बरगद पेड़ के लाभ

वृक्ष आपले मित्र मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Trees our Friend

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

वृक्ष हे निसर्गातील सर्वात महत्वाचा घटक आहेत. तसेच आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये झाडांचे खूप महत्त्व आहे. जर या धरतीवर झाडे नसतील तर मानवाला आपले जीवन जगणे मुश्किल होऊन जाईल.

वृक्ष हे मानवाच्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. या वृक्षांमुळे मानवाला विविध वस्तू प्राप्त होतात. त्या सर्व वस्तूंचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो. म्हणून वृक्ष हे मानवाचे मित्र असतात.

वृक्षांपासून मिळणाऱ्या गोष्टी

राष्ट्रीय उद्यान

मानवाला वृक्षांपासून फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. तसेच मानवाला वृक्षांपासून शुद्ध हवा मिळते. वृक्ष मानवाला आणि सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन प्रदान करतात.

तसेच वृक्ष स्वत सर्व सृष्टीला हानिकारक असलेल्या कार्बन डाय ऑक्साइडला अवशोषित करतात. त्याच प्रमाणे वृक्ष हे संपूर्ण पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम करतात.

वृक्षांच्या लाकडाचा उपयोग

Save Tree

मानव वृक्षांचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. घरे बांधण्यासाठी तसेच वृक्षांच्या लाकडाचा उपयोग इंधनाच्या रूपाने करतो.

त्याच प्रमाणे मानव वृक्षांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.

उद्योगांना लागणार कच्चा माल सुद्धा तयार केला जातो. वृक्षांच्या लाकडापासून रबर, माचीस, गोंद आणि कागद इत्यादि वस्तू बनवल्या जातात.

वृक्षांचे लाभ

Importance Of Trees

वृक्ष हे निसर्गाने मानवाला दिलेली एक अमूल्य वन संपत्ती आहे. या वृक्षांपासून आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात.

वृक्ष आपल्या सर्वांसाठी सुंदर असा नैसर्गिक देखावा तयार करतात. तसेच आनंद आणि मानसिक शांती प्रदान करतात.

वृक्षांवर अनेक उद्योग अवलंबून आहेत. खाद्य पदार्थ, तेल – मसाले, धान्य इत्यादि.

वृक्षांचे कार्य

tree true friend

बऱ्याच झाडांमध्ये औषधी गुणधर्म असतात. अन्य प्रकारच्या झाडांपासून औषधे सुद्धा तयार केली जातात. वृक्ष आपल्याला उन्हाळयात सावली प्रदान करतात.

वृक्ष पाऊस पडण्यास मदत करतात. तसेच घनदाट जंगल पूर आणि मातीची धूप रोखण्यास मदत करतात. वातावरण स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास वृक्ष महत्वाची भूमिका निभावतात.

सृष्टीशी नाते

tree1

मानव आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत. मानवाचे जीवन हे पृथ्वी,  आकाश,  हवा,  पाणी आणि जमीन या पाच तत्त्वांवर अवलंबून आहे. या निसर्गातून मानवाला खूप काही मिळत. परंतु मानव या सर्वाचा दुरुपयोग करतो.

वृक्ष पशु – पक्ष्यांचे स्थान

tree

वृक्ष हे अनेक पक्ष्यांचे निवास स्थान आहे. वृक्षांवर अनेक पक्षी आपला घरटा बांधून राहतात. मानवाप्रमाणेच पक्ष्यांचे जगण्यासाठी घराची आवश्यकता असते. म्हणून निसर्ग हेच पशु – पक्ष्यांचे घर असते. जंगले हे पक्ष्यांचे माहेरघर म्हटले जाते.

वृक्षांची तोड

Tree Plantation

आज मानव आपली सुख – सुविधा पुरी करण्यासाठी आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी दिवसेंदिवस वृक्षांची तोड करत आहे. तो वृक्षांची तोड करताना त्यांचे महत्त्व विसरून गेला आहे.

तसेच वृक्ष तोडताना तो स्वतः च आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. परंतु या सर्वाचा सर्वात जास्त परिणाम हा मानवी जीवनावर होत आहे.

वृक्ष तोडल्यामुळे पूर, दुष्काळ आणि अनेक प्रदूषणाच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. तसेच वृक्षांच्या तोडीमुळे पशु – पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत.

निष्कर्ष:

आज आपल्या सर्वांना वृक्ष आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे समजून घेतले पाहिजे. सर्व लोकांनी वृक्षांची तोड करणे थांबवले पाहिजे. तसेच प्रत्येकाने जास्तीत – जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आज वृक्षांना वाचविण्यासाठी सरकारने बरीच पावले उचलली आहेत. यासाठी अनेक कायदे आणि नियम लागू केले आहेत. देशातील सर्व लोकांना वृक्षांचे महत्त्व समजवून सांगण्यासाठी दरवर्षी १ जुलै ते ७ जुलै पर्यंत वन महोत्सव साजरा केला जातो. म्हणून वृक्ष हे आपले मित्र आहेत आणि त्यांचे जातं करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.

Leave a Comment