माझी आई मराठी निबंध – वाचा येथे Mazi Aai Marathi Essay

प्रस्तावना:

या धरतीवर आईसारखे दुसरे दैवत नाही आहे. कारण आई ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातही एक महत्वाची व्यक्ती आहे. आई हा शब्द बोलायला खूप सोपा आहे.

परंतु या शब्दामागे अपारंपार माया दडलेली आहे. आईमध्ये संपूर्ण जागा सामावलेलं आहे. प्रत्येक मुलाला लहानपणापासून ओंजारून – गोंजारून तसेच खायला – प्यायला देणारी व लाड करणारी ही आई फक्त एक अन्नपूर्णा असते.

ती कधी माया करते तर कधी रागावते. परंतु ती नेहमी दुसऱ्यांसाठीच झटत असते. आईसारखा त्याग अन्य कोणतीही व्यक्ती करू शकत नाही.

माझ्या आईचे वर्णन

माझ्या आईचे नाव अंजली असे आहे आणि तिचे वय ३५ वर्ष आहे. माझी आई माझ्यासाठी सर्वकाही आहे. तिने मला जन्म दिला म्हणून मी आज हे सुंदर जग पाहू शकलो. माझी आई खूप चांगली आहे आणि ती घरातील सर्वांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेते.

माझ्या आयुष्यात ती नेहमीच महत्वाची भूमिका निभावते. माझी आई ही एक सुंदर स्त्री आहे आणि ती माझ्या प्रत्येक चरणात माझी काळजी घेते.

आईचे प्रेम

आई हा एक ममतेचा सागर आहे. आपल्यावर संस्कार करण्यात आईचा खूप मोठा वाटा असतो. ती नेहमीच आपल्याच मुलांना चांगले संस्कार देऊन घडवते.

जो माणूस आईच्या प्रेमाचा आनंद घेतो तो या जगातील सर्वात भाग्यवान लोकांपैकी एक मानतो. कारण आईचे प्रेम हे कोणत्याही शब्दात किंवा क्रियांमध्ये व्यक्त केले जाऊ शकत नाही.

शिक्षकांची भूमिका

माझी आई मी शाळेत जाताना माझी शाळेची सर्व तयारी करते. माझे छोटेसे दफ्तर, त्यात पोळी – बाजीचा छोटासा डबा देते आणि ती मला सोडायला शाळेपर्यंत येते.

संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर आईच्या हातचे गरम – गरम पदार्थ खायला मिळतात आणि आम्ही सर्व माझे मित्र खेळायला जातो. हा आमचा रोजचा दिनक्रम असायचा. खेळून आल्यावर हात – पाय धुवून अभ्यासाला बसायचो.

ती माझ्या नेहमीच्या कामात मदत करते. मी अभ्यास करत असताना जर मला कोणतीही अडचण आढळली तर माझी आई शिक्षकांची भूमिका निभावते. ती माझी प्रत्येक समस्या सोडवते.

मेहनती आणि कष्टाळू

माझी आई खूप मेहनती आणि कष्टाळू आहे. ती सूर्य उगवण्याआधी कामाला सुरुवात करते. मी माझ्या आईकडून शिकलो आहे कि, काठो परिश्राम केल्यानेच आपल्याला यश मिळते.

ती दिवसभर आपल्या कामांमध्ये व्यस्त असते. माझी खूप चांगले आणि मधुर जेवण बनवते. पण त्याच बरोबर सर्वाणाची काळजी घेणे विसरत नाही.

माझे कुटुंब

माझ्या कुटुंबात मी माझे आई – वडील आणि माझी लहान बहीण आहे. माझी आई आम्हा सर्वाना नेहमी जीवनाचे नैतिक मूल्य शिकवते. मी माझ्या आईच्या नैतिक शिक्षणात वाढलो आहे. कारण तिने माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर मला मार्गदर्शन केले आहे.

माझी आई आमच्या कुटुंबाचे सर्व निर्णय घेते. माझे वडील सुद्धा आईकडून सल्ला घेतात कारण ती चांगल्या प्रकारे निर्णय घेण्यासाठी उत्कृष्ट आहे.

कुटुंबातील एक वृक्ष

माझी आई ही एक आमच्या कुटुंबातील एका वृक्षप्रमाणे आहे. ज्या प्रमाणे एक वृक्ष सर्वाना छाया प्रदान करतो त्याच प्रमाणे ती आम्हाला छाया देते आणि आमची खूप काळजी सुद्धा घेते.

निष्कर्ष:

माझ्या जिवनामध्ये माझ्या आई बरोबर मला सावली सारखे उभे राहायचे आहे. मला माहित आहे आज मी तिच्यामुळे या सुंदर जगात आहे. म्हणून मी माझे संपूर्ण आयुष्य आपल्या आईसाठी समर्पित करू इच्छितो. म्हणून माझी आई मला खूप प्रिय आहे आणि ती मला खूप – खूप आवडते.

Updated: नवम्बर 12, 2019 — 9:54 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *