माझा भारत महान वर निबंध – वाचा येथे Mazya Swapnatil Bharat Essay In Marathi

प्रस्तावना:

 माझा भारत महान. माझा भारत महान आहेच. आणि मला अभिमान आहे कि मी भारत देशाचा एक नागरिक आहे. माझ्या नागरित्व जर कोणी विचारले तर मला भारतीय म्हणून सांगायला खूप आवडते.

माझ्या स्वप्नातला भारत

भारत देशाला “सोने कि चिडिया” म्हणतात. या भारत देशाला खूप मोठं मोठ्या लोकांनी ब्रिटिशांच्या गुलाम गिरीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. भागात सिंग, सुखदेव, गांधीजी , वीर सावरकर सारखे महान नेते आपल्या देशाला लाभले आहेत. त त्यांच्या समाधी सुद्धा अजून आपण जपून ठेवल्या आहेत. माझा भारत देश विकसित आहे. ज्याने ब्रिटिशाना पळवून लावले.

माझ्या स्वप्नातला आताचा भारत

आता ह्या भारताचे स्वरूप काही वेगळे झाले आहे. ज्या देशाने ब्रिटिशाना हाकलवून लावले. त्या देशातच आज भ्रष्टाचार सारखे प्रकार घडत आहेत. स्त्रियांना आदर नाही, त्यांची अवहेलना केली जाते. ज्या आईच्या उदरातून आपण येतो, त्याचाच बलात्कार केला जातो.

काळा बाजार, खून, बॉम्ब स्फोट सारखे आतंकवादी हल्ले, तान्ह्या मुलींवर बलात्कार, प्रेम प्रकरणास हो म्हणत नाही म्हणून किती मुलींवर ऐसीड फेकून तिला आयुष्यातून उठावाने. आई ने पैसे दिले नाही म्हणून तिचा गळा चिरून मारून टाकणे. उधारीचे १० रुपये दिले नाहीत म्हणून मित्राचा कोयत्याने गळा कापून हातात घेऊन पोलीसां पर्यंत पोहचणे.

माझ्या स्वप्नातला नवा भारत  

हे सर्व ऐकायला खूप बेकार आणि वाईट वाटते ना पण हे होते आहे आपल्या देशात. म्हणून मी नेहमी स्वप्नात एक वेगळा भारत पाहते. मला असा भारत नको जो हिंसा ने भरला आहे. जिथे फक्त अत्याचार होत आहे. मी वेगळा भारत पाहत आहे.

जो खूप छान आहे, जिथे महिले वर अत्याचार नाही तर तिला आदर दिला जाईल. जिथे मंदिरात देवीच्या मूर्तीला आपण नमस्कार करतो तिथे एका स्त्रीला सामना दर्जा देऊन तिचे स्थान तिला दिले जाईल.

आपण नेहमी स्त्री पुरुष सामानता असेल. कारण आपल्या देशातील स्त्रियांनी खूप क्षेत्रांमध्ये सहभाग घेतला आहे. ती हि पुरुषाच्या सोबत खांद्याला खांदा लावून नोकरी करत आहे. ती आपले घर संभालून नोकरी सुद्धा तितक्याच जोमाने करते.

भ्रष्टाचार मुक्त भारत

या देशात सर्व भ्रष्टाचार मुक्त भारत असेल. वेळेवर कर जमा केला जाईल. कुठे कुणाला नोकरी देण्यासाठी लाच नाही घेणार. माझा देशातील नेता देशासाठी कार्य करेल आणि या देशात कोणीही गरीब नाही राहणार. कोणी भुकेला नाही झोपणार. माझा देश एक कुशल आणि प्रगत देश असेल जिथे भ्रष्टाचार हा शब्दही कोणाला माहित नसेल.

माझा भारत देश रोजगार युक्त असेल

माझ्या देशात कोणी बेरोजगार नसेल. सर्व शिक्षित असतील कोणताही तरुण तरुणी बेकार राहणार नाही. सर्वांकडे त्याच्या शिक्षणा नुसार नोकरी असेल. माझा भारत देश एक प्रगतशील वैज्ञानिक देश बनेल, आणि आता पर्यंत जे प्रयत्न फसले ते यशस्वी होतील आणि रोजगारी मध्ये सुद्धा भारत देश एक नंबर वर असेल. हे माझे स्वप्न आहे.

माझा भारत देशात सम धर्म समभाव

आपल्या देशात पुरातन काळा पासून जात धर्म उच्च नीच शूद्र अश्या रूढी चालत आल्या आहेत. पण माझ्या स्वप्नातल्या भारत देशात असे काही नाही होणार माझा भारत देश फक्त सर्व धर्म समभाव असेल.

कोणालाही त्याची जात बघून पारखले जाणार नाही. तो हि सर्वांच्या समानतेने एकसाथ असेल. प्रत्येक सण हा एकत्र साजरा केला जाईल. कोणी हिंदू कोणी मुसलमान हा माझा देश हा तुझा देश म्हणून भांडणे नाही तर सर्व एकत्र येऊन राहतील.

सारांश:

असा असेल माझ्या स्वप्नातला माझा भारत देश. एक विज्ञानशिल, आणि प्रगतशील स्वछ भारत देश.

जय हिंद

Updated: मार्च 17, 2020 — 1:47 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *