प्रस्तावना:
आपल्या भारत देशावर ब्रिटिश सरकारने अनेक वर्षे राज्य केले. म्हणून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घराचा त्याग केला आणि आपल्या प्राणांची आहुती दिली.
अशा सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांपैकी महात्मा गांधी हे एक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अर्पण केले. आपल्या भारत देशातील प्रत्येक व्यक्ती आणि मूल ही बापू आणि राष्ट्रपिता या नावाने ओळखतात.
जन्म
आपल्या भारत देशाला अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देणारे तसेच भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ साली गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला.
त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांच्या वडिलांनाच नाव करमचंद गांधी हे राजकोटचे दिवाण होते आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते.
शिक्षण
महात्मा गांधीजींनी आपले प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे पूर्ण केले. ते सन १८८८ स्लो कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे जाऊन त्यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली.
सन १८९१ साली भारत देशात परतल्यानंतर त्यांनी आपल्या वकिलाला सुरुवात केली. परंतु महात्मा गांधी यांच्या जीवनात एकदा असे एक वळण आले की त्यांना दक्षिण आफ्रिकेला जावे लागले. तेथे जाऊन वकिली करू लागले.
त्यांनी तिथे पाहिले तर ब्रिटिश लोक भारतीयांवर अन्याय आणि अत्याचार करत असत. म्हणून त्यांनी भारतीय लोकांना मदत करण्याचे ठरविले आणि त्यांनी सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली.
महात्मा गांधीजींनी आपल्या भारत देशाला आजादी मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलने आणि सत्याग्रह केलेत. जसे कि सर्वात प्रथम त्यांनी चंपारण्य खेड सत्याग्रह , दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन इ.
चंपारण्य आणि खेड सत्याग्रह
सन १९१७ मध्ये चंपारण्य येथील शेतकऱ्यांना नीळ लागवड केली. परंतु ब्रिटिश सरकार त्यांना कोणत्याही शेत मालाची किंमत देत नसत.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी त्या विरोधात अहिंसक चळवळ सुरु केली. या आंदोलनामुळे ब्रिटिश लोकांना भारतीयांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. म्हणीन या आंदोलनाला चंपारण्य आंदोलन म्हणून ओळखले जाते.
खेडा सत्याग्रह
सन १९१८ मध्ये गुजरातमधील खेडा गावात भीषण पूर आला होता. ज्यामुळे संपूर्ण खेडा गावात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
तेथील लोकांच्या एवढी गंभीर समस्या असून सुद्धा ब्रिटिश लोक त्यांना कोणतीच सूट देत नाही होते. तसेच त्यांना मदत करण्यास सुद्धा तयार नव्हते.
म्हणून गांधीजींनी त्या विरोधात अहिंसक चळवळ सुरु केली आणि ब्रिटिशाना भारतीयांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. तसेच ब्रिटिश लोक कर माफी देण्यास तयार झाले. ही चळवळ खेडा सत्याग्रह म्हणून ओळखली जाते.
भारत छोडो आंदोलन
महात्मा गांधीजींनी ब्रिटिश लोकांना भारत सोडून जाण्यासाठी ८ ऑगस्ट, १९४२ साली भारत छोडो आंदोलन सुरु केले. महात्मा गांधीजींनी ब्रिटिशाना भारत बाहेर जाण्यासाठी अहिंसेचा उत्तम मार्ग आहे.
म्हणून त्यांनी दुसरे महायुद्ध सुरु असताना ही चळवळ सुरु केली. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटिशांची परिस्थिती बिकट होत चालली होती. महात्मा गांधीजींच्या अनेक आंदोलनामुळे भारत देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.
निष्कर्ष:
महात्मा गांधीजींनी कोणत्याही शस्त्राचा वापर न करता अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
परंतु त्यांच्या कार्यामुळे देशाला मिळालेले स्वातंत्र्य जास्त दिवस नाही पाहू शकले. परंतु त्यांच्याच एका हिंदू कार्यकर्त्याने ३० जानेवारी, १९४८ साली गोळ्या मारून त्यांची हत्या केली.
म्हणून महात्मा गांधी असे एक महान नेते होते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या मातृभूमीसाठी अर्पण केले. महात्मा गांधीजींच्या संघर्षामुळे भारत आज सोनियाचा दिवस पाहू शकला.