माझा आवडता संत मराठी निबंध -वाचा येथे Maza Avadta Sant Essay in Marathi

प्रस्तावना:

प्राचीन काळापासून आमचा भारत देश महान संतांचा, तत्त्वज्ञानाचा आणि ऋषींचे देश म्हणून ओळखला जातो. या भारत भूमीवर अनेक संतांचा जन्म झाला आहे.

आध्यात्मिक हा त्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनलेला आहे. संतानी लोकांना आपल्या शिकवणीतून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकताची भावना निर्माण करून त्यांना त्याचे महत्त्व समजून सांगितले आहे.

या संत परंपरेतील संत ज्ञानेश्वर हे एक महान संत होऊन गेलेत. संत ज्ञानेश्वर हे माझे आवडते संत आहेत. हे तेराव्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत. संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे अनमोल रत्न होय.

संत ज्ञानेश्वर यांचा जन्म

संत ज्ञानेश्वर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.

निवृत्ती नाथ, ज्ञानदेव, सोपान देव आणि त्यांची बहिण मुक्ताबाई अशी ही चार भावंडे होती. विठ्ठलपंत हे मुळात संन्यासी होते.

विठ्ठलपंत तीर्थ यात्रा करत – करत आळंदी येथे येऊन स्थायिक झाले. परंतु त्या काळी त्यांना संन्यासाची मुले म्हणून हिणवत असत. म्हणून ज्ञानेश्वराच्या आई – वडिलांनी देहत्याग केला.

निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गुरु

निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर सद्गुरू होते. ज्ञानेश्वरांनी नेवासा क्षेत्रात आपल्या सद्गुरूंच्या कृपेने भगवद गीतेवर टीका लिहिली. या ग्रंथास ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हटले जाते.

ज्ञानेश्वरांनी भगवद गीतेतील विचार आणि तत्वज्ञान सामान्य लोकांना कळावे म्हणून त्यांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीत लिहिला.

संबंधित लेख:  जय जवान, जय किसान मराठी निबंध - येथे वाचा Jai Jawan Jai Kisan Essay in Marathi

अमृतानुभव ग्रंथ

ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या लेखनानंतर त्यांनी तीर्थयात्रा केली. या तीर्थ्यात्रचा उल्लेच संत नामदेवांच्या तीर्थावळी यामध्ये आढळतो.

त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेव यांच्या समाधी या अभंगात तत्कालीन संदर्भ सापडतो.

संतांची मानसिक स्थिती, त्याच्या सह समाजाला झालेले दु:ख, संत नामदेवांच्या वेदना आणि ज्ञानेश्वरांचा संयम या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधी अभंगात आढळून येते.

पसायदान

संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाची रचना केली. पसायदान विश्व कल्याणाची प्रार्थना म्हणजे वैश्विक सद्भावनेचा आणि प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. ज्ञानेश्वरीत कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग सांगणाऱ्या सुमारे ९०० ओव्या आहेत. तसेच हा ग्रंथ सन १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.

आता विश्वात्मके देवे ! येणे वाग्यज्ञे तोषावे !

                      तोषोनि मज द्यावे ! पसायदान हे !!

           जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रती लाभो !!

                       भूता परस्परे “घडो !” मैत्र जीवाचे !!

हा विश्व बंधुत्वाची प्रेरणा देणारा ग्रंथ जगता अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाला आहे. या ग्रंथामुळे भारतीय लोकांचेछ नव्हे तर या जगात भारतीय संस्कृतीकडे, संत वाड्मयाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजही जगामध्ये ज्ञानेश्वरीचे अध्ययन चालू आहे.

लहान असताना ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही भिक्षा मागून अन्न खात असत. एके दिवशी भाकऱ्या भाजण्यासाठी खापर कोणी दिले नाही. म्हणून त्यांच्या छोट्या बहिणीने मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाकरी थापल्या.

संबंधित लेख:  निसर्ग मराठी निबंध - येथे वाचा Essay on Nisarg in Marathi

जेव्हा योगी चांगदेव वाघावर बसून माऊलीकडे यायला निघाले होते तेव्हा त्यांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडांसह अर्धवट बांधलेल्या भिंतीवर बसून गेले. तसेच त्यांनी कर्मठ पंडिता समोर ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद बोलून दाखवला.

समाधी

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या वयाच्या २१ व्या वर्षी सन १२९६ मध्ये पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

निष्कर्ष:

संत ज्ञानेश्वर हे एक महान संत आहेत. ज्यांनी संत नामदेव यांच्या जोडीने भागवत धर्माचा प्रसार केला. आज तरीपण ७०० वर्षांची परंपरा असेलेला वारकरी संप्रदायाचे अनुयायी महाराष्ट्रात लाखो संख्येने आहेत.

संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आलेत. असे सर्व प्रसंग ज्ञानेश्वरांचे मोठेपण आणि दिव्यशक्तीचा प्रत्यय देतात.

Updated: November 12, 2019 — 7:41 am

Leave a Reply

Your email address will not be published.