Birthday

माझा वाढदिवस मराठी निबंध – वाचा येथे My Birthday Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

प्रत्येक व्यक्ती हा आपल्या वाढदिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. कारण प्रत्येकासाठी हा एक आनंदाचा क्षण असतो. काही जण हे आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि आनंदात साजरा करतात.

वाढदिवस हा सर्व मुलांचा आवडता दिवस आहे. हा वर्षांतून एकदाच येतो. तर काही मुलांना आपला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही.

वाढदिवस केव्हा साजरा केला जातो –

प्रत्येक व्यक्ती ज्या दिवशी जन्माला येतो तो दिवस हा दरवर्षी वाढदिवसाच्या रूपाने साजरा केला जातो. आपण प्रत्येक वाढदिवसासह एक वर्ष वाढत राहतो.

माझा वाढदिवस

birthday

त्या सर्वांप्रमाणेच मी सुद्धा माझ्या वाढदिवसाची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला खूप आनंद होतो. मी दरवर्षी माझा वाढदिवस हा १० जूनला साजरा करतो.

या दिवशी मी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आणि नवीन कपडे घालतो. त्यानंतर मी घरातील सर्व मोठ्या माणसांचे आशीर्वाद घेतो. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमच्या गावातील गणपतीच्या मंदिरात जातो आणि देवाचे दर्शन घेऊन घरी येतो.

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या आई – वडिलांकडे जे काही मागतो ते मला आणून देतात.

वाढदिवसाची तयारी

मी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मी माझ्या वाढदिवसाची तयारी केली होती. मी माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार माझ्या मित्र आणि मैत्रिणींना तसेच नातेवाईकांना आमंत्रित केले होते. माझ्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी खूप खरेदी केली होती. मी माझा वाढदिवस साजरा कारण्यासाठी काही दिवसांपूर्वीच खूप उत्साही होतो.

कारण मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुपरमॅनच्या डिझाईनचा केक आणायचा होता.मी वाढदिवसाला सगळ्यांना आमंत्रित करण्यासाठी आधीच यादी करून ठेवली होती.

काही लोक हे वाढदिवसाला बोलाविण्यासाठी आमंत्रण कार्डे देतात. परंतु मी माझ्या वाढदिवसाला सगळ्यांना फोन करून बोलावले होते, माझे बरेच मित्र हे काही दिवसांपासून माझ्या वाढदिवसाच्या पार्टीत येण्याची वाट पाहत होते.

वाढदिवस साजरा

वाढदिवस साजरा

अखेर वाढदिवस साजरा करण्याचा दिवस आला होता. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी देवाचे आभार मानण्यासाठी आई – वडिलांबरोबर मंदिरात गेलो.

माझ्या बाबानी मंदिरातील गरिब लोकांना दान दिले. आम्ही घरी आलो आणि घरातील बाकीच्या माणसांनी वाढदिवसाची तयारी केली होती. सगळे नातेवाईक आणि मित्र – मैत्रिणी आल्या होत्या. संध्याकाळ झाली होती आणि सर्व माणसे जमा झाली होती.

सर्वानी घराची अगदी सुंदर प्रकारे सजावट केली होती आणि घराच्या मोठ्या खोलीत केक ठेऊन सजवला होता. मेणबत्त्या पेटवल्या होत्या आणि सर्व लोक केक टेबलाभोवती उभे होते. त्यानंतर मी केक कापला आणि सर्वांनी टाळ्या वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर आईने मला केक भरवला आणि घरी आलेल्या सर्व लोकांना केक, मिठाई, चॉकलेट, चिवडा इ सर्व डिश मध्ये दिले. मला माझ्या वाहदिवसाच्या दिवशी काकांनी घड्याळ भेट दिले होते. नातेवाईकांनी आणि मित्र मैत्रिणी भेटवस्तू दिल्या.

जेवणाचा कार्यक्रम

food

तसेच माझ्या वाढदिवस दिवशी सर्व लोकांना जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. तसेच जेवणाचे टेबल सजवले होते.

स्वयंपाकानी अन्न तयार केले होते. जेवणामध्ये पुरी – भाजी, पुलाव आणि इ सर्व होत. सगळ्या लोकांनी जेवण अगदी मनापासून खाल्ले.

बाहेरची सर्व मंडळी जेवून झाली होती आणि सर्व पाहुण्यांना घराच्या थोडे बाहेर सोडून आल्यावर घरातील सर्व मंडळी जेवायला बसली. यानंतर पार्टी संपली आणि सर्वांच्या भेटवस्तू पाहून मला खूप आनंद झाला.

निष्कर्ष:

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी घरातील सर्व माणसे माझे खूप लाड करतात. या दिवशी माझ्यावर कोणीच रागवत नाही. म्हणून माझा वाढदिवस खूप – खूप आवडतो. अशा प्रकारे वाढदिवस साजरा केल्याने आपल्याला आनंद मिळतो.

Leave a Comment