Mother Esaay in Hindi 2

माझी आई वर निबंध मराठी – वाचा येथे Mazi Aai Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

प्रत्येकाच्या जीवनात जर महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती म्हणजे – आई. आई हा एक शब्द सोपा आहे. परंतु त्यामागे किती माया दडली आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे. हे संपूर्ण जागाच आई या शब्दामध्ये सामावले आहे.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे कि, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हे वाक्य अगदी खर आहे. आपल्याजवळ खूप पैसा असून काही फायदा नाही, पण डोक्यावर मायेने हाथ फिरवणारी आई नसेल तर आपले जीवन व्यर्थ आहे.

जन्म देऊन या जगात आणणारी आई ही एका देवाचे रूप आहे. आई ही ईश्वराच दुसर रूप आहे. त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आई.

माझी आई

dadi maa माझ्या आईचे नाव अंजली आहे. तिचे वय ३५ वर्ष आहे. माझी आई माझ्यासाठी सर्वकाही आहे. आज तिच्यामुळे मी हे सुंदर जग पाहू शकलो.

माझी आई माझी अत्यंत काळजी घेते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा एक चांगला मित्र असतो. त्याचप्रमाणे माझी आई माझा सर्वात चांगला मित्र आहे.

कुटुंबाची काळजी

संयुक्त परिवार

माझी आई आमच्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेते. ती सकाळी लवकर उठून आमच्यासाठी जेवण तयार करते. ती घरातील सगळी कामे करते.

माझा प्रत्येक दिवस हा आईसोबतच सुरु होतो. ती मला सकाळी अंथरुणातून लवकर उठवून शाळेची तयारी करते. आमच्या सगळ्यांसाठी मधुर अन्न शिजवते. माझी आई मला अभ्यास करण्यास मदत करते.

वृक्षाची संज्ञा

tree1 आज मी माझ्या आईच्या नैतिक शिक्षणात वाढलो आहे. माझ्या आईने मला माझ्या जीवनात पावलोपावली मार्गदर्शन केले. माझी आई माझ्या भावना समजते आणि वाईट प्रसंगात माझी साथ देते.

माझी आई मला शिस्तबद्ध, वेळेवर आणि विश्वासार्ह व्यक्ती म्हणून शिकवते. माझी आई ही एका वृक्षाप्रमाणे आहे जी आम्हाला च्या प्रदान करते.

माझ्या आयुष्यातील पहिला गुरु

maa मी माझ्या आईचा प्रशंसा आणि आदर करतो. तिने आम्हा सर्वाना चांगले संस्कार देऊन घडवले आहे. तसेच माझ्या जीवनातील माझी आई ही सगळ्यात पहिला गुरु आहे. ती नेहमी आम्हाला योग्य मार्ग दाखवते आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन करते.

मायेचा सागर

गंगा नदी के नाम

माझ्या साठी माझी आई ही मायेचा सागर आणि देव सुद्धा आहे. माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे. माझ्या आईची माज्यावर असणारी मायेची तुलना करता येणार नाही. कधी पण कोणत्याही वस्तूची गरज भासली तर ओठावर येणारा पहिला शब्द म्हणजे आई. म्हणून माजी आई मला खूप – खूप आवडते.

आई शब्दाची भावना

माँ का कार्य

आई हा शब्द भावना आणि प्रेमाने भरलेला असतो. परंतु याअमूल्य शब्दाचे मूल्य खरोखरच मुलांना समजते. म्हणून ज्या व्यक्तीकडे आई आहे त्या व्यक्तीला अभिमान वाटला पाहिजे.

पण या जगात अशी मुले आहेत जी मोठी झाल्यावर आपल्या आई – वडिलांना वृद्ध होताना ओझ समजतात. तर काही स्वार्थी मुले आपल्या आईला वृद्ध आश्रमात पाठवितात. ही एक लाजिरवाणी घटना आहे.

निष्कर्ष:

आई ही ममतेचा सागर आहे. आईची तुलना ही जगामध्ये दुसऱ्या कोणाशीही करता येणार नाही. अशी आपली आई असते. आई इतके प्रेम, ममता आणि संस्कार दुसर कोणीही देऊ शकत नाही.

आज आम्ही सर्व आईमुळे या सुंदर जगात आहोत. त्यांनी आपल्यासाठी दिन – रात एकत्र करून आपल्याला घडविले. त्या आई – वडिलांची सेवा करायला हवी.

Leave a Comment