प्रस्तावना:
छंद सर्वांनाच असतात, कोणाला वाचनाची, कोणाला, खेळण्याची, कोणाला गाण्याची. माझा पण एक छंद आहे.
माझा आवडता छंद
माझा आवडता छंद म्हणजे खेळ. कोणता असा एक खेळ नाही, पण सगळे खेळ मला खेळायला आवडत. जसे कबड्डी, फुटबाल, खो-खो, लंगडी, पण सर्वात जास्त आपले मैदिनी खेळ आवडतात. लहान पण पासूनच खेळाची आवड आहे, कारण मुली लहान वाया मध्ये जिथे बहुला-बाहुली चे खेळ खेळायचे तीथे मी फुटबाल घेऊन खेळायचे. आई ने माझे हे लाड खरच पुरवले आहेत. एकाद्या मुलासारखे तिने मला जपले आहे. माझीआवड पूर्ण केली आहे.
खेळताना ची मज्जा
या सर्व आवडी मधून माझा आवडता खेळ म्हणजे कबड्डी. लहान पासून याची आवड आहे. हा खेळ कसा खेळायचा हे माहित नसायचे पण चार-पाच मुली, आणि चार-पाच मुले, अशी आम्ही सर्व मित्र आमच्या घराजवळच्या मैदानात हा खेळ खेळायला जमा व्हायचो.
खेळताना हा खेळ कसा आहे माहित न्हवते पण एक मुलगा किवा मुलगी दुसऱ्यागटात जाऊन कबड्डी कबड्डी करत इकडे तिकडे धावायची आणि त्यांना आउट करण्याचा प्रयत्न करयचो. इतकी मज्जा यायचीकि विचारू नका.
आईचा मार
खेळताना कळायचे नाही कि कुठे लागले, कुठे रक्त आले, कुठे कपडे फाटले हे काही माहित पडत न्हवते. बस खेळायची मज्जा घायची एवढेच माहित असायचे. आणि घरी जाऊन हे सर्व पाहिल्यावर आईचा जो ओरडा बसायचा तो तुम्हा सर्वांनाच माहित आहे.
कब्बडी
कबड्डी हा नुसता आता खेळ नाही राहला माझ्यासाठी. जस जसे मोठी होऊ लागले तास तसे त्याची रुची आणखी वाढली.शाळेत असताना ५वि किवा ६वि ला शाळेत कबड्डी प्रशिक्षण देणारे एक सर आले आमच्या शाळेत हा खेळ न्हवता. पण ते ज्या पद्धतीने याची माहिती देत होते,त्याने माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली कारण मला याचे प्रशिक्षण घ्यायचे होते. आणि ती हीच संधी होती.
म्हुणून शेवटी आमच्या शिक्षकांनी विचारले ज्याला कबड्डी शिकायची असेल त्यांनी आपले हात वर करा. आणि त्यात माझा हात पहिला वर केला गेला.जणूं असे वाले कि, मी आभाळाला स्पर्श केला आहे.
माझी वाटचाल
माझे प्रशिक्षण शाळे मध्ये सुरु झाले, खूप मुला मुलिनी यात भाग घेलता. शाळा सुटल्या नंतर आमचा सराव सुरु व्हायचा. लहान असताना जे खेळायचो मज्जा म्हणून तो माझा छंद बनला होता. पण तेव्हा सराव करतना खूप अडचणी आल्या, सरावात लागायचे, काही चुकले तर सर मारायचे पण रडत रडत का होईना खेळायचे आहे आणि शिकायचे पण आहे, ऐवढेच माहित होते फक्त.
पहिला सामना
जस जसे याची माहिती मिळत गेली सराव वाढत गेला, तास तसे मी यात पारंगत होत गेली, आणी आज तो दिवस होता, तो म्हणजे माझा पहिला सामना ज्यात मी एक रायडर म्हणून खेळणार होते. खूप भीती होती मनात सामोरचा संघ ज्यांना मी ओळखत नाही, त्यांच्या सोबत मला आज खेळायचे होते. हात पाय थंड झाले होते, काहीच सुचत न्हवते. कसे खेळणार काही माहित न्हवते. बस शिक्षकांनी काही सूचना दिल्या होत्या. त्या पद्धतीने खेळायचे एवढाच विचार होता मनात.
शेवटी पंचानी शिटी वाजवून खेळाची सुरवात करयला सांगितली आणि मी मैदानाच्या पाया पडून आत गेले. कबड्डी कबड्डी बोलणे चालू होते. आणित्या सर्वांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यातून सुटून मी माझ्या गटात परत आले आणि पंचानी शिटी वाजावून ४ गाडी बाद अशी घोषणा केली तेव्हा जो आनंद मनात होता तो तिथे व्यक्त करू शकत न्हवते.
त्याचा विजय
तो सामना आम्ही जिंकलो आणि या सामन्यात मला उत्तम रेडर साठी पारितोषिक देण्यात आले. घरच हा खूप सुखद प्रवास होता.
सारांश
म्हणून मला कबड्डी हा खेळ खूप आवडतो.