Banyan Tree

वृक्ष वर निबंध मराठी – वाचा येथे Marathi Essay on Trees

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

मानव आणि पर्यावरण यांचे अतूट नाते आहे. या पर्यावरणावर मानव पूर्णपणे अवलंबून आहे. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे, ज्यावर मानव जीवन आहे.

त्याच बरोबर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. जसे कि पाणी, भूमी, हवा या धरतीवर वृक्ष हे पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहेत. वृक्ष मानवाच्या जीवनात आपली महत्वपूर्ण भूमिका निभावतात.

म्हणून संतानी म्हटले आहे कि, “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरी” “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” असे निसर्गाबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे.

मानव आणि पर्यावरण

पर्यावरण2 1मानव आणि पर्यावरण हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. मानवाचे जीवन वायू, अग्नी, आकाश, जल या तत्वांवर अवलंबून आहे.

मानवाला या पर्यावरणातून अनेक गोष्टी प्राप्त होतात. वृक्षांमुळे मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच झाडे सर्व सजीवांना आणि मानवाला शुद्ध ऑक्सीजन देतात आणि वृक्ष कार्बन डाय ऑक्साइडला अवशोषित करतात.

तसेच मानवाला वृक्षांपासून फळ, फुल आणि भोजन मिळते. त्याच बरोबर त्याला झाडांच्या लाकडापासून इंधन प्राप्त होते.

वृक्षांचा उपयोग

पर्यावरणातील घटकवृक्ष मानवाला उन्हाळ्यात सावली प्रदान करतात. तसेच मानव वृक्षांच्या लाकडाचा उपयोग इंधनासाठी करू लागला आहे.

वृक्षांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि विविध प्रकारची लाकडी खेळणी तयार केली जातात. त्याच बरोबर मानवाला वृक्षांपासून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग घर बांधण्यासाठी करतो.

वृक्षांपासून मानव उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल तयार करतो. त्याचप्रमाणे वृक्षांपासून रबर, कागद, माचीस आणि औषधे तयार केली जातात.

वृक्षांचे महत्त्व

Tree Plantation मानवाच्या जीवनात वृक्षांचे भरपूर महत्त्व आहे. वृक्ष हे सर्व पक्ष्यांचे निवास स्थान आहे. ज्या प्रकार मानवाला राहण्यासाठी घराची आवश्यकता असते.

त्याच प्रमाणे पक्षी वृक्षांवर आपला घरटा बांधून राहतात. वृक्ष जमिनीला सुपीक बनविण्यास मदत करतात. त्यामुळे आम्ही चांगली पिके घेतो.

हिंदू धर्मात वृक्षांचे महत्त्व

पेड़ों की पूजाआमच्या भरतीत संस्कृतीमध्ये वृक्षांना विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये काही वृक्षांची पूजा केली जाते.

जसे कि वड, पिंपळ इ अनेक वृक्षांची पूजा केली जाते. तसेच काही वृक्षांचा उपयोग हा हिंदू धर्मात पूजा – पाठ मध्ये केला जातो.

वृक्षांची तोड

पेड़ पौधों की रक्षाया पर्यावरणातून मानवाला भरपूर काही मिळू लागले आहे. त्या सर्व मिळणाऱ्या गोष्टींचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत आहे.

म्हणून आज मानव आपल्या स्वार्थापायी इतका आंधळा झाला आहे कि, तो दररोज वृक्षांची तोड करत आहे. मानव वृक्षांची तोड करताना आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेत आहे.

या धरतीवर वृक्षांची तोड झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. अन्य प्रकारच्या प्रदुषणाच्या समस्या निर्माण होत आहेत. तसेच ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण होत आहे.

वृक्ष संवर्धन उपाय

बरगद पेड़ के लाभ सर्व लोकांनी वृक्षांचे महत्त्व समजून घेऊन जगजागृती सुरु केली पाहिजे. तसेच सरकारला वृक्ष तोडण्यास प्रतिबंध केला पाहिजे. जो माणूस वृक्ष तोडेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आज आपल्या भारत देशात २१ मार्चला जागतिक वनदिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावणे गरजेचे आहे. जर प्रत्येक व्यक्तीने एक झाड जरी लावला तरी एका गावात जंगल तयार होईल.

निष्कर्ष:

वृक्ष आपल्या जीवनात सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका निभावतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. त्याच बरोबर झाडांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे जतन केले पाहिजे.

आपणा सर्वांनी मिळून झाडे लावून, झाडे जागवून आपल्या भारत भूमीला सुजलाम सुफलाम सश्य श्यामलाम बनवले पाहिजे.

Leave a Comment