father1 1

माझे बाबा मराठी निबंध – वाचा येथे My Father Essay in Marathi Language

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आई – वडील यांचे महत्त्व सर्वात जास्त असते. आई – वडिलांना ईश्वराचं दुसरं रूप समजलं जात तसेच त्यांना आपल्या जीवनाचा सर्वात पहिला गुरु मानला जातो.

ज्या प्रमाणे आई सर्वांच्या जीवनामध्ये आईचे स्थान असते त्याच प्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात वडिलांचे सुद्धा महत्वाचे स्थान असते.

एक वडीलच आपल्या कुटुंबाची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी पार पाडत असतात. एक वडील स्वतःला अधिकाधिक कठोरपणे दर्शवितो. परंतु त्याच्यासारखा दयाळू कोणी नसतो.

माझे बाबा

father1

माझे बाबा हे माझ्यासाठी एक आदर्श आहेत. कारण ते एक परिपूर्ण पिता आहेत. माझ्या बाबांमध्ये अशा सर्व क्षमता आहेत ज्या एका महान वडिलांमध्ये असतात.

माझे बाबा हे फक्त माझे बाबाच नाही तर ते माझे एक सर्वात चांगले मित्र सुद्धा आहेत. माझ्या वडिलांचे नाव रमेश आहे त्यांचे वय ६० वर्ष आहे.

प्रामाणिक व्यक्ती

father

माझे बाबा अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत. ते कोणतेही काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात. माझे बाबा नेहमी आपला अमूल्य वेळ काढून माझ्याबरोबर घालवतात.

माझ्या बाबांनी मला आजपर्यंत कोणत्याही गोष्टीचे कमी होऊ दिले नाही. ते स्वतः खूप कष्ट करतात आणि कधीही आपल्या कुटुंबाला दुखी होऊ देत नाहीत.

प्रामाणिक व्यक्ती

my father

माझे बाबा अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत. ते कोणतेही काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात. माझे बाबा नेहमी आपला अमूल्य वेळ काढून माझ्याबरोबर घालवतात. माझ्या बाबांनी मला आजपर्यंत कोणत्याही गोष्टीचे कमी होऊ दिले नाही. ते स्वतः खूप कष्ट करतात आणि कधीही आपल्या कुटुंबाला दुखी होऊ देत नाहीत.

माझे बाबा एक शिस्त प्रेम करणारी व्यक्ती आहेत. ते नेहमीच सगळ्यांना शिस्त पाळायला सांगतात. माझे बाबा स्वतः देखील शिस्तीचे पालन करतात. त्यांची दिवसभराची सर्व कामे ही वेळेतच पार पडतात. ते नेहमी शिष्य पाळण्याचे सल्ले देतात आणि त्याचे फायदे देखील सांगतात.

पैश्यांचा उपयोग

father

माझे बाबा मला पैश्यांचा योग्य वापर कसा करावा हे देखील शिकवतात. कारण पूर्वी मी पैसे व्यर्थ घालवत असे. त्यामुळे त्यांनी मला स्पष्टीकरण दिल्यानंतर मी नेहमीच पैसे योग्य प्रकारे वापरू लागलो.

प्रेमाची भावना

Father

माझे बाबा माझ्यावर आणि कुटुंबातील सर्व लोकांवर खूप प्रेम करतात. ते घरातील कोणत्याही व्यक्तीला कधीच काही कमी पडू देत नाहीत. आमच्या सर्व गरज या पूर्ण करतात.

माझे बाबा जर का माझ्याकडून कोणतीही चूक झाली तर मला ओरडत किंवा मारत नाहीत तर ते मला अगदी प्रेमाने समजवून सांगतात. त्याच बरोबर ते पुन्हा तसे न करण्यास शिकवतात.

त्याग आणि साहस

father 1 माझे बाबा कुटुंबाची जबाबदारी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडतात. ते कधीही कोणतेही काम करायला आळस करत नाहीत.

माझे बाबा आजारी असले तरी आपले कर्तव्य कधी विसरत नाहीत. मला वाटते की, बाबांइतका त्याग आणि प्रेम इतर कोणतीही दुसरी व्यक्ती करू शकत नाही. माझ्या बाबांना समाजातील सर्व माणसे त्यांचा आदर करतात.

त्यांनी मला नेहमी मोठ्या माणसांचा आदर करायला शिकवले आहे. तसेच ते मला सांगतात की, इतरांची मदत देखील केली पाहिजे. माझ्या बाबांची दररोज कार्य करण्याची क्षमता पाहून मला एक धाडस मिळते.

निष्कर्ष:

आपल्या सर्वांच्या जीवनात आपले आई – वडील हे एखाद्या जुन्या वट वृक्षासारखे असतात. कारण ते स्वतः अनेक दुःख आणि वेदना सहन करून आपल्याला आनंदी ठेवतात. म्हणून वडिलांचा संघरासह आपण कधीही विसरू नये.

प्रत्येक मुलाने वृद्ध काळात आपल्या आई – वडिलांची सेवा केली पाहिजे. आपण हे विसरू नये की, आज त्यांच्यामुळे आपण जीवनात यश मिळवू शकलो. तसेच त्यांचा संघर्ष आणि विचारांचे हे परिणाम आहे.

Leave a Comment