पावसाळा मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Rain

प्रस्तावना:

आमचा भारत देश हा ऋतूंचा देश आहे. या भारत देशामध्ये सहा ऋतू हे एका मागून एक येतात आणि या निसर्गाची सुंदरता वाढवतात. त्यापैकी प्रामुख्याने तीन ऋतू येतात. जसे कि उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा इ.

या तीन ऋतूंपैकी पावसाळा हा एक महत्वाचा ऋतू आहे. पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वाना आवडतो. पावसाळा ऋतू आल्याने निसर्गामध्ये भरपूर बदल होतात.

पूर्वीची स्थिती

पाऊस सुरु होण्या आधी संपूर्ण धरती उन्हामुळे ताव्यासारखी तापलेली असते. सर्व लोक जास्त उन्हाच्या उकाड्यामुळे अस्वस्थ झालेले असतात. सर्व झाडे – झुडपे आणि वनस्पती हे कडक उन्हामुळे सुकून जातात.

तसेच पाण्याचे सर्व स्रोत सुखतात. त्यामुळे सर्वांचे लक्ष हे आकाशाकडे लागलेले असते. त्यांच्या मनात एकच इच्छा असते, ती म्हणजे कधी पावसाळा सुरुवात होते.

पावसाचे आगमन

पाऊस हा जून महिन्यात सुरु होतो आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. जेव्हा आकाशात काळे ढग गर्दी करतात. वातावरण अंधारून येते आणि हा पाऊस पडू लागतो. असे वाटते कि ढगांना खाली यायची घाई झाली आहे.

 

पावसाचे थेंब खाली येतात आणि जमिनीवर पडू लागतात. हा पाऊस पडताच निसर्ग ओलाचिंब होतो. जमिनीवर पाऊस पडताच मातीतून सुगंध वास येतो. हा वास जणू काही जगातल्या सगळ्या महागड्या अत्तरांपेक्षा खुप सरस आणि अप्रतिम वाटतो.

पहिला पाऊस

पहिला पाऊस म्हणजेच घरादारांची, वृक्ष – वेलींची जणू काही पहिलीच अंघोळच.पाऊस पडताच सारे वातावरण स्वच्छ होऊन जाते. पहिला पाऊस पडताच सर्व झाडे हिरवीगार होतात आणि त्यांना नवीन जीवनदान मिळते. सर्व झाडांवर पावसाचे पाणी पडताच झाडे टवटवीत दिसू लागतात.

लहान मुलांसोबत मोठी माणसे पावसात भिजून मनसोक्त आनंद घेतात. पशु – पक्षी सुद्धा पहिला पाऊस अंगावर घेतात आणि आनंदाने नाचू लागतात.

तसेच पावसाचे आगमन होताच मोर हा पक्षी आपला सुंदर पिसारा फुलवून नृत्य करतो. पाण्याचे सर्व स्त्रोत जलयुक्त होतात. नदी – नाले तुडुंब भरून वाहू लागतात.

निसर्गाची सुंदरता

पावसाळा हा मानवालाच आनंद देत नाही तर सर्व सजीव सृष्टीला आनंदित करतो. पावसाळ्यात सर्व मैदाने आणि उद्याने हि हिरवीगार होतात.

असं वाटत कि, पृथ्वी जणू काही सुंदर हिरवा शालू नेसून प्रसन्न मुद्रेने आपला आनंद व्यक्त करत आहे. म्हणून या हिरव्यागार धरणीकडे बघतच राहावेसे वाटते. सर्व डोंगर आणि पर्वत हे सुंदर दिसू लागतात.

उन्हाळ्यात जे पशु – पक्षी शांत राहतात तेच पक्षी पावसाळ्यामध्ये गाणे गाऊन किंवा नाचून देवाच्या देणगीचे आभार व्यक्त करतात. संपूर्ण जंगल हे पक्ष्याच्या आवाजाने दुमदुमून जाते. त्याच बरोबर अन्य प्रकारचे प्राणी उत्साहित होऊन निरनिराळे आवाज काढून आपला आनंद व्यक्त करतात.

इंद्रधनुष्य

पावसाळयात सकाळी पडणारे हलकेसे धुके, मधूनच येणारी पावसाची रिमझिम कधी हळूच डोकावणारा तो सूर्यप्रकाश आणि सप्तरंगांची उधळण करणारा इंद्रधनुष्य बघायला मिळतो.

जेव्हा आकाश साफ, सुंदर आणि निळे दिसू लागते तेव्हा हा सगळ्यांना मोहित करणारा सात रंगाचा इंद्रधनुष्य दिसतो. हा इंद्रधनुष्य म्हणजेच आपल्या डोळ्यांना मिळणार निसर्गाचा एक नायब तोहफाच आहे.

हा पावसाळा सगळ्यांना आनंद देणारा, उत्साहित करणारा, कधी येतो असा ध्यास लावणारा तसेच संपूर्ण पृथ्वीला आनंदी आणि प्रफुल्लित करणारा.

निष्कर्ष:

पावसाळा हा ऋतू सर्वांचा सुखदाता आणि जगाचा पोशिंदा सुद्धा आहे. तो चराचरामध्ये नवीन चैतन्य निर्माण करतो.

पावसाळा हा ऋतू सर्व ऋतूंचा राजा आहे. तसेच हा ऋतू सर्वाना खूप – खूप आवडतो. पण ज्यावेळी पाऊस जास्त प्रमाणात पडतो तेव्हा हा नकोनकोसा वाटतो.

Updated: November 12, 2019 — 6:06 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *