Sivaji

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Shivaji Maharaj

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आमची भारत भूमी ही महान पुरुषांची, संतांची भूमी आहे. या भूमीवर अनेक महान पुरुषांनी, संतानी जन्म घेऊन या भूमीला पवित्र बनवले आहे.

काही महान पुरुषांनी आपल्या देशासाठी संघर्ष करून व आपल्या प्राणांचे बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य दिले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान योध्याने देशाचा इतिहास घडविला.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जात असत. शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण जीवन लोक हितासाठी अर्पण केले.

शिवाजी महाराज यांचा जन्म

शिवाजी महाराजशिवाजी महाराजच जन्म १९, फेब्रुवारी, १९३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे संपूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते.

त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. जिजाबाई यांनी शिवाजींना लहानपणापासून पराक्रमी शस्त्रांचे शिक्षण दिले.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक हुशार राजा होतेच त्याच बरोबर एक आदर्श पुत्र सुद्धा होते. काही वर्षांनी शहाजी राजेंचा मृत्यू झाला.

जावळीचा प्रदेश

javlicha त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली घोडदौड पुन्हा सुरु केली आणि जावळीच्या दरी खोऱ्यातील प्रदेश चंद्रराव मोरे जो विजापूरचा जहागीर होता त्याच्याकडून जिंकून घेतला.

परंतु या घटनेमुळे आदिलशहाचा राग अनावर झाला नाही म्हणून त्याने आपला बदला घेण्यासाठी एक शक्तिशाली सरदार अफजल खान याला शिवरायांना पराभूत करण्यासाठी पाठविले.

अफजल खानचे षड्यंत्र

अफजलखानाचा षड्यंत्रअफजल खान याने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी षड्यंत्र रचले होते. त्याने शिवाजी महाराजांना भेटीसाठी प्रतापगडावर बोलावले. पण शिवाजी महाराज हे खूप चलाख व हुशार होते. अफजल खानला हे माहित नव्हते कि, शिवाजी महाराज हे त्याच्या एक पाऊल पुढे आहेत.

त्यांनी अफजल खानाचा डाव ओळखला आणि त्यांनी गनिमी काव्याचा डाव रचला. जेव्हा शिवाजी महाराज प्रताप गडावर पोहचले तेव्हा अफजल खाण याने त्यांना आलिंगन देण्यासाठी जवळ बोलावले. जवळ आल्यावर त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली.

परंतु अफजल खानचा हा डाव त्याच्यावरच उलटा पडला. शिवरायांनी चिलखत घातल्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही. त्याच बरोबर शिवरायांनी चिलखती मध्ये लपवलेल्या वाघनखे बाहेर काढली आणि खानाच्या पोटात घुसवली. त्यामुळे खानाचा कोठला बाहेर आला आणि खान खाली कोसळला.

शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना वाटले कि, शिवाजी महाराजांवर हल्ला झाला म्हणून त्या मावळ्यांनी खानाच्या ३००० सैन्यावर हल्ला झाला. त्यामुळे खानाचे सैन्य मारले गेले. अशाच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या.

तोरणगडावर विजय

तोरणगडावर शिवाजी महाराजांनी आपल्या १७ वर्षाच्या वयात इ. स १६४७ साली आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणगड हा किल्ला जिंकून घेतला. तसेच तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले.

त्याच साली त्यांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून घेऊन पुणे प्रांतावर साम्राज्य मिळवले. त्याच बरोबर मुरंबदेवाचा डोंगर जिंकून त्याला राजगड असे नाव दिले.

राज्य कारभाराचे शिक्षण

shivaji शिवाजी महाराज यांना लढाईचे आणि राज्य कारभाराचे शिक्षण दादाजी कोंडदेव यांनी दिले. जेव्हा शिवाजी महाराज दहा – बारा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळत होते. त्यांना आपला भारत देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा होता.

म्हणून त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीतून भटकून सवंगडी गोळा केला. जसे कि त्यांनी जीवाला जीव देणारे तानाजी, सूर्याजी, बाजी प्रभू, येसाजी असे मित्र गोळा केले.

निष्कर्ष:

छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्कृष्ट राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते तसेच एक शूरवीर योद्ध होते. ते संपूर्ण जीवन लोक हितासाठी लढत राहिले म्हणून त्यांना ‘जाणता राजा’ म्हणून संबोधले जाते.

त्यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतामध्ये ‘शिव जयंती’ म्हणून साजरा केला जातो. म्हणून आजही सतराव्या शतकातील जागृत झालेला तो स्वाभिमान आणि ती स्वराज्यनिष्ठा महाराष्ट्राला प्रेरणा देते.

Leave a Comment