पावसाळा वर मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Pavsala

प्रस्तावना:

आपला भारत देश हा एक विविधता वाला देश आहे. म्हणून आपल्या भारत देशामध्ये येणाऱ्या सर्व ऋतूंमध्ये विभिन्नता आढळून येते. या देशामध्ये ऐकूण सहा ऋतू हे एका मागून एक हे येत असतात.

जसे की वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर इ. हे सर्व ऋतू दोन महिन्यांनी बदलत असतात. परंतु या देशामध्ये तीन ऋतू हे प्रमुख मानले जातात – उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा.

या तीन ऋतूंपैकी पावसाळा हा ऋतू सर्वात महत्वाचा ऋतू आहे. तसेच पावसाळा हा ऋतू सर्वांचा लाडका ऋतू आहे. या ऋतूची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहत असतात.

पावसाचे आगमन

Rainy Season 1

पावसाची सुरुवात ही जून किंवा जुलै महिन्यापासून सुरु होते आणि हा पाऊस सप्टेंबर महिन्यापर्यंत असतो. पावसाचा कालावधी हा तीन महिने असतो.

भारत देशात मान्सून वारे जेव्हा अरबी समुद्राकडून केरळ राज्यात प्रवेश करतात. मग ते हळूहळू उत्तर भारतात पोहचतात. तेव्हा पावसाची स्थिती निर्माण होते.

पावसाच्या आधीची स्थिती

Rainy Season

एप्रिल आणि मी महिन्यात उन्हाच्या जास्त उकाड्यामुळे सर्वजण खूप त्रस्त झालेले असतात. मानव बरोबर सर्व प्राणी आणि पक्षी देखील उन्हामुळे खूप हैराण झालेले असतात.

तसेच उन्हाळयात संपूर्ण वातावरण हे गरम असते. म्हणून लोकांना घराच्या बाहेर पडताना जास्त उन्हाचा सामना करावा लागतो. उन्हाळयात सर्व झाडे, वनस्पती या सुकून जातात. त्याच प्रमाणे सर्व पाण्याचे स्रोत हे सुखतात.

त्यामुळे मानवाला आणि इतर प्राणी आणि पक्ष्यांना पाणी मिळत नाही. सर्व पाण्याच्या शोधात असतात. प्राणी आणि पक्षी हे पाण्यासाठी व्याकुळ झालेले असतात. म्हणून सर्व पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात.

पावसामुळे निसर्गाची सुंदरता

Rain

जेव्हा पाऊस सुरु होतो तेव्हा काही दिवसांनी सर्व ठिकाणी हिरवळ दिसू लागते. जळत्या उष्णतेमुळे सर्व माणसांना, प्राण्यांना आणि पक्ष्याना मुक्तता मिळते. सर्वजण या पावसाचा नाडा अगदी मनसोक्त घेतात.

लहान मुले आणि मोठी माणसे देखील पहिल्या पावसामध्ये अंघोळ करतात, खेळतात. त्याच बरोबर छोटी मुले ही पावसाच्या पाण्यात कागदाच्या बोटी बनून सोडतात. तसेच शेतकरी सुद्धा खूप आनंदित होतात. वाळलेल्या जंगलात नवीन फुटलेली झाडे पुन्हा उगवतात.

सर्व झाडांना, वेलींना आणि वनस्पतींना नवीन जीवन दान मिळते. पावसाळ्यात सर्व झाडांना नवीन पालवी फुटते आणि सर्व झाडे ही हिरवीगार दिसू लागतात. कोरड्या काळ्या डोंगरावर किंवा टेकड्यांवर जणू काही हिरवीगार चादर पसरलेली आहे असे वाटते.

तसेच सर्व ठिकाणी रंगबिरंगी फुले देखील दिसून येतात. पावसाळ्यात पाण्याचे सर्व स्रोत हे तुडुंब भरून वाहू लागतात. जसे की नद्या – नाले, विहिरी, कालवे, सरोवरे, तलाव इ मुळे सांपूर्ण वातावरण थंड होऊन जाते.

पावसाळ्यात प्राण्यांना खाण्यासाठी गवत आणि चारा देखील मिळतो. पावसाळ्याचे आगमन हे या धरतीवरील सर्व सजीवांच्या आनंदाची गुरुकिल्ली आहे.

फायदे आणि तोटे

वर्षा का वर्णन संक्षिप्त में

पावसाळा या ऋतूमुळे आपल्याला अनेक फायदे देखील होतात आणि तोटे सुद्धा होतात. एकीकडे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळतो आणि दुसरीकडे अन्य प्रकारचे रोग पसरण्याची भीती असते.

पावसाळ्यात अनेक रोग देखील पसरतात. जसे की मलेरिया, टायफाईड, डेंगू इ. पावसाळ्यात किडे देखील बाहेर येतात.

साप, विंचू इ आपलट बिळामधून बाहेर पडतात आणि त्यामुळे मानवासाठी धोका निर्माण होतो. त्याच प्रमाणे जास्त प्रमाणात पाऊस पडल्यास पूर येण्याची शक्यता असते.

निष्कर्ष:

पावसाळा हा ऋतू सर्व प्राण्यांसाठी आणि मानवासाठी एक खूप मोठे वरदान आहे. या पावसाळ्यामुळे संपूर्ण जीवनात आणि वातावरणात आनंदाची लाट वाहते. या पावसाळ्यामुळे निसर्गात होणारे बदल हे दृश्य अगदी आनंददायक वाटते.

म्हणूनच सर्व ऋतूंमध्ये पावसाळा या ऋतूचे सर्वात महत्वाचे स्थान आहे. तसेच आपण सर्वानी पावसाचे पाणी हे संग्रहित करून ठेवले पाहिजे. म्हणून या ऋतूला पर्यटन संस्थेने ‘हिरवा ऋतू’ असे म्हटले आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *