प्रसिद्ध साहित्यिक munshi

माझे आवडते लेखक – मुंशी प्रेमचंद मराठी निबंध – वाचा येथे My Favourite Writer Essay in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपला भारत देश हा महान पुरुषांचा देश आहे. या देशामध्ये काहींनी महान पुरुषांनी देशासाठी कार्य केले, तर काहींनी समाज कार्य केले, तर काहींनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून गरीब लोकांच्या जीवनाचे चित्रण केले आहे.

त्या सर्वांपैकी मुंशी प्रेमचंद हे एक होते ज्यांनी हिंदी साहित्याच्या आपले महत्तवपूर्ण योगदान दिले आहे. प्रत्येक कलाकाराचे आणि लेखकाचे स्वतःचे विशेष महत्व असते. पण मुंशी प्रेमचंद यांसारखे प्रसिद्ध लेखक आपल्या भारत देशाला लाभले होते.

मुंशी प्रेमचंद हे माझे आवडते लेखक आहेत. हे त्यांच्या हिंदी साहित्यासाठी ओळखले जातात. तसेच त्यांना ‘कादंबरी सम्राट’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. मुंशी प्रेमचंद हे हिंदी सुधारक आणि समाज सुधारक सुद्धा होते.

जन्म

मुंशी प्रेमचंद 1

मुंशी प्रेमचंद यांचा जन्म ३१ जुलै, १८८० साली वाराणसी येथील लमही गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ‘मुंशी अजयब लाल’ आणि आईचे नाव ‘आनंदी देवी’ असे होते.

त्यांनी आपले बालपण आपल्या गावीच घालविले. त्यांच्या बालपणीच त्यांचा आईचे निधन झाले. म्हणून त्यांचे बालपण हे कठीण परिस्थिती गेले.

शिक्षण आणि जीवन

मुंशी प्रेमचंद साहित्यिक रचना

मुंशी प्रेमचंद यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण घरीच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दारिद्र्यावर लढा देत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. ते वाराणसीत शिक्षण घेण्यासाठी अनवाणी पायाने चालत जात असत.

तरीही मुंशी प्रेमचंद यांनी आपल्या जीवनात कधी हार नाही मानली. त्यांना वाचनाची खूप आवड होती. तसेच त्यांना एक वकील बनायचे होते. परंतु गरिबीमुळे त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले.

जीवन परिचय

मुंशी प्रेमचंद

मुंशी प्रेमचंद हे शाळेत अनवाणी चालत जाण्याच्या त्रासामुळे ते एक वकिलांकडे गेले आणि त्यांनी तिथे ट्युशन घ्यायला सुरुवात केली.

तसेच ते त्यांच्या घरात खोली घेऊन राहायला लागले. मुंशी प्रेमचंद यांना मुलांना शिकविण्यासाठी पाच रुपये मिळत असत. त्यातून ३ रुपयांमध्ये ते घराचा खर्च भागवत असत आणि २ रुपयात आपल्या जीवनाची गाडी चालवत असत. त्यांनी अशा परिस्थिती एक महिना आपले जीवन व्यतीत केले.

त्यानंतर ते अलाहाबाद येथील विद्यापीठात गेले. तेथे जाऊन त्यांनी इंग्रजी साहित्य, पर्शियन आणि इतिहास या विषयात द्वितीय श्रेणी मिळविली.

प्रिय लेखक किंवा साहित्यिक

Munshi Premchand

मुंशी प्रेमचंद हे एक प्रसिद्ध साहित्यिक आणि लेखक होते. त्यांनी बऱ्याच उच्च प्रतीच्या कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी शंभराहून अधिक कथा लिहिल्या आणि हिंदी साहित्य समृद्ध केले.

त्याच्या या कादंबऱ्यांमध्ये ‘कर्मभूमी’ आणि ‘सेवा सदन’ या दोन प्रमुख कादंबऱ्या आहेत. तसेच त्यांचं सर्व कथांचा संग्रह हा ‘मानसरोवर’ च्या आठव्या भागात सर्वात प्रसिद्ध आहे.

साहित्यातील कामगिरी

पुरस्कार प्रदानमुंशी प्रेमचंद यांना आदर्शवादी आणि यथार्थवादी म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या साहित्यात प्रेमचंद हे नाव बऱ्याच वर्षानंतर स्वीकारले.

त्यांनी आपल्या साहित्यामध्ये सामान्य लोकांच्या भावना, परिस्थिती आणि त्यांच्या समस्यांचे वर्णन केले आहे. तसेच मुंशी प्रेमचंद हे आपल्या कथांमधून मानवी स्वभावाच्या मूलभूत गोष्टींचे मह्त्व सांगतात.

पुरस्काराने सन्मानित

मुंशी प्रेमचंद पुरस्कार से सम्मानितमुंशी प्रेमचंद यांनी गोरखपूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत होते त्या ठिकाणी त्यांनी ‘प्रेमचंद साहित्य संस्थानाची’ स्थापना केली.

त्यानंतर त्यांच्या पत्नी शिवरानी देवी यांनी ‘प्रेमचंद घर’ या नावाने एक चरित्र लिहिले. तसेच त्यांच्या मुलाने सुद्धा कलेचा शिपाई या नावाने वडिलांची जीवन कथा लिहिली.

त्यांची सर्व पुस्तके हि उर्दू आणि इंग्रजी भाषेमध्ये रूपांतरित झाली आहेत. त्याच बरोबर त्यांच्या कथा चीन, रशिया आणि परदेशी देशांमध्ये सुद्धा लोकप्रिय झाल्या.

निष्कर्ष:

मुंशी प्रेमचंद यांनी अप्रतिम कलाकृती लिहिल्या. त्यामुळे या जगामध्ये आजपर्यंत त्यांच्यासारखा कोणी झाला आहे ना कोणी होणार आहे.

त्यांच्या साहित्याला सर्वात मोठे मूल्य आहे. मुन्शी प्रेमचंद यांचे साहित्य आपल्या भारतीय समाजात आरसा मानले जाते. म्हणून हे माझे सर्वात आवडते लेखक आहेत.

Leave a Comment