तिथे विविध प्रकारची पुस्तके आहेत.
माझे आजोबा नेहमी पुस्तके वाचत असतात. तसेच ते मला सुद्धा पुस्तके वाचण्यास सांगतात. ते म्हणतात की पुस्तके वाचल्याने आपल्याला अन्य विषयांचे ज्ञान मिळते.
निष्कर्ष:
माझे आजोबा हे एक खूप प्रेमळ आणि दयाळू व्यक्ती आहेत. आम्ही नेहमीच आमच्या आजोबांचा आदर करतो. ते माझ्यासाठी एक प्रेरणा स्रोत आहेत. मी माझ्या आजोबांवर खूप प्रेम करतो आणि मला माझे आजोबा खूप – खूप आवडतात.