प्रस्तावना:
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शाळा एक महत्तवपूर्ण भूमिका निभावते. कारण आपण आपल्या जीवनामध्ये शाळेतील कित्येक तरी आठवणी घेऊन जगत असतो.
प्रत्येक मूल जन्माला आल्यानंतर त्याला घडविण्यात तीन गोष्टींचा मुख्य वाटा असतो – एक म्हणजे आपले आई – बाबा, दुसरा म्हणजे – परिसर आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे – शाळा.
प्रत्येक मुलाला शाळेत गेल्यावर निबंध लिहायला दिला जातो आणि तो म्हणजे – माझी शाळा. प्रत्येक मुल हे घरातल्या छोट्याश्या जगात असते. शाळेत गेल्यावरच त्याचा इतरांशी आणि जगाशी परिचय होतो.
माझी शाळा
माझी शाळा ही खूप सुंदर आहे. माझ्या शाळेचे नाव ‘सरस्वती विद्यामंदिर’ असे आहे. माझी शाळा म्हणजे सरस्वती आणि ज्ञानाचे मंदिर आहे. माझी शाळा ही माझ्या गावातच थोड्या अंतरावर आहे.
त्यामुळे मला शाळेत जायला अर्धा तास लागतो. परंतु कधी – कधी उशीर झाला तर मी बस ने जातो. माझे कित्येक मित्र हे दूर – दूरवरून शाळेत येतात. त्यासाठी त्यांना बसने यावे लागते.
माझ्या शाळेचे वर्णन
माझ्या शाळेमध्ये १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत. माझी शाळा ही २ मजली इमारत आहे. माझ्या शाळेमध्ये शिस्तीचे फार महत्त्व आहे.
शाळेची पहिली घंटा होताच सर्व मुले आपापल्या वर्गात जातात. त्यानंतर काही वेळाने प्रार्थनेला सुरुवात होते. सगळ्या वर्गातील मुले ही प्रार्थनेला एका हॉल मध्ये जमतात.
आमच्या शाळेची सुरुवात ही प्रार्थनेपासून होते. सरस्वती मातेला वंदन करून तसेच ओंकार आणि गायंत्रि मंत्र म्हटला जातो. त्यानंतर महत्वाच्या बातम्या या प्रतिनिधींद्वारा सांगितल्या जातात. त्याच प्रमाणे शाळेतील मुख्याध्यापिका सर्व धर्माचे महत्व सांगतात.
शाळेचा गणवेश
माझ्या शाळेचा गणवेश हा एकच ठरलेला आहे. माझ्या शाळेतील सर्व मुले तोच गणवेश घालून शाळेत येतात. माझ्या शाळेतील सर्व शिक्षक हे खूप चांगले आहेत. ते प्रत्येक मुलाला कोणत्या विषयाबद्दल समजलं नाही तर समजावून सांगतात.
वाचनालय
माझ्या शाळेमध्ये एक मोठे वाचनालय आहे. वाचनालयामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ, साहित्य आणि पुस्तके देखील आहेत. मी आणि माझे मित्र आम्ही दुपारी जेवणाच्या वेळी वाचनालयामध्ये जाऊन बसतो आणि पुस्तके वाचतो. तिथे खूप शांतता असते. तसेच या शाळेत मला नवीन मित्र मिळालेत.
हिरवीगार बाग
माझ्या शाळेच्या समोर एक सुंदर आणि हिरवीगार बाग आहे. त्या बागेमध्ये विविध फुलांची झाडे आहेत. तसेच त्या झाडावर जेव्हा फुले लागतात तेव्हा ती बाग खूप सुंदर दिसते.
आम्ही सर्व दररोज या झाडांना पाणी घालतो आणि त्यांची काळजी घेतो. त्याच बरोबर हिरवेगार गवती मैदान सुद्धा आहे.
शाळा ही गुणांची खाण
माझी शाळा ही गुणांची खाण आहे. माझ्या शाळेमध्ये विविध धर्माच्या आणि जातीच्या मुलांना प्रवेश दिला जातो. माझ्या शाळेतील शिक्षक हे गावो – गावी फिरून ज्या कुटुंबाची परिस्थती आपल्या मुलांना शिकवण्यासाठी अवघड असते.
अशा मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांना फुकट शिक्षण दिले जाते. त्यांच्या घरच्याच आयुष्य घडवितात. त्यापिकी काही मुले ही मोठी होऊन डॉक्टर, कलेक्टर आणि इंजिनियर झाली आहेत.
निष्कर्ष:
प्रत्येकाच्या जीवनात शाळेचे खूप महत्त्व असते आणि शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते. मला माझ्या शाळेबद्दल खूप अभिमान वाटतो.
मला असे वाटते कि, आपण शाळा सोडून कधी गेलेच नाही पाहिजे. आम्हा सर्वाना आमच्या शाळेचे नाव उज्जवल कराचे आहे. अशी आमची शाळा आहे आणि मला माझी शाळा खूप – खूप आवडते.