प्रस्तावना:
आमच्या भारत देशातील उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंपैकी पावसाळा हा एक महत्वाचा ऋतू आहे. प्रत्येक ऋतूचे आपले मुख्य वैशिष्ट्य आणि महत्त्व असते. तसेच हा सर्वांचा आवडता ऋतू आहे.
पावसाळा या ऋतूला पर्यटन संस्थेने ‘हिरवा ऋतू’ अशी संज्ञा दिली आहे. पावसाळा या ऋतूमुळे निसर्गात खूप सारे बदल होतात. हा पाऊस येताच मन खूप प्रसन्न होते. पावसाला भूगोलात पावसाळा किंवा मान्सून असे म्हटले जाते.
पावसाचे आगमन
सगळी माणसे पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण भयंकर उन्हामुळे सर्व सजीव सृष्टी आणि मानव खूप त्रस्त झालेला असतो. म्हणून या पावसाचे आगमन होताच सर्व सृष्टी प्रसन्न होते.
पावसाच्या पूर्वीची स्थिती
पाऊस पडायच्या आधी सर्व माणसे उकाडत्या उन्हामुळे खूप हैराण झालेली असतात. तसेच संपूर्ण धरती ही तव्या समान तापलेली असते. सगळी झाडे – झुडपे आणि वनस्पती या सुकून जातात. त्याच बरोबर पाण्याचे सगळे स्रोत सुखतात.
जसे कि नदी – नाले, विहिरी, तलाव हे सर्व पाण्याचे स्रोत सुकून जातात. त्यामुले प्राणी आणि पक्षी व्याकुळ होऊन पाण्याचा शोधात असतात. तसेच सगळे लोक दुखी होऊन पावसाची वाट बघत असतात.
पावसाच्या पाण्यामुळे झाडे – झुडपे आणि गवत हिरवेगार सुंदर आणि मोहक दिसू लागते. तसेच झाडांना नवीन पालवी येते.
पहिला पाऊस म्हणजे
सारा निसर्ग हा ओलाचिंब होतो आणि मातीतून सुगंध वास येतो. पहिला पाऊस म्हणजेच जणू काही घरादारांची, वृक्षवेलींची पहिली अंघोळच. या पहिल्या पावसामध्ये लहान – मोठी माणसे भिजून या पावसाचा आनंद घेतात.
छत्र्या व रेनकोट
दरवर्षी येणाऱ्या या पाहुण्याच्या स्वागतासाठी तयारी करतात. सर्वजण विविध रंगांच्या छत्र्या आणि रेनकोट खरेदी करतात.
जे लोक या पाहुण्याच्या स्वागतासाठी तयारी करत नाही त्यांची मात्र तारांबळउडून जाते. चार महिन्यांसाठीच येणार हा पाहून आमहा सर्वाना आनंदित करून जातो. तर कधी – कधी हा पाऊस अखंड धो – धो कोसळत राहतो.
निसर्गाची सुंदरता
पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच – पाणी होते. संपूर्ण वातावरण स्वच्छ होऊन जाते. झाडांना पाणी मिळते व पावसाच्या पाण्यामुळे झाडे – झुडपे आणि गवत हिरवेगार सुंदर आणि मोहक दिसू लागते.
तसेच झाडांना नवीन पालवी येते. पावसाच्या पाण्यामुळे घरांची छपरे धुवून निघतात. सगळे प्राणी आणि अक्षी आनंदित होऊन नाचू लागतात. पावसामुळे पाण्याचे सर्व स्रोत तुडुंब भरून वाहू लागतात.
पावसाळ्यात सर्व मैदाने आणि बगीचे हिरवेगार दिसू लागतात. पावसाळ्यात असं वाटत की, जणू काही या निसर्गाने हिरवा शालू पांघरला आहे.
मानवाचे नुकसान
सर्वजण ज्याचीआतुरतेने वाट बघत असतात तो पाऊस म्हणजे कधीतरी मानवाचे खूप नुकसान देखील करतो. कधी – कधी इतका पडतो की, लोकांना बाहेर जाणे सुद्धा अवघड जाते.
तसेच नदी – नाल्यांना पूर येतो. समुद्राला मोठी भरती येऊन पाणी शहरात आणि गावात वाहत येते. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. डोंगर आणि दरडी कोसळतात व माणसांची जीवित हानी सुद्धा होते.
निष्कर्ष:
पावसाळा हा ऋतू सर्व सृष्टीचा आणि संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे. तो सर्व चराचरात नवीन चैतन्य निर्माण करतो. त्याचप्रमाणे तो धरणी मातेला सुजलाम – सुफलाम बनवतो. त्यामुळे पावसाळा या ऋतूला सर्व ‘ऋतूंचा राजा’ असे म्हटले आहे.