दादी माँ

माझी आई मराठी निबंध – वाचा येथे Mother Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जर महत्वाचं व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे – आई. आई हा शब्द अत्यंत सोपा आहे परंतु त्या शब्दामागे अपरंपार माया दडलेली आहे. एक संपूर्ण जगच यामध्ये सामावलेल आहे.

आपल्याला जन्म देऊन जगात आणणारी आई ईश्वराचं रूप आहे. ईश्वराने आईला यासाठी बनवलं आहे कि,  ईश्वर हा प्रत्येक मुलाजवळ नाही राहू शकत. म्हणून आईला ईश्वराचं दुसरं रूप समजलं जात.

आई म्हणजे –

dadi maa आई म्हणजे वात्सल्याचा वाहणारा झरा आहे. तसेच आई म्हणजे – ममता, आत्मा आणि ईश्वराचा संगम आहे. तसेच मायेची पाखरं करणारी स्त्री म्हणजे आई होय.

आई हा एक शब्द नव्हे तर ती एक भावना आहे. म्हणून म्हटले आहे कि, आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. तसेच साने गुरुजी म्हणतात, आई माझा गुरु, आई कल्पतरू.

माझी आई

Dadi Maa त्याच प्रमाणे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे – माझी आई होय. माझ्या आईचे नाव  वंदना असे आहे. तिचे वय ४० वर्ष आहे. मी माझ्या आईची प्रशंसा आणि आदर करतो. माझी आई हि माझ्या आयुष्यातील सर्वात पहिला  गुरु आहे.

माझी आई माझी काळजी घेते आणि माझ्यासाठी सर्व काही अर्पण करते. माझी आई मला सकाळी लवकर उठवते आणि आमच्या उठण्या पूर्वीच तिच्या नेहमीच्या कामांची सुरुवात होते. माझी आई आमच्या सर्वांसाठी गोड खाद्य बनवते.

जरी माझी आई कामात व्यस्त असली तरी माझ्यासाठी थोडासा वेळ काढते आणि माझ्या बरोबर खेळायला मदत सुद्धा करते. तसेच माझी आई मला गृहपाठ करण्यास मदत सुद्धा करते. माझी आई अन्य उपक्रमांमध्ये मला मार्गदर्शन करते.

कष्टाळू व मेहनती

maata माझी आई खूप कष्टाळू आणि मेहनती आहे. ती सकाळपासून रात्री झोपेपर्यंत काम करत असते. माझी आई नेहमी दुसऱ्यांसाठीच झटत असते.

तिच्या चेहरा नेहमी हसत असतो. म्हणून मी तिच्या कडूनच शिकलो कि, कठीण परिश्रम हि आपल्याला यशस्वी बनवतो. आमच्या घरामध्ये जर कोणाला बर नसेल तर माझी आई रात्रभर त्याची काळजी घेते.

संस्कार

maa माझी आई ही माझ्यासाठी सर्व काही आहे आणि माझ्यासाठी देव सुद्धा आहे. माझ्या आईने लहानपणापासून मला चांगले संस्कार देऊन मला घडवले आहे. जर मला काही लागलं तर ओठावर येणार पहिला शब्द म्हणजेच – आई.

तसेच संकटाच्या वेळी साथ देणारी आणि दुःख सोसून सुखात ठेवणारी आई असते. माझी आई हि माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण ती आपल्या सोबत राहून किती जबाबदारी पार पडत असते.

माझी आई जर का आजारी पडली तर आम्हा सर्वाना संपूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं. तेव्हा असं वाटतच नाही कि, हे आपलं घर आहे. माझी आई नेहमी जी कामे करते ती कामे इतर कोणालाही करून संपत नाही

आई मायेचा सागर

माँ का कार्यआई हि मायेचा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील प्रभू श्रीरामचंद्रांनी स्वर्णमयी लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षा आपली अयोध्या या जन्म भूमीला सर्वश्रेष्ठ मानले आहे.

हे सांगताना त्यांनी आपल्या जन्मभूमीची बरोबरी आईशी केली आहे. मराठीमध्ये प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेमध्ये स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी हि ओळ लिहून आईची महानता वर्णविली आहे.

निष्कर्ष:

माझी आई हि एक व्यक्ती नसून आमच्या जीवनाचा आधार स्तंभ आहे. या जगामध्ये आईची तुलना हि कोणाशी करता येणार नाही आणि तिची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही.

म्हणून माझी आई मला खूप प्रिय आहे आणि ती मला खूप – खूप आवडते. मी माझ्या आईवर खूप करतो आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो.

Leave a Comment