माझा देश मराठी निबंध – वाचा येथे Maza Bharat Essay in Marathi

प्रस्तावना:

माझ्या देशाचे नाव भारत असे आहे. माझा भारत देश हा सर्वात प्राचीन आणि महान आहे. माझ्या भारत देशामध्ये विविध धर्माच्या लोकांमध्ये विविधतेची भावना दिसून येते. माझा भारत देश हा जगातील सर्व प्रसिद्ध देशांपैकी एक आहे.

माझ्या भारत देशाचा लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसरा क्रमांक लागतो. तसेच हा जगातील सातवा विशाल देश आहे. माझ्या भारत देशाची संस्कृती आणि सभ्यता ही हजारो वर्षांपूर्वीची आहे.

विविध धर्माचे आणि जातीचे लोक

माझ्या भारत देशात विविध जातीची आणि धर्माचे लोक राहतात. जसे की हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन इ. तसेच माझ्या भारत देशात अनेक भाषा बोलल्या जातात. म्हणून माझ्या भारत देशाला धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो.

भारत देशाची विविध नावे

माझ्या भारत देशाला विविध नावांनी ओळखले जाते. माझ्या भारत देशाला प्राचीन काळी ‘आर्यव्रत’ या नावाने ओळखले जात होते.

तसेच माझ्या भारत देशाला ‘सुवर्ण पक्षी’ असे म्हटले जात होते. माझ्या भारत देशाला भारत हे नाव राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत याच्या नावावरून पडले.

देशाचे राष्ट्रीयत्व

माझ्या भारत देशाची लोकसंख्या ही १०० कोटींपेक्षा जास्त आहे. या भारत देशात २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश आहेत. माझ्या भारत देशाची राष्ट्रीय भाषा हिंदी आहे.

तसेच माझ्या भारत देशाचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि राष्ट्रगान जन – गण – मन हे आहे. त्याच बरोबर माझ्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी – मोर, राष्ट्रीय फुल – कमळ, राष्ट्रीय ध्वज – तिरंगा, राष्ट्रीय खेळ हॉकी, राष्ट्रीय प्राणी – वाघ आहे.

कृषिप्रधान देश

माझा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश लोक हे खेड्यात राहतात आणि शेती हा व्यवसाय करतात. माझ्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून आहे.

माझ्या भारत देशात मका, ज्वारी, बाजरी, गहू, ऊस आणि तांदूळ इ.ची शेती केली जाते. सिंधू संस्कृतीपासून माझ्या भारत देशात शेती हा व्यवसाय केला जाऊ लागला. खेड्यात राहणाऱ्या लोकांनाच उदार निर्वाह हा शेतीवर अवलंबून असतो.

महान पुरुषांची भूमी

माझा भारत देश हा महान पुरुषांचा देश म्हणून ओळखला जातो. माझ्या या भारत भूमीवर राम, कृष्ण, महावीर, गौतम बौद्ध, तुलसीदास, कबीर दास अशा महान पुरुषांचा जन्म झाला आहे.

तसेच महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, भगतसिंग, लाल बहादूर शास्त्री अशा स्वतंत्रता सैनिकांचा आणि शूर योद्ध्यांचा जन्म झाला आहे.

भौगोलिक परिस्थिती

माझ्या भारताचा भूगोल सांगायचा झाला तर भारताच्या उत्तरेला गगनाला भिडणारा हिमालय पर्वत आहे. तसेच माझ्या भारत देशाला लांबलचक किनारा लाभला आहे.

त्याच बरोबर माझ्या भारत देशात वेगवेगळे ऋतू येऊन या निसर्गाची शोभा वाढवतात. माझ्या भारत देशात वाळवंटातील जमीन आणि घनदाट जंगल आहे. तसेच गंगेचे मैदान आणि पठार आहे, समुद्र आहेत.

माझ्या भारत देशातील यमुना, कृष्णा, गोदावरी, भीमा, नर्मदा यांसारख्या पवित्र नद्या वाहतात. माझा भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. या देशात निसर्गाची खाण आहे.

निष्कर्ष:

माझा भारत देश जगाच्या नकाशामध्ये केवळ आपल्या परंपरा आणि संस्कृतीमुळेच ओळखला जात नाही तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात सुद्धा मजाही भारत देश मागे नाही.

माझ्या भारत देशासमोर किती संकटे आली तरी माझा देश सर्व संकटांवर मात करून आज प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे.

म्हणून माझा भारत देश हा सर्वात महान आहे आणि मला माझा देश खूप – खूप आवडतो. मला माझ्या देशावर खूप प्रेम आहे.

Updated: December 16, 2019 — 1:02 pm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *