holi

मराठीत होळी वर निबंध – वाचा येथे My Favourite Festival Holi Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपला भारत देश हा एक उत्सवांचा देश आहे. या देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येक धर्माचे सण हे वेगवेगळे आहेत. तरीपण या भारत देशामध्ये प्रत्येक सण हा एकसाथ राहून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

त्या सर्व सणांपैकी होळी हा सण हिंदू धर्माचा दुसरा सर्वात मोठा आणि महत्वाचा सण आहे. या सणाला रंगांचा सण म्हणून ओळखले जाते. होळी या सणाला ‘होळी पौर्णिमा’ असे म्हटले जाते. होळी हा सण एक अतिशय पवित्र उत्सव आहे.

होळी सण केव्हा साजरा करतात –

holi 1

आपल्या भारत देशात दरवर्षीं होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी या सणाला सामाजिक, धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे.

होळी हा सण भारत देशाबरोबर उत्तर भारतात सुद्धा अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. होळी हा सण भारत देशाबरोबर नेपाळ, बांगलादेश, अमेरिका ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये सुद्धा सर्वात प्रसिद्ध आहे.

तसेच होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. जाऊदे झुडपे, असह्य उन्हाळा आणि हिवाळा सोसून वसंत ऋतूची वाट पाहत असतात.

वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पाळावी फुटते आणि झाडांची वाढ सुद्धा होते. वसंत ऋतुमध्ये रंगबिरंगी फुले उमलतात आणि वातावरण देखील खूप आल्हादायक असते.

होळी सणाची पौराणिक कथा

holi festival

पूर्वीच्या काळी एक हिरण्य कश्यप नावाचा राजा होता. होलिका ही त्याची बहीण आणि प्रल्हाद त्याचा पुत्र होता. प्रल्हाद हा एक विष्णू भक्त असल्याने तो नेहमी भगवान विष्णूची पूजा करत असे. परंतु हे त्याच्या वडिलांना मान्य नव्हते. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की, तू मला तुझा भगवान समज आणि माझी पूजा कर.

परंतु प्रल्हादाने आपल्या वडिलांचे बोलणे मान्य केले नाही. म्हणून त्याच्या वडिलांनी आणि होलिकाने प्रल्हादला आगीत जाळून मारण्याचा कट रचला. एके दिवशी हिरण्य कश्यप यांनी होलिकाला सांगितले की, तू प्रलहादला घेऊन आगीमध्ये बस.

होलिकेला ईश्वराकडून वरदान मिळाले होते की, तुला आगीपासून कोणताही धोका निर्माण होणार नाही. परंतु या आगीमध्ये होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद विष्णू भक्त असल्यामुळे त्याचे प्राण वाचले. म्हणून होळी या सणाची सुरुवात या दिवसापासून झाली.

होळी दोन दिवसांचा सण

होळी हा सण मुख्यतः दोन दिवसांचा सण आहे.

होलिका दहन

holika dahan

होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. तसेच या दिवसाला छोटी होळी असे म्हटले जाते. या दिवशी लोक होलिका दहन करून पूजा करतात.

रंगपंचमी

holi

तसेच होळीचा दुसरा दिवस हा रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व लोक आपापसातील भांडण विसरून एकमेकांना गुलाल किंवा अबीर लावून होळीच्या शुभेच्छा देतात.

महाराष्ट्रातील होळी

holi mh

महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी काही लाकडे ही मंत्रोच्चारात जाळण्यात येतात. तसेच पेटलेल्या होळीभोवतो बोंबा मारल्या जातात आणि प्रदक्षिणा घातल्या जातात. या दिवशी होळीला पूर्ण पोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. कोकणामध्ये या सणाला ‘शिमगा’ असे म्हटले जाते.

शेती संस्कृतीतील महत्त्व

Holi 1

भारत देशामध्ये शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. या सणाचा पौराणिक इतिहास पाहताच कृष्ण आणि बलराम यांचे नाते दिसून येते.

होळी या सणाच्या निमित्ताने दोन्ही देवतांची पूजा केली जाते. होळीच्या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी प्रार्थना करतात.

तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. तसेच या दिवसामध्ये गव्हाचे पीक तयार होते आणि नवीन पीक अग्नी देवतेला अर्पण करण्याची प्रथा आहे.

निष्कर्ष:

होळी हा सण असत्यावर सत्याचा विजय झाला म्हणून साजरा केला जातो. तसेच होळी हा सण आनंदाचा आणि उत्सवाचा सण आहे.

आपण सर्वानी या सणामागची शिकवण आणि संदेश समजून घ्यायला हवा. तसेच हा सण सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपून ठेवण्यासाठी साजरा केला जातो.

Leave a Comment