प्रस्तावना:
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांना खूप महत्व असते. तसेच त्यांना महत्वाचे स्थान दिले जाते. शिक्षकांना एका देवापेक्षा सर्वात उच्च स्थान दिले जाते. कारण शिक्षक तेच असतात जे मुलांमध्ये विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती विकसित करतात.
आई – वडील हे आपल्या जीवनाचे पहिले गुरु असतात पण त्यानंतर एक शिक्षक हि मुलांना पूर्ण रूपाने घडवण्याचे काम करतात. शिक्षक प्रत्येक मुलाला त्यांचे जीवनाविषयक ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतात.
एक शिक्षका शिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सफल होऊ शकत नाही आणि आपल्या जीवनात यश मिळवू शकत नाही. असे काही शिक्षक आहेत जे मुलांच्या जीवनासाठी आणि प्रेरणा बनतात.
माझे आवडते शिक्षक
काळे सर हे सर्वांचेच लाडके आहेत आणि मला पण ते खूप आवडतात. त्यांची शिकवण्याची पद्धत इतर शिक्षकांपेक्षा वेगळी आहे. ते आम्हाला गणित आणि इंग्रजी हा विषय शिकवतात. काळे सर सातवी ते दहावीच्या मुलांना शिकवतात.
जर मुलांना काही येत नसेल आणि समजत नसेल तर त्या मुलांकडे जास्त लक्ष देतात. त्याच मुलांकडून ते मेहनत करून घेतात. परंतु काही सर असे असतात कि मुलांना त्यांना बाहीतल्यावरच भीती वाटते.
पण काळे सरांच्या बाबतीत असे काही नाही आहे. ते सगळ्या बरोबर मिळून – मिसळून राहतात आणि खूप गंमत – जंमत करून शिकवतात. त्यामुळे काळे सर हे सर्वांचे लाडके सर आहेत.
शिकवण्याची पद्धत
काळे सर हे केवळ शिक्षकच नव्हे तर माणूस म्हणीन देखील खूप चांगले आहेत. आमच्या शाळेमध्ये जेव्हा एका विद्यार्थ्याकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा स्वतः त्यांनी त्या मुलाचे पैसे भरले होते.
काळे सर जरी गणित आणि इंग्रजी हे विषय शिकवत असले तरी ते इतर विशयानाचे ज्ञान पण खूप चांगले देतात. ते आम्हाला शिकवताना खूप सारी उदाहरणे देऊन शिकवतात. त्यामुळे पाठ किंवा कविता समजण्यास व लक्षात ठेवण्यास खूप सहायता होते.
काळे सर जेव्हा आम्हाला धडा शिकवतात तेव्हा ते खूप सारे किस्से सांगतात. त्यामुळे कठीण असलेले पाठ शिकवताना सोपे आणि मजेदार वाटतात.
खेळांची माहिती
काळे सर हे आमचे इतके वाढते शिक्षक आहेत कि, त्यांचा तास कधी येतो याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो.
काळे सर मनाने खूप चांगले आहेत आणि ते आमची प्रत्येक समस्या समजून घेतात आणि त्यावर नक्कीच तोडगा काढतात. हे सर फक्त आम्हाला अभ्यासच करायला सांगत नाही तर खेळायला सुद्धा सांगतात. ते खेळांचे नियम आम्हाला समजावून सांगतात.
ते आम्हाला सांगतात की, अभ्यासा एवढेच खेळ सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे असतात. कारण खेळ खेळल्याने मानसिक आणि शारीरिक विकास होतो.
माझ्या आयुष्यात महत्वाचे स्थान
ज्या प्रमाणे माझ्या जीवनात माझ्या आई – वडिलांचे जसे स्थान आहे. त्याच प्रमाणे माझ्या शिक्षकांचे सुद्धा मोलाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे स्थान सर्वात अधिक असते.
कारण आपल्याला घडवण्यात जसा आई – वडिलांचा हात असतो. त्याचप्रमाणे शिक्षकांचा सुद्धा मोलाचा वाटा असतो. शिक्षकांनी केले संस्कार हे फार मोलाचे असतात. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. तो प्रत्येक वळणावर शिकत असतो मग ते आई – वडिलांकडून असे किंवा मित्र मंडळींकडून. काळे सिरानी आम्हाला घडविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
ते आमच्यावर आईसारखे प्रेम करतात वडिलांसारखी शिस्त लावतात. ते आमहाला क्षणात आणि सुस्वभावामुळे आपलेसे वाटतात.
निष्कर्ष:
माझे शिक्षक मला फक्त पुढे जाण्यातच मला प्रेरणा देत नाहीत तर माझ्यामध्ये सकारात्मक भावना देखील जागृत करतात. आज त्यांच्यामुळेच मी एक आदर्शवादी बनू शकलो. म्हणून माझे शिक्षक मला खूप – खूप आवडतात.