माझे बालपण

माझे बालपण मराठी निबंध – वाचा येथे Maze Balpan Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

बालपण जगातील सुंदर आठवण आहे. प्रत्येक व्यक्तीला बालपणीच्या आठवणी या रम्य भूतकाळात घेऊन जातात. मग बालपण हे श्रीमंत असे किंवा गरिबीचे असो तसेच मुलगा किंवा मुलगी हे कडू – गोड आठवणीनी भरलेले असते.

बालपणातील दिवस हे खूप आनंदाचे असतात. प्रत्येकाला त्याचे बालपण हे आठवतच. अशी कोणी व्यक्ती नसेल की, तिला आपले बालपण आठवत नाही असं.

बालपण हे प्रत्येक व्यक्तीला एकदाच मिळते. म्हणून ते हवेहवेसे वाटते आणि सर्वजण बालपणीच्या आठवणी जपून ठेवतात. त्याच प्रमाणे माझे बालपण सुद्धा खूप आनंददायी होत आणि माझे बालपण हे गावात घालवल.

म्हणून म्हटले गेलं आहे की, “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” हे अगदी खरे आहे. ते आयुष्य म्हणजे खूप छान आणि गोड असते. जिथे स्वार्थाची भावना नसते, खोटेपणा नसतो, फसवेगिरी नसते आणि अभिमान सुद्धा नसतो.

माझे बालपण

Maze Balpan माझे बालपण हे एका छोट्याश्या गावात झाले. आम्ही गावातील सर्व मुले लहान असताना खूप मजा करायचो.

तसेच मी घरामध्ये सर्वात छोटा असल्यामुळे घरातील सर्व माणसे ही माझे खूप लाड करत असत. त्यावेळी लहान वयात विविध प्रकारचे खेळ खेळणे आणि फिरायला जेणे हीच प्रमुख कामे होत असत.

खरंच बालपणातील दिवस खूप गोड आणि मनोरंजक असतात. तसेच लहानपणी मी खूप खोडकर आणि चंचल असल्यामुळे मी कधी – कधी ओरडा सुद्धा खायचो.

परंतु तेवढच मला प्रेम आणि आपुलकी सुद्धा मिळत होती. मी लहान असताना दही चोरून खायचो. त्यामुळे आई माझ्यावर रागवायची.

मी लहान असताना अनेक खेळ खेळायचो. जसे की कबड्डी, खो – खो, धावणे, लंगडी, विटी दांडू इ खेळ खेळायचो. हे खेळ खेळत असताना कधी संध्याकाळ व्हायची समजायचं नाही. माझी आई मला ओरडायची की जेवण तरी वेळेवर करत जा. परंतु लहानपणी खेळ खेळत असताना भूक लागायची नाही.

शेतीची माहिती

किसानों के लिए योजना

कधी – कधी मी माझ्या बाबां बरोबर शेतात जात असे. बाबा मला शेतीबद्दल माहिती द्यायचे. तसेच ते तेथील राहणारे प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल सुद्धा सांगायचे. शेतातली वातावरण हे एकदम शांत असायचा. तिथे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट कानी ऐकू येत असे.

पावसाळा सुरु होताच मी आणि माझे सर्व मित्र पावसाच्या पाण्यामध्ये भिजायचो. पाऊस पडल्यामुले गावातील छोटे – छोटे तळे हे पाण्याने भरून जात असत. मी आणि माझे मित्र त्यामध्ये जाऊन उडी मारायचो. हे सर्व करताना आम्हाला खूप मजा वाटायची. पावसात भिजल्यामुळे आम्हाला सर्दी सुद्धा व्हायची.

झुला बांधणे

झुला बांधणे

लहान असताना मी आणि माझी बहीण खेळण्यांसाठी भांडायचो. परंतु बालपणात काय योग्य आहे आणि काय नाही हे माहित नसायचं. बालपण एवढा छान असत की.

मोठे झाल्यावर आपल्याला बालपणाची आठवण येते. जेव्हा श्रावण महिना चालू होताच घरा बाहेरील झाडांवर झुला बांधायचो. आमच्या गराच्या बाजूला एक कडुनिंबाचे झाड देखील होते.

विविध प्राणी

विविध प्राणी

लहानपणी आमच्या घरामध्ये गाय, बकरी, म्हशी आणि शेळ्या असायच्या. त्यांच्या लहान मुलांबरोबर आम्ही खूप खेळायचो. तसेच आमच्या घरात एक शेरू नावाचा एक कुत्रा होता.

मी कुठेही गेलो तरी तो कुत्रा माझ्या बरोबर यायचा. शेरू हा दिसायला खुप सुंदर होता. त्याला घरातील व्यक्तींपेक्षा अन्य अनोळखी व्यक्ती दिसली की तो भुंकायला सुरु करत असे.

निष्कर्ष:

माझे खूप मजेत गेले आहे आणि मी माझ्या बालपणात खूप मजा केली. माझ्या बालपणातील अजूनही गोड आठवणी माझ्या मनात कायम आहेत. म्हणून मला अजूनही असं वाटत की जर मला पुन्हा माझं बालपण मिळालं असत.

Leave a Comment