प्रस्तावना:
आमच्या भारत देशामध्ये विविध प्रकारचे पक्षी आढळतात. जसे कि पोपट, मैना, कबुतर, चिमणी, कावळा इ. त्या सर्वांपैकी मोर हा पृथ्वीवर एक सुंदर पक्षी आहे.
हा पक्षी त्याच्या रंगबिरंगी पंखांमुळे ओळखला जातो. मोर हा पक्षी भारतामध्ये अन्य भागांमध्ये आढळून येतो.
मोर हा पक्षी विविध रंगांमध्ये आढळतो. तसेच भारतीय लोकांसाठी मोराचे राष्ट्रीय महत्त्व आहे. भारतच्या इतिहासात मोराला सर्वात महत्वाच स्थान आहे.
मोराची रचना
मोराच्या पिसांवर चंद्रासारखे ठिपके असतात जे दिसायला खूप सुंदर दिसतात. जसे कि सोनेरी, पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या अशा विविध रागांची रंगछटा असते. मोराच्या डोक्यावर तुरा असतो.
मोराचे अन्न
मोर हा पक्षी झाडाची पाने, किडे, साप, फळे, मुंग्या, विंचू आणि इतर किटका खातो. तसेच तो वनस्पती सुद्धा खातो.
मोर शेतकऱ्याचा मित्र
शेतकऱ्याचे मोरावर खूप प्रेम असते. कारण मोर हा शेतकऱ्याचा चांगला मित्र सुद्धा असतो. मोर हा पक्षी हिरव्या शेतात जास्त प्रमाणात दिसून येतो.
मोर हा पक्षी शेताला नुकसान पोहोचवणाऱ्या उंदीर, किडे आणि बेडूक साप यांना खातो. त्यामुळे शेताचे नुकसान होत नाही. तसेच मोर या पक्ष्याला ढग फार आवडतात.
मोराचे निवास स्थान
मोर हा पक्षी जास्त प्रमाणात वृक्ष असलेल्या तसेच पहाडावर व जंगलात राहतात. ते जवळील पाण्याची जागा शोधत असतात. मोर पक्षी मुख्यत: जमिनीवर विश्रांती करतात.
काही मोर हे झाडांवर तरी काही मोर हे झाडाच्या फांदीचा शाखावर झोपतात. मोरांना पावसाळी हवामान खूप आवडते. मोरांना कोणत्याही हवामानाच्या परिस्थितीत राहायला आवडते.
मोरांची प्रजाती
मोरांचे प्रमुख तीन प्रकार आणि प्रजाती आहेत. जसे कि भारतीय मोर, ग्रीन मोर आणि कांगो मोर इ.
भारतीय मोर
आमच्या बहरत देशामध्ये मोराची सर्वात सुंदर प्रजाती आढळते. मोराच्या असंख्य प्रजातीपैकी भारतीय मोराची कोणतीही उप प्रजाती नाही आहे. भारतीय मोर हा भारत, पाकिस्तान, नेपाल, बांगलादेश आणि श्रीलंका या देशात आढळतो.
ग्रीन मोर
ग्रीन मोराची प्रजाती ही इंडोनेशिया मध्ये आढळून येते. हे मोर भारतीय मोरांसारखेच सुंदर दिसतात. या मोरांच्या वरच्या बाजूला असलेल्या निळ्या रंगाच्या पंखाऐवजी हिरव्या रंगाचे पंख असतात.
कांगो मोर
कांगो मोर हा या दोन मोरांच्या प्रजातीपेक्षा सर्वात वेगळा असतो. कारण त्याच्या वरच्या बाजूस निळ्या रंगाचे पंख असतात.
या कांगो मोराला भारतीय मोरासारखा लांब पिसारा नसतो. या मोराचा आकार देखील छोटा असतो. त्याच बरोबर हा कांगो मोर दिसायला आकर्षक दिसत नाही.
मोराचे मुख्य आकर्षण
मोर हा पक्षी खूप डौलदार असतो. मोराचे मुख्य आकर्षण म्हणजे – पाऊस असतो. कारण जेव्हा पावसाचे आगमन होते तेव्हा मोर आपला सुंदर पिसारा फुलवून नृत्य करतो.
मोर नृत्य करताना आपला पिसारा फुलवतो तेव्हा हा पिसारा एखाद्या मोठ्या रंगबिरंगी पंख्यासारखा दिसतो.
मोर हा पक्षी वनांची आणि बागची शोभा वाढवतो. मोराच्या या सौंदर्यामुळे अनेक कवींनी आपल्या कवितांमध्ये मोराचे सुंदर प्रकार वर्णन केले आहे.
भारतीय संस्कृतीत महत्त्व
प्राचीन काळापासून मोर हा एक लोकप्रिय पक्षी आहे. तसेच देवी सरस्वतीचे वाहन आहे. भगवान कार्तिकेय आणि भगवान विष्णू उंचे वाहन सुद्धा आहे.
हिंदू धर्मामध्ये मोराला सर्वात जास्त महत्त्व आहे. तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्या डोक्यावर मोराचे सुंदर पंख सुशोभित केले आहेत.
निष्कर्ष:
मोर या पक्ष्याचे सौंदर्य पाहून त्याला भारत सरकारने २६ जानेवारी, १९६३ साली भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे. तसेच मोर या पक्ष्याने अनेक कलाकारांना प्रेरित आणि आकर्षित केले आहे.