प्रदूषण मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Pollution

प्रस्तावना:

आजचे युग हे विज्ञानाचे युग म्हटले जाते. कारण आजच्या आधुनिक युगामध्ये मानवाला विज्ञानाकडून काही वरदान मिळाले आहे. तसेच काही अभिशाप सुद्धा मिळाले आहेत.

प्रदूषण हा एक असाच अभिशाप आहे जो विज्ञानाच्या क्रांतीतूनच जन्माला आला आहे. आज या प्रदूषणाच्या गंभीर समस्येला अनेकांना सामोरे जावे लागत आहे.

आज देशामध्ये प्रदूषणाची समस्या ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम हा मानवी जीवनावरच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीवर होत आहे.

प्रदूषणाचा अर्थ –

प्रदूषण म्हणजे जीवजंतु नष्ट करणारे तसेच विस्कळीत करणारे घटक जेव्हा वातावरणात मिसळले जातात आणि वातावरण संपूर्णपणे दूषित बनते त्याला प्रदूषण असे म्हटले जाते. आपल्या जीवनाचा विकास हा केवळ स्वच्छ वातावरणावरच अवलंबून आहे.

परंतु अस्वच्छ वातावरण हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. आपल्या भारत देशामध्ये औद्योगिक क्रांती निर्माण झाल्यामुळे कचऱ्याच्या ढिगामुळे या पृथ्वीवरील हवा आणि पाणी हे दूषित होत आहे.

प्रदूषणाचे प्रकार

प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत. जसे की पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मृदा प्रदूषण इत्यादि.

जल प्रदूषण म्हणजेच अशुद्ध पाणी

पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप महत्वाचे साधन आहे. मानवाला पाणी हे नदी – नाले, समुद्र, तलाव आणि सरोवरे इ अनेक पाण्याच्या स्रोतांमधून प्राप्त होते. परंत्तू मानव याचा गैरवापर करत आहे.

मानव पाण्याच्या स्रोतांमध्ये दूषित पाणी सोडत आहे. त्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे आणि त्यामुळे रोगराई पसरत आहे. आज मानव कारखान्यातील निघणारा दूषित कचरा आणि सांडपाणी हे नदी – नाल्यांमध्ये सोडत आहे.

तसेच काही लोक हे नदी – नाले, समुद्र, तलाव यांमध्ये घरातील कचरा नेऊन टाकत आहे. त्यामुळे पाण्यामध्ये पाण्याऐवजी कचरा वाहताना दिसून येत आहे. तसेच हा कचरा काही दिवस पाण्यातच पडून राहतो आणि कुजतो. त्यामुळे अनेक आजार पसरतात.

हवा प्रदूषण म्हणजेच अशुद्ध हवा

Essay On Air Pollution in Hindi

हवा हि प्रत्येक सजीवाला आपले जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाची आहे. आज रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांमधून आणि कारखान्यांमध्ये चालणाऱ्या मशिनींमधून निघणारा धूर हा हवेमध्ये मिसळला जात आहे.

त्यामुळे हवा दूषित होत आहे आणि हवा प्रदूषणाची समस्या निर्माण होत आहे. हवा प्रदूषित झाल्यामुळे मानवाला श्वास घेणे अवघड जात आहे. तसेच लोकसंख्येतील वाढ आणि शहरीकरण हे घटक सुद्धा हवा प्रदूषणास जबाबदार आहेत.

ध्वनी प्रदूषण म्हणजेच मोठा आवाज

मानवाला आपले जीवन जगण्यासाठी शांत वातावरणाची आवश्यकता असते. ध्वनी प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे.

कारण जेव्हा रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचा मोठा कर्कश आवाज, डीजे, लाऊड स्पीकर, कारखाने आणि सायरन यामुळे होणाऱ्या आवाजाला ध्वनी प्रदूषण असे म्हटले जाते.

ध्वनी प्रदूषणामुळे मानवाची श्रवण शक्ती कमी होते. कधी – कधी ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणावाची स्थिती देखील उद्भवते. ध्वनी प्रदूषण ही एक हानिकारक समस्या आहे.

भूमी प्रदूषण म्हणजे अशुद्ध जमीन

शेतकरी लोक हे आपल्या पिकांसाठी अनेक कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा वापर करतात. त्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते.

त्यांनी आपल्या पिकांवर रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे त्यातून मिळणारे धान्याचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर देखील हानिकारक परिणाम होतो.

निष्कर्ष:

प्रदूषणाची समस्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपले पर्यावरण हे नष्ट होत चालले आहे. प्रदूषणाची समस्या रोखण्यासाठी आपण सर्वानी मिळून कठोर पावले उचलली पाहिजेत.

त्यामुळे सर्व लोकांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण केली पाहिजे. हा प्रदूषणावर नियंत्रण करण्याचा सर्वात एकमेव उपाय आहे. जास्तीत – जास्त प्रदूषण दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजेत.

Updated: दिसम्बर 16, 2019 — 12:28 अपराह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *