संत तुकाराम वर निबंध – वाचा येथे Marathi Essay On Sant Tukaram

प्रस्तावना:

संत तुकाराम यांचे नाव सर्वानाच माहित आहे. ते विठ्ठलाचे एकमेव परमभक्त होते. त्यांचे नाव व त्यांच्या गाथा अजूनही आपण वाचतो ऐकतोही. त्यांच्या विषयी अजून माहिती घेऊया.

संत तुकाराम कोण होते.

संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १६०७ मध्ये महाराष्ट्रातील देहू या गावी झाला. ते मराठी भाषिक होते. आणि ते वारकरी समाजातील होते. त्यांना जगात गुरु तुकाराम सुद्धा बोले जात.

हे एक कवी होते. सतत देवमग्न असायचे. या साठी त्यांना कित्येक वेळा लोकांचा तिरस्कार हि सहन असायचा. पण याचा त्यांच्यावर काहीही परिणाम दिसून येत नसायचा.

संत तुकाराम यांचा परिवार

संत तुकाराम यांच्या परिवारात त्यांचे आई बाबा. वडिलांचे नाव बोल्होबा आईचे नाव कनकाई व एक मोठा भाऊ त्याचे नाव सावजी तो या सर्वांपासून विरक्त होता. संत तुकारामाचे लग्न पुण्यात राहणारे अप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई उर्फ आवली यांच्याशी झाला.

संत तुकाराम याची दुर्दशा

वयाच्या १६व्य वर्षी त्यांचे आई बाबा मरण पावले. मोठा भाऊ घर सोडून निघून गेला. तुकाराम यांचा सावकारीचा व्यवसाय होता. पण गावात दुष्काळ पडला आणि सर्व परिस्थिती बिकट झाली. गावात अन्नान्नदशा झाली.

लोकांना खायला मिळेना झाले गुरेंढोरें अन्न पाण्यावाचून मरण पाऊ लागली. हे सर्व संत तुकारामांना मान्य न्हवते. लोकांनी आपल्या जमिनी त्यांच्याकडे गहाण टाकल्या होत्या. हे सर्व दृश्य त्यांना सहन होत न्हवते,

म्हणून त्यांनी सर्व कागदपत्रे इंद्रायणी नदीत सोडून दिली. या सार्वमध्ये त्यांचा मोठा मुलगा ज्याचे नाव संतू होते तो हि या दुष्काळात मरण पावला.

संत तुकाराम यांच्यावर खुप मोठे आभाळ कोसळले होते. म्हणून त्याची विठ्ठलाच्या भक्तीत लिन होण्याचे ठरविले. घरातील सर्व अन्न धान्य गावात वाटून त्यांची मदत करू लागले. यातच त्यांची पहिली पत्नीचे निधन झाले.

संत तुकाराम यांचा दुसरा विवाह

या सर्वातून ते फार तुटले होते. अश्यातच त्यांचा दुसरा विवाह झाला. त्यांचे नाव जिजाबाई होते. त्या खूप धनिक होत्या. पण खूप भांडकुदळ आणि कर्कश स्वभावाच्या होत्या. संत तुकाराम हे आधीच खूप बिकट परिस्तिथी वावरत होते.

त्यांचे संसारातून मन उठले होते. फक्त विठ्ठलाच्या भक्तीत त्यांना आनंद मिळत होता. आणि हे सर्व जिजाबाई याना मान्य न्हवते. म्हणून त्या सतत त्यांना व विठ्ठल शिव्या गाळ करत असत.

असेच एक दिवस कोणाचे तर भर ते बैलगाडीतून वाहून नेत असताना ते विठ्ठलाच्या भक्तीत मग्न होते. आणि पाठीमागे बैलगाडी पूर्ण रिकामी झाली. अशी त्यांची विठ्ठल भक्ती होती कि ते सर्व विसरून फक्त विठ्ठल गाणं गात असत.
संत तुकाराम यांची एक बिकट परिस्थिती

एक दिवस त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितले जावा शेतातून ऊस घेऊन या घरात काहीच नाही खाण्यासाठी. कारण संत तुकाराम यांनी सर्व मालमत्ता दुष्काळात गरिबांना वाटून टाकली होती. म्हणून ते शेतातून उसाचे भारे घेऊन येत होते. आणि त्यातच तिथे मागणाऱ्याची रंग लागली.

गावात दुष्काळ होता गरिबी होती. आणि संत तुकाराम याना कोणाची अशी बिकट परिस्थिती पाहवत नसायची म्हणून एक एक करत घरापर्यंत त्यांनी सर्व ऊस संपविला. आणि घरात आल्यावर पहिले तर हातात एकच ऊस राहिला.

हे पाहून जिजाबाई खूप चिडल्या रागावल्या आणि त्याच एका उसने त्यांनी तुकारामांना मारायला सुरवात केली.
अश्यातच उसाचे दोन तुकडे झाले हे पाहुन संत तुकाराम हसले आणि म्हणाले घे उसाचे दोन तुकडे झाले एक तू खा एक मी खातो. हे सर्व एकूण त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि सर्व ऊस सोलून दोघांनी थोडे थोडे झाले जिजाबाई या खाष्ट असल्या तरी त्या एक पतिव्रता होत्या.

सारांश:

असा विठ्ठलाचा भक्त कोणी होणे नाही. हेच खरे.

Updated: मार्च 23, 2020 — 2:08 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *