मेरा देश

माझा देश निबंध मराठी – वाचा येथे Maza Desh Essay in Marathi

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

भारत हा माझा देश आहे. माझा देश सर्वात प्राचीन आणि महान आहे. मी या भारत देशाचा एक नागरिक आहे. माझा भारत देश एक विश्व प्रसिद्ध देश आहे.

संपूर्ण जगामध्ये माझ्या भारत देशाचा सातवा क्रमांक लागतो आणि लोकसंखेच्या दृष्टीने भारत देशाचा दुसरा क्रमांक लागतो. माझा भारत विविधता आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. माझ्या भारत देश केवळ नावानेच मोठा झालेला नाही.

परंतु या देशाची मातीची महानता सुद्धा भिन्न आहे. या देशातील काही लोक या मातीला आपली माता मानतात.

भारत देशाची नावे

माझ्या भारत देशाला अनेक नावानी ओळखले जाते. जसे कि भारत, इंडिया, हिंदुस्तान, आर्यव्रत आणि सोने कि चिडिया इ. माझ्या भारत देशाला भारत हे नाव भरत राजाच्या नावावरून पडले आहे.

विविध धर्म आणि भाषा

अलग अलग धर्म के लोगमाझ्या भारत देशामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक एकजुटीने नांदतात. जसे हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध, फारसी, शीख इ आणि प्रत्येक धर्माची भाषा ही वेगवेगळी आहे. माझा भारत देश हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे.

सभ्यता आणि संस्कृती        

विभिन्न देश और धर्ममाझ्या भारत देशाची हडप्पा आणि सिंधू संस्कृती ही ४००० वर्षांपेक्षा अधिक पुराणी आहे. या देशाची संस्कृती ही अन्य देशांपैकी भिन्न आहे.

भारत देशात राहणारा प्रत्येक मानव आपल्या संस्कृती आणि परंपरेच पालन करतो. म्हणून हा देश संस्कृती आणि विविधतेसाठी ओळखला जातो.

ऐतिहासिक स्थळ

javlicha माझा भारत देश एक असा देश आहे जिथे लाल किल्ला, सुवर्ण मंदिर, ताजमहाल, निलगिरी, काश्मीर, अजिंठा आणि एलोरा सारखी अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत.

तसेच माझ्या भारत देशात अन्य पर्वतांचा खजिना आहे. या भारत देशात हिमालय सारखा सर्वात मोठा पर्वत आहे.

महान पुरुषांचा देश

महान पुरुषमाझ्या या भारत भूमीवर अनेक महान पुरुषांचा जन्म आहे. जसे कि छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादि. अनेक महान पुरुषांनी या भारत भूमीवर जन्म घेऊन या धरतीला अजून महान बनविल.

देशाला स्वातंत्र्य

देश को स्वतंत्रतामाझ्या भारत देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. जसे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यासारख्या महान नेत्यांनी ब्रिटीश सरकारपासून आपली सुटका केली आणि १५ ऑगस्ट, १९४७ साली आपल्या भारता देशात देशाल ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त केले.

ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यानंतर विविधता मध्ये एकता ही संकल्पना भारतीयांचा मनात उदयाला आली. त्याच बरोबर स्वतंत्र भारताने आपले लोकशाही पद्धतीने आपले राज्य सुरु केले.

भारताचे सण

माझ्या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. जसे होळी, दिपावली, गणेश उत्सव, मकर संक्रांति, दसरा इ अन्य सण विविध धर्माचे आणि जातीचे लोक एकसाथ साजरे करतात.

विद्वानांची खाण

पसायदानमाझ्या भारत देशात विद्वानांची खाणच आहे. त्यामुळे आज आपण अवकाशयान सोडण्या पर्यंत प्रगती करू शकलो. त्यापैकी एक होते डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम. आज आम्ही त्यांच्यामुळे अमेरिकच्या तोडीस तोड देऊन खगोल शास्त्रात प्रगती करू शकलो.

असे म्हटले जाते कि, जर सैन्य बळ आणि शास्त्र बळ नसेल तर कोणताही देश विकास करू शकत नाही. म्हणून आर्थिक दृष्ट्या राज्यकर्त्यांनी सैन्य बळ आणि शस्त्र बळ वाढवून आज भारत देशाने कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्या इतपत प्रगती केली आहे.

निष्कर्ष:

माझा भारत देश हा विविध कला गुणांनी सजलेला आहे. माझ्या भारत देशाने अनेक संकटाना सामोरे जाऊन आज खूप प्रगती केली आहे.

यासाठी मला माझा भारत देश खूप – खूप आवडतो आणि माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे. तसेच माझ्या देशावर मला गर्व आहे.

Leave a Comment