संयुक्त परिवार का नुकसान1

माझे कुटुंब मराठी निबंध – वाचा येथे My Family Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

कुटुंब मिळून एक समाज तयार होतो आणि समाज मिळून एक देश बनतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीच्या समाजात कुटुंबाला एक महत्वपूर्ण स्थान दिले गेले आहे. कुटुंब हा समाजाचा एक केंद्रबिंदू आहे.

मानवी कुटुंबात राहून आपण सर्व काही शिकतो. कुटुंब हा शब्द ऐकताच प्रेम करणारी आई, लाड करणारे बाबा, लाडकी बहीण, गोष्ट सांगणारी आजी आणि आपल्या सोबत खेळणारे आजोबा ते चित्र आपल्या डोळ्या समोर येते.

कुटुंब म्हणजे काय –

My Family

कुटुंब म्हणजे एकाच घरात एकत्रित राहणारे आणि एकमेकांच्या नात्यात परस्पर संबंध आहे तसेच एकमेकांची काळजी घेणारे म्हणजे कुटुंब होय. आपल्याला वेगवेळ्या प्रकारची कुटुंबे पाहायला मिळतात.

माझे कुटुंब

My Family Essay In Hindi 2 कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कुटुंब खूप महत्वाचे असते. कुटुंब हे तिची काळजी घेते आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याच्या कुटुंबाचे खूप मोठे योगदान असते.

मुलांना शिकवण्याचे काम सुद्धा कुटुंब करते. कोणाचे कुटुंब हे छोटे असते तर कोणाचे कुटुंब हे मोठे असते. एखाद्याच्या घरात कमी माणसे असतात तर एखाद्याच्या घरात जास्त माणसे असतात. त्याच प्रमाणे माझे कुटुंब हे लहान आहे.

माझ्या कुटुंबात मी माझे आई – बाबा, आजी – आजोबा, भाऊ आणि छोटी बहीण राहते. माझ्या घरामध्ये सर्वजण माझ्या आजोबांच्या शब्दाचे पालन करतात. ते म्हणतील त्याच प्रमाणे सर्वजण वागतात.

माझे आजोबा नेहमी आम्हाला शिस्त, स्वच्छता, मूल्य आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व सांगतात. माझी आजी सुद्धा खूप चांगली आहे. ती आम्हाला रात्री झोपताना चांगल्या – चांगल्या गोष्टी सांगते.

शिस्तीची आवड

My Family Essay In Hindi माझ्या वडिलांना शिस्तीची खूप आवड आहे. ते कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रमांनी पार पडतात. ते आम्हाला नेहमी सांगतात कि, नेहमी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे.

जर आपण वेळ वाया घालवला तर गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून नेहमी आपण वेळेचा योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे.

आईचे कर्तव्य

maata माझी आई ही एक गृहिणी आहे. ती नेहमी कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेते. तसेच गरीब आणि गरजू लोकांना मदत करते.

ती आम्हाला शिकवते कि नेहमी मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे आणि अडचणीत असलेल्या लोकांना मदत केली पाहिजे.

आमच्या कुटुंबातील सर्वात लहान आणि लाडकी व्यक्ती म्हणजे माझी छोटी बहीण. ती सर्वांची आणि माझी सुद्धा लाडकी आहे.

समस्याचे निवारण

Dadi Maa आपल्या जीवनात बऱ्याच काही समस्या असतात. त्यांचे निवारण आपण एकमेकांच्या मदतीने करू शकतो.

माझ्या कुटुंबात जर कोणाला काही समस्या किंवा अडचण असेल तर सर्वजण एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. जर एखादा व्यक्ती आजारी पडला तर घरातील सर्व व्यक्ती त्याची काळजी घेतात. माझ्या कुटुंबात क्वचितच भांडणे होतात आणि झाली तरी लगेच मिटतात.

माझ्या कुटुंबातील सर्व माणसे एकमेकांना खूप सांभाळून घेतात. तसेच माझ्या कुटुंबात सर्व सण हे रीती – रिवाजानुसार आणि एकसाथ मिळून साजरे केले जातात.

निष्कर्ष:

एक कुटुंब हे भावनिक आणि शारीरिकरित्या ताकदवान प्रामाणिक आणि आत्मविश्वासाने एक चांगली व्यक्ती बनवते.  माझे कुटुंब हे लहान आहे पण मला माझे कुटुंब फार आवडते. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो.

Leave a Comment