प्रस्तावना:
सहल म्हटली की प्रत्येक मुलाला खूप आनंद होतो. आपण शाळेत असताना दरवर्षी सहलीचे आयोजन केले जाते. सहलीला जाण्यासाठी सगळी मुले ही खूप उत्सुक असतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या शाळेची सहल गेली होती.
एक आठवडा अगोदर आमच्या शिक्षकांनी आम्हाला सहली बद्दल सांगितले होते. त्याच बरोबर त्यांनी सहलीला जायचे ठिकाण होते – रायगड. सहलीचा विषय एकटाच आम्हा सर्व मुलांना खूप आनंद झाला.
आमचा आनंद हा गगनात मावेनासा झाला. सहलीचा जायचे हे सांगितल्यापासून दुसऱ्या दिवसापासून वर्गात सहलीची चर्चा सुरु झाली. वर्गात शिक्षक शिकवत असताना कोणत्याही मुलाचे आणि मुलीचे लक्ष नव्हते. आपापसात सहली विषयी चुळबुळ सुरु होती.
तेथे गेल्यावर आपण सर्वानी खूप मजा करायची असं प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला येत होत. त्याच प्रमाणे मी सुद्धा ठरवल की, तिथे जाऊन खूप खेळायच, मजा करायची आणि तेथील निसर्गाचा आनंद घ्यायचा.
सहलीला जाण्याची तारीख
शिक्षकांनी सांगितल्या प्रमाणे सर्व मुले सकाळी ८ वा शाळेत जमली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. शाळेच्या आवारात २ लक्झरी बसेस उभ्या होत्या. त्याच प्रमाणे पालकांची गर्दी सुद्धा जमली होती.
शिस्तीचं पालन
ठीक ९ वाजता आमची बस रायगडकडे जाण्यास रवाना झाली. गाडी सुरु होताच सगळ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा आवाज दिला आणि आम्ही रायगडकडे नेण्यास निघालो. बसमध्ये असताना आम्ही गाण्यांच्या भेंड्या, नाचणे या सर्व गोष्टी चालू होत्या.
रायगड किल्ला
सहा ते सात तासाच्या प्रवासनानंतर अखेर आम्ही रायगड किल्लाच्या पायथ्याशी पोहचलो. आमच्या समोर रायगड किल्ला उभा होता.
हा किल्ला पाहताच मी थोडा घाबरलो होतो पण न घाबरता हा किल्ला चढायचा असे ठरविले. आम्ही सर्व मुले हा गड चढत असताना ‘हर हर महादेव’ आणि ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा केली.
रायगडावर ही चढणारी मुले जणू काही शिवरायांचे मावळे आहेत असेच वाटत होते. दोन – तीन तासानंतर आम्ही सर्व रायगडाच्या मुख्य प्रवेश दाराशी पोहोचलो. त्यानंतर आम्ही दुपारचं जेवण करून शिवकालीन वस्तू पाहण्यास निघालो.
रायगड किल्ल्याची उंची
रायगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे २८५१ फूट इतकी आहे. रायगड हा किल्ला उंच आणि खूप मजबूत आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला राजधानी म्हणून घोषित केले होते.
रायगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजे महाद्वार. या गडावर जाण्यासाठी दरवाजाशिवाय दुसरी वाट नाही आहे. त्यानंतर आम्ही गंगासागर हे तलाव पाहण्यासाठी गेलो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी सप्त सागर आणि महानद्यांचे आणलेले तीर्थ हे या सागरामध्ये टाकण्यात आले.
त्यामुळे या सागराला ‘गंगासागर’ हे नाव पडले. त्यानंतर आम्ही नगारखानाच्या बाजूला असलेली मेघडंबरी ही जागा पहायला गेलो. ही जागा म्हणजे शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची जागा होय.
शिवाजी महाराजांची समाधी
आम्ही सर्व ठिकाणे पाहून झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी गेलो. तिथे पोहचताच सर्व मुले शांत झाली. त्यांची समाधी पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. शिवाजी महाराजांची समाधी दिसायला भव्य आणि खूप सुंदर आहे.
त्यांच्या समाधीच्या डावीकडे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. तो कुत्रा म्हणजे शिवाजी महाराजांचा जिवाभावाचा कुत्रा होता. या कुत्र्याने शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी मारली होती. अखेर आम्ही सर्वजण समाधीचे दर्शन घेऊन पार्टीच्या प्रवाळ निघालो.
निष्कर्ष:
रायगड हा किल्ला अत्यंत खूप सुंदर आहे. घरी येताच सारखा मला रायगड किल्ला दिसत होता. मज मन हे कुठेच लागत नव्हतं. मला जेव्हा रायगड किल्ल्याची आठवण येते तेव्हा रायगडावर जाण्याचं मन होत.