प्रस्तावना:
या रोजच्या व्यस्त जीवनामध्ये माणसाला काही करमणूक हवी असते. प्रत्येक व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असतात. काही डॉक्टरांच्या मते आणि मानस शास्त्रांच्या मते मानुह्स्यच्या जीवनातले ताण – तणाव आणि अन्य आजारांना सामोरे जाण्यापेक्ष्या एखाद्या छंदात रमले तर भरपूर फायदा होतो.
प्रत्येक व्यक्तीचा आपला – आपला आवडता छंद असतो. कोणाला गायनाचा, कोणाला खेळण्याच्या, कोणाला वस्तू जमा करण्याचा, कोणाला फोटोग्राफीचा असे वेगवेगळे छंद असतात. त्याचप्रमाणे मला सुद्धा एक छंद आहे तो म्हणजे – भटकंतीचा. मला भटकंती म्हणजेच फिरायला खूप आवडते.
उत्सुकता
पु. ल देशपांडे यांनी आपल्या अपूर्वाई आणि पूर्वरंग यामध्ये त्यांनी देशाबद्दल इतके सुंदर वर्णन केले आहे कि, प्रवासाने एवढा आनंद होतो तेव्हाच हे समजले.
त्यानंतर गो. नी दांडेकर यांच्या ‘कुण्या एकाची भ्रमण गाथा’ वाचल्यावर त्यातून मला हे समजले कि, हा देश किती वैविध्यपूर्ण आहे आणि तो विविधतेने नटलेला आहे. म्हणूनच मी भटकंतीचा निर्णय घेतला. तसेच मला मिलिंद गुणाजीच्या भटकंती या लेखातून प्रेरणा मिळाली.
भटकंती सुरुवात
माझ्या सारख्याच काही मुला – मुलींचा गट करून आम्ही किल्ले, गड यांची भटकंती करण्यास सुरुवात केली. आणि त्यामध्ये मला निसर्गाचा अनमोल खजिना सापडला. आम्ही सगळे सुट्टीच्या दिवशी आमच्या आसपासच्या जवळचे डोंगर, गड, किल्ले येथे सहलीला जायला सुरुवात केली.
त्याचबरोबर आम्ही आमच्या सोबत काही सामान घ्यायचो. एवढ्याश्या छोट्या घोष्टीवर आम्ही आमचा छंद जोपासायला सुरुवात केली. त्याच बरोबर आमची तब्येत सुद्धा सुधरू लागली.
भटकंतीचा छंद का
आम्हाला दुसरा कुठलाही छंद फक्त मानसिक विरंगुळा देतो. तो फक्त एकट्या व्यक्तीलाच आनंद देतो. या भटकंतील मला कितीतरी जीवाभावाचे मित्र – मैत्रिणी मिळाले. आम्हाला निसर्गाचा खजिना पाहायला मिळाला. माझे या निसर्गावरचे प्रेम वाढू लागले.
खरच या निसर्गाची किमया किती अधिक आहे. हा निसर्ग सगळ्यांच्या मनाला किती प्रसन्न करतो. या निसर्गाची विभिन्न रूप मनात साठून ठेवावीशी वाटतात. जसे कि कोणाच्याही सोबती शिवाय समुद्राची लहर, महापुराच्या पाण्याचा गंभीर आवाज, या धर्तीवर पडणार्या धबधब्याचा रौद्र नाद जसे वाटते कि रुद्र तांडव नृत्य करत आहे.
केदाश्वरातील भीम कुंडातून उसळणाऱ्या पाण्याच्या लोट, गोमुखा मध्ये उगम पावणाऱ्या गंगेचा प्रचंड वेग मंत्रमुग्ध करणारा अशी पाण्याची रूपे तसेच फुलांच्या रंगाची उधळण हे सर्व माझ्या मनाला मोहून जातात. जसा माझ्या मनातील हा एक अनमोल थवा आहे.
फुलांचे मोहक दर्शन
तसेच हिवाळ्यात झाडांची गळणारी पाने आणि त्यांना येणारी तांबूस पानांची आंब्याची पालवी आणि मोहर जीवनाला स्फूर्ती देते.
तसेच श्रावण महिन्यात पारिजातक, जाई – जुई, मोगरा ही सुवासिक फुले रस्त्यावर गालीचा पसरवतात. हे सर्व पाहिल्यावर मनातील राग, लोभ, मत्सर दूर होतात. निसर्गामुळे आपले मन उत्साहित होते.
भटकंतीचा अनुभव
या भटकंतीमुळे मला कितीतरी वेगळे अनुभव बघायला मिळाले. मी दिल्लीच्या प्रवासाला जाताना मला झोप लागत असताना मज डोक घेऊन थोपटणारी पंजाबी बाई म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून पश्चिम बंगाल पर्यंत आई या एकाच नात्याचे प्रतिक वाटली.
तसेच अतिशय उंचावर असलेल्या आणि धुक्यानी वेढलेल्या पर्वतावर बसलेल्या हेमकुंड साहिब गुरुद्वारा जवळच्या इंदिरा तलावाने ऋषी मुनीची आठवण करून दिली. मला कुठल्याही वाहनाने प्रवास कार्याला आवडतो.
मला बसने घाटाचा प्रवास करायला खूप मजा वाटते, कारण खिडकीतून दिसणारे डोंगर, दरीचे नयन रूप मनाला भावून जाते. जर आपण उंचावर असलो तर खाली रस्त्याची नागमोडी वळणे पहालायला मिळतात. कडे – कपारीतून उसळणारे झरे वेगळाच नाद निर्माण करतात.
निष्कर्ष:
या भटकंती मधून या निसर्गाचे सौंदर्य मी कागदात रुपांतर केले नाही परंतु त्याचे वर्णन आणि अमूल्य क्षण मनात साठून ठेवले. माझ्या जीवनातील हा आनंदचा मोठा ठेवा आहे.