प्रस्तावना:
आमचा भारत देश हा महान पुरुषांचा आणि स्त्रियांचा देश आहे. या भारत भूमीवर अनेक महान पुरुषांनी आणि स्त्रियांनी जन्म घेऊन या भारत भूमीला अधिक पवित्र बनवले आहे. कोणी समाज कार्य केले तर कोणी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.
त्या सर्व स्त्रियांपैकी मदर टेरेसा ही एक महान स्त्री होती जिने आपले संपूर्ण आयुष्य समाज सेवा करण्यासाठी आणि गरीब व गरजू लोकांच्या मदतीसाठी अर्पण केले. ती आपल्या महान कार्यसाठी जगात सर्वात प्रसिद्ध आहे.
मदर टेरेसा ही एक भारतीय स्त्री नसून तिने भारत देशासाठी बरेच काही केले आहे. या जगामध्ये अशा महान लोकांची गरज आहे, जे मानवतेच्या सेवेला सर्वात मोठा धर्म मानतात.
जन्म
मदर टेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट, १९१० साली मॅसेडोनियाची राजधानी स्कोप्जे शहरात झाला. मदर टेरेसा हिचे संपूर्ण नाव ‘अॅग्नेस गोंझा बॉयाजीजू’ असे होते. तिच्या वडिलांचे नाव ‘निकोला बोयाजु’ आणि आईचे नाव ‘द्राणा बोयाजु’ असे होते.
अल्बेनियन भाषेमध्ये गोंझा या शब्दाचा अर्थ – फुलाची कळी असा होता. मदर टेरेसा ही एक अशी कळी होती, जी गरीब आणि पीडित लोकांच्या जीवनामध्ये प्रेमाचा सुगंध आणत होती. ती पाच भावंडांपैकी सर्वात धाकटी होती.
मदर टेरेसा ही एक सुंदर, कष्टाळू आणि अभ्यासू मुलगी होती. तिला वाचन करणे आणि गाणे आवडत असे. मदर टेरेसा ने पारंपरिक कपड्यांचा त्याग करून निळ्या रंगाची साडी घालण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तिने मानवतेची सेवा करण्याचे कार्य सुरु केले.
शिक्षण
मदर टेरेसा या धर्माने ख्रिश्चन होत्या. त्यांचे बालपण हे खूप सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. त्या शिक्षण घेत असताना सेवा कार्य करणे हाच त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश होता.
मदर टेरेसा आपल्या वयाच्या १८ व्या वर्षी सिस्टर्स ऑफ लॉरेटो या आयरिश संघात प्रवेश घेतला. त्यानंतर १ वर्ष आर्यलँड येथे इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. तसेच त्यांनी स्वतःला जोगीण बनून मिशनरी कार्यास वाहून घेतले. मदर टेरेसा ने १९ वर्षे अध्यापन केले. ती एक प्राचार्य झाली.
ती अध्यापन करत असताना शाळे जवळील मोती झील झोपडपट्टीतील दिन – गरीब लोकांच्या जीवनाचे तिला दर्शन होत असे. यामुळे त्यांच्या मनामध्ये नेहमी अपंग, शोषित, गरीब, पीडित आणि दीनदुबळे लोकांची सेवा करणे हेच विचार येत असत.
मदर टेरेसा यांचे जीवन कार्य
मदर टेरेसा ने गरीब लोकांसाठी ‘निर्मल हृदय’ आणि ‘निर्मला शिशु भवन’ या दोन आश्रमांची स्थापना केली. निर्मल हृदय या आश्रमामध्ये आजारी आणि पीडित लोकांची सेवा करणे हे काम केले जात असे.
तर ‘निर्मला शिशु इमारत’ किंवा भवन यामध्ये अनाथ आणि सुशिक्षित मुलांची मदत करण्याचे कार्य या आश्रमात केले जात असे=-987890पुरस्कार प्रदानमदर टेरेसा याना सन १९३१ साली शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मानव जातीची सेवा करण्यासाठी त्यांना अनेक आंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळले. मदर टेरेसा यांनी समाज सेवा आणि लोक कल्याणवर आधारित सन १९६२ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले गेले.
सन १९७९ साली त्यांना नोबेल पुरस्कार फॉउंडेशनने मदर टेरेसा याना जगातील सर्वोच्च नोबेल पारितोषकाने सन्मानित केले. तसेच सन १९८० मध्ये भारताच्या सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले.
निष्कर्ष:
मदर टेरेसा यांच्या महान कार्यामुळे देशातील सगळ्या लोकांमध्ये शांतीची भावना निर्माण झाली. त्यांनी सगळ्या लोकांना असा उपदेश दिला की, आपण सगळ्यांनी प्रेमाने राहिले पाहिजे. मदर टेरेसा यांचे समाज कार्य आजही लोकांच्या लक्षात आहे. त्या आज या जगात नाही परंतु त्यांच्या मिशनरी गरीब लोकांची सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत.