प्रस्तावना:
आपला भारत देश हा एक महान आणि विशाल देश आहे. भारत देश आपल्या संस्कृती आणि विविधतेमुळे ओळखला जातो. या भारत देशामध्ये अनेक धर्माचे आणि जातीचे लोक राहतात.
प्रत्येक धर्माचा सण हा वेगवेगळा आहे. परंतु आपल्या भारत देशात साजरे केले जाणारे सर्व सण हे अनेक – धर्माचे आणि जातीचे लोक हे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतात.
सर्व प्रमुख सणांपैकी दिपावली हा एक हिंदू धर्माचा दुसरा प्रमुख आणि महत्वाचाच सण आहे. हा सण संपूर्ण देशात मोठा थाटामाटात साजरा केला जातो.
दिपावली शब्दाचा अर्थ –
दिपावली हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे – दिप + आवली. दिप या शब्दाचा अर्थ होतो दिपक आणि आवली या शब्दाचा अर्थ होतो – पंक्ती किंवा ओळी. दिपावली या शब्दाचा अर्थ होतो – दिव्यांच्या ओळी किंवा पंक्ती.
दिपावली सण केव्हा साजरा केला जातो –
दीपावली हा सण दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण आहे. या सण दरवर्षी भारत देशात हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी सर्व घरे आणि रस्ते दिव्यांनी प्रकाशित केले जातात.
दिपावली का साजरी केली जाते –
दिपावली या सणाच्या दिवशी भगवान श्रीराम, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण हे तिघे १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या अयोध्या नगरीत परत आले होते.
त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व अयोध्या वासियांनी तुपाचे दिपक लावून स्वागत केले होते. हे तिघे ज्या दिवशी परत आले होते ती काळोखाची म्हणजे अंधाराची रात्र होती. त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांनी उजळून टाकले होते.
दिपावली सणाची तयारी
काही लोक हे दिपावलीची तयारी ही काही दिवस अगोदरच सुरु करतात. तसेच घराची आणि दुकानाची साफ – सफाई करतात. काही लोक आपल्या घराला रंगीन करतात आणि अत्यन्त चालल्या प्रकारे घराला सजवतात.
दिवाळीच्या आदल्या दिवशी घरामध्ये विविध पदार्थ बनवले जातात. जसे की, लाडू, करंज्या, चिवडा, चकल्या इ. त्याच बरोबर सगळी माणसे नवीन कपडे खरेदी करतात.
दिपावली हा सण
दिवाळी हा सण पाच दिवसांचा सण आहे. या सणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. अंगणात मुख्य दरवाजासमोर विविध रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात.
असे म्हटले जाते की, हिंदू धर्मात रांगोळीला शुभ मानले जाते. त्याच बरोबर घरात चारही बाजूना तेलाचे दिपक एका रांगेत ठेऊन घर सजवले जाते. दिपावली सणाच्या दरम्यान संपूर्ण उत्सवाचे वातावरण असते.
दिपावलीचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नवीन भांडी खरेदी करणे. तसेच सोन्या – चांदीच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
दिपावलीचा दुसरा हा नरक चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला ‘छोटी दिपावली’ असे म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वाढ केला होता.
दिपावलीचा तिसरा दिवस हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि भगवान गणेश यांची पूजा केली जाते. या दिवशी सर्व माणसे फटाके फोडून आपला आनंद व्यक्त करतात. तसेच प्रत्येकाला दिपावलीच्या शुभेच्छा देतात.
दिपावलीचा चौथा दिवस हा पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची गोवर्धन पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णनने इंद्राच्या क्रोधाने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे गोकुळचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलले होते.
दिपावलीचा पाचवा दिवस हा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भावा – बहिणीच्या अतूट प्रमाचा आणि नात्याला जोपासणारा दिवस आहे.
निष्कर्ष:
दिपावली हा सर्वात महत्वाचा सण आहे. या सणाला दिवाळी असे सुद्धा म्हटले जाते. हा सण असत्यावर सत्याचा विजय झाला होता म्हणून साजरा केला जातो.
तसेच दिपावली हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणतो. त्याच प्रमाणे नवीन जीवन जगण्यासाठी उत्साह प्रदान करतो.