My Dreams Of India

माझा देश वर मराठी निबंध – वाच येथे My Country Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

भारत हा माझा देश आहे आणी मी या देशाचा नागरिक आहे. या भारत भूमीवर माझा जन्म झाला आहे. भारत भूमी ही माझी माता आहे. माझा भारत देश प्राचीन आणि महान आहे.

माझ्या भारत देशाची संस्कृती आणि विविधता ही अन्य देशांपेक्षा वेगळी आहे. माझ्या या भारत देशाला अनेक नावानी ओळखले जाते.

भारत देशाची नावे

भारत देशाचे राष्ट्रीयत्वमाझ्या भारत देशाला कोणी इंडिया म्हणत, कोणी हिंदुस्तान, तर कोणी आर्यव्रत या नावानी ओळखले जाते. या देशाला भारत हे नाम भरत राजाच्या नावावरून पडले आहे.

तसेच या देशाला ‘आर्यव्रत’ असे सुद्धा म्हटले जात होते. माझ्या भारत देशामध्ये अंग्रेज सरकार येण्याआधी या देशाला ‘सोने कि चिडिया’ या नावाने ओळखले जात होते.

विविध धर्म आणि जातीचे लोक

अलग अलग धर्म के लोगमाझ्या भारत देशामध्ये विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्माची भाषा शैली ही वेगवेगळी आहे. माझ्या भारत देशामध्ये हिंदू, मुस्लीम, जैन, पारसी, बौद्ध इ विविध धर्माचे लोक राहतात. परंतु या देशामध्ये सर्व धर्माच्या आणि जातीच्या लोकांमध्ये एकोपाची भावना दिसून येते.

कारण हे सर्व एकजुटीने राहतात आणि भारत देशाचा प्रत्येक उत्सव मिळून – मिसळून आणि आंनदाने साजरे करतात.

कृषिप्रधान देश

कृषिप्रधान देशमाझा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश लोक गावात राहतात. भारत हा एक गावा – गावांचा देश आहे. या देशामध्ये सर्वात जास्त शेती केली जाते. भारत देशामध्ये ऊस, तांदूळ, गहू इ ची शेती केली जाते.

भारत देशाला स्वातंत्र्य

download happy independence day pics माझ्या भारत देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून सुटका मिळाली. या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक महान नेत्यांनी आपल्या जीवनाचा त्याग करून स्वतंत्र केले.

तसेच २६ जानेवारी, १९५० साली माझ्या भारत देशाचे भारतीय संविधान लागू केले. या भारतीय संविधानानुसार देशातीय प्रत्येक व्यक्तीला त्याचा हक़्क़ आणि अधिकार देण्यात आला.

भारतीय संस्कृती

माझ्या भारत देशाची संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे. ही सगळ्यात जुन्या संस्कृतीपैकी एक संस्कृती आहे. माझ्या भारत देशामध्ये समृद्ध संस्कृती आणि समृद्ध जीवन पद्धती आहे.

पवित्र नद्या

गंगा नदीमाझ्या भारत देशामधून गंगा, कृष्णा, नर्मदा, गोदावरी, रावी, यमुना इ अन्य नद्या वाहतात. परंतु गंगा नदी ही भारत देशाची पवित्र नदी आहे.

या सर्व नद्यांचे पाणी माझ्या भारत देशाला हिरवीगार करतात. या नद्यांमुळे माझा भारत देश सर्व गुण संपन्न झाला आहे.

महान नेत्यांची भूमी

महान पुरुषमाझा भारत देश हा महान पुरुषांचा देश आहे. या भारत भूमीवर अनेक महान पुरुषांचा जन्म झाला आहे. जसे कि महात्मा गांधी, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. चा जन्म झाला आहे. या सर्वांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे.

भारत देशाचे राष्ट्रीयत्व

स्वच्छ भारत अभियानमाझ्या भारत देशात १५ ऑगस्ट हा दिवस स्वतंत्रता दिवस, २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच तिरंगा हा भारत देशाची शान आहे.

भारत देशाचे राष्ट्रीय फुल – कमळ, राष्ट्रीय पक्षी – मोर, राष्ट्रीय पशु – वाघ, राष्ट्रीय फळ – आंबा आणि राष्ट्रीय भाषा हिंदी आहे. त्याच बरोबर दिल्ली ही भारत देशाची राजधानी आहे.

समुद्र किनारा

नदी और समुद्र का जल दूषित होने के कारण माझ्या भारत देशाला लांब लचक असा समुद्र किनारा लाभला आहे. भारत देशाच्या उत्तर दिशेला हिमालय पर्वत, दक्षिण दिशेला हिंदी महासागर, पश्चिम दिशेला अरबी समुद्र आणि पूर्व दिशेला बंगालचा उपसागर लाभला आहे.

निष्कर्ष:

माझ्या भारत देशाने अनेक संकटांवर मात करून प्रगती केली आहे आणि अजूनही करत आहे. मजाह भारत देश हा थोर आणि पुण्यवान माणसांचा देश आहे. मला माझ्या देशावर गर्व आहे आणि माझा देश मला खूप – खूप आवडतो.

Leave a Comment