मेरे सपनो का भारत

माझ्या स्वप्नातील भारत मराठी निबंध – वाचा येथे Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi Wikipedia

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

मी या भारत देशाचा नागरिक आहे. माझ्या भारत देशाने काही शतकापासून बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि बहुसामाजिक या साऱ्यांमध्ये प्रगती केली आहे. भारत देश हा आपल्या प्राचीन इतिहासासाठी आणि विविधतेमुळे सर्वात प्रसिद्ध आहे.

तसेच या भारत देशाची संस्कृती ही सर्व देशांपेक्षा वेगळी आहे. म्हणून या देशाला संस्कृती आणि विविधवाला देश म्हटले जाते. तसेच या भारत देशाने आज विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण व अन्य क्षेत्रात विकास केला आहे.

तसेच या देशात विविध धर्माचे आणि जातीचे लोक हे एकसाथ राहतात. माझ्या भारत देशात विविधतेत एकतेची भावना दिसून येते. परंतु काही लोक हे त्यांच्या स्वार्थासाठी भडकविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे देशाचे वातावरण खालावत चालले आहे.

भारताची सुरक्षा

indian army

माझ्या स्वप्नातील भारतात सर्वात प्रथम मुद्दा येतो तो म्हणजे भारताची सुरक्षा. भारत देश हा स्वतःची सुरक्षा स्वतः करण्यास सक्षम राहील. दारुगोळा म्हणा, लढाऊ विमाने किंवा युद्ध नौका. एखाद्या युद्धात लागणाऱ्या सर्व गोष्टी या आपल्या भारत देशात तयार व्हायला हव्यात.

आर्थिक भरभराट

Christmas decoration

माझ्या स्वप्नातील भारत हा आर्थिक दृष्ट्या सर्वगुणसंपन्न असेल. भारत देशातील सर्व लोक हे शांतीने आणि आनंदाने जगू शकतील. माझा भारत देश हा गौरवशाली भारतासारखा होईल.

तसेच भारत देशाला प्राचीन काळी सुवर्ण पक्षी म्हणून ओळखले जात होते. जेणेकरून आपल्या देशाला अन्य कोणत्याही देशासमोर हात पसरवण्याची गरज भासणार नाही.

जाती आणि धर्म भेदभाव

अलग अलग धर्म के लोग

भारत देश हा पुरुषप्रधान देश आहे. या देशामध्ये सर्वात जास्त पुरुषांना महत्त्व दिले जाते. परंतु या देशामध्ये काही लोक हे लैगिक भेदभाव करतात.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सिद्ध करून सुद्धा महिलांना निकृष्ट मानले जाते. माझ्या स्वप्नातील भारतात लैगिक भेदभाव होणार नाही आणि महिलांना पुरुषांइतकेच समान वागवले जाईल.

शिक्षण आणि रोजगार

बेरोजगारी की समस्या

माझ्या स्वप्नातील भारतात या देशातील प्रत्येक नागरिकाने शिक्षण घेतले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीला समान प्रमाणात रोजगार प्राप्त झाला पाहिजे. शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला देशाचा विकास करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही.

गरिबी

गरीबी

या देशामध्ये श्रीमंत लोक हे श्रीमंत होत चालले आहेत आणि गरीब लोक हे अधिकच गरीब होत चालले आहेत. माझ्या स्वप्नातील भारतात सर्व नागरिकांना संपत्ती ही समान प्रमाणात वाटली जाईल.

भ्रष्टाचारची समस्या

गरीबी के कारण

भारत देशात भ्रष्टाचार हा वेगाने वाढत आहे. ज्यामुळे सर्व लोकांना याचा सामना करावा लागत आहे. भ्रष्टाचारी लोकांकडून सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. माझ्या स्वप्नातील भारत हा पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त असेल.

तसेच काही लोक हे धर्म आणि जातीच्या नावावरून भेदभाव करतात. माझ्या स्वप्नातील भारतात कुठल्याही प्रकारचा जातीभेद किंवा धर्म भेदभाव नसेल.

तांत्रिक विकास

भारत देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात वेगाने विकास केला आहे. माझ्या स्वप्नातील भारत हा अधिक वेगाने गती करून इतर देशांप्रमाणे विकसनशील देशांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी उंची गाठेल.

शेती

किसान की आत्मकथा4

माझ्या स्वप्नातील भारतात शेती ही चांगल्या प्रकारे केली जाईल. तसेच उत्पादनाची गती कधीही कमी होणार नाही. सर्व लोकांना खाण्याच्या विविध वस्तू उपलब्ध होतील. त्यामुले लोकांचे आरोग्य देखील सुधारेल.

निष्कर्ष:

माझ्या स्वप्नातील भारत जगामध्ये आपले विशेष स्थान प्राप्त करेल. तसेच स्वप्नातील भारत हा भूख, दारिद्र्य आणि गरिबी यांच्यापासून पूर्णपणे मुक्त होईल.

माझा भारत देश हा एक विकसित देश बनेल. प्रत्येक व्यक्ती भारत देशाला एका आदराने पाहेल. तसेच या देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाचा अभिमान वाटेल.

Leave a Comment