पोपट मराठी निबंध – येथे वाचा Marathi Essay on Parrot

प्रस्तावना:

पोपट हा एक मध्यम आकाराचा पक्षी आहे. हा अतिशय सुंदर आणि रंगबिरंगी पक्षी आहे. काही लोक पोपटाला आपल्या घरामध्ये पाळतात. पोपटाला एक पाळीव  पक्षी सुद्धा म्हटले जाते. पोपट हा पक्षी उबदार प्रदेशात आढळून येतो.

तसेच पोपट प्रामुख्याने न्यूझीलंड मध्ये आढळतॊ. आमच्या भारत देशामध्ये पोपट हा पक्षी शेतात आणि जंगलात आढळून येतो. कधी – कधी हा पक्षी घरांच्या छपरावर बसलेला दिसून येतो.

पोपटाची शरीर रचना

आमच्या भारत देशातील पोपट हा पक्षी हिरव्या रंगाचा असतो. पोपटाची चोच ही लाल रंगाची असते आणि त्याचे पंख हे हिरवे असतात. पोपटाच्या चोचीचा वरचा भाग हा दुमडलेला असतो. पोपटाची लांबी १० ते १२ इंच इतकी असते.

पोपटाचे डोळे हे काळे आणि चमकदार असतात. पोपटाचे डोके हे त्याच्या शरीरापेक्षा लहान असते. पोपट हा पक्षी इतर देशामंध्ये पांढरा, निळा, पिवळा आणि लाल रंगांमध्ये आढळतो. पोपटाला चार नख्या असणारे मजबूत पाय असतात.

पोपटाच्या मानेभोवती एक काळ्या रंगाचे वलय असते. पोपटाला थंड हवामान आवडत नाही. पोपट हा पक्षी झाडांच्या पोकळीत आपले घरटे बांधून राहतो.

पोपटाचे अन्न

पोपट हा पक्षी धान्ये, फळे, पाने, बिया आणि शिजवलेला भात सुद्धा खातो. त्याला आंबा आणि पेरू सारखी कठीण कवचाची फळे खायला आवडतात.

पोपटाला मिरची खूप आवडते. काही पोपट मांसाहारी असतात. ते लहान – लहान कीटक सुद्धा खातात. पोपट हा एक असा पक्षी आहे जो आपल्या पंज्यांमध्ये अन्न पकडून खातो.

पोपट या पक्ष्याला सहसा कळपामध्ये राहायला आवडते. जेव्हा – जेव्हा ते अन्नाच्या शोधात जातात तेव्ह ते 10 ते 15 पोपटांच्या कळपाने जातात.

पोपट एक हुशार पक्षी

पोपट हा एक हुशार पक्षी आहे. पोपट हा पक्षी १ किमी दुरवरुन आवाज ऐकू शकतो. पोपट कोणतीही भाषा सहजपणे बोलू शकतो. जर पोपट काही दिवस माणसांमध्ये राहिला तर तो माणसासारखे बोलू शकतो. त्याच्या आवाजाची नक्कल करू शकतो.

भारतामध्ये पोपटांना राम – राम आणि सीताराम हे शब्द बोलायला शिकवले जातात. जेव्हा कोणी घरात पाहुणे येतात तेव्हा त्यांचे स्वागत राम – राम किंवा सीताराम हे शब्द बोलून करतो.

पोपटाच्या प्रजाती

संपूर्ण जगभरात पोपट या पक्ष्याच्या एकूण ३५० हुन अधिक प्रजाती सापडल्या आहेत. पोपट हा असा एकमेव पक्षी आहे ज्याच्या अनेक प्रजाती आढळून येतात.

परंतु पोपट या पक्ष्याच्या बऱ्याच प्रजातींपैकी नर आणि मादा हे दोन्ही सारखेच दिसतात. परंतु आज मानव झाडांची तोड करत असल्यामुळे पोपट या पक्ष्याच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

पोपटांचा उपयोग

काही लोक हे पोपटाला कसरती करण्यास शिकवतात. पोपट हा पक्षी भविष्य सांगणाऱ्या लोकांसाठी उपयोगी ठरतात. तर काही लोक पोपटाचा उपयोग सर्कस मध्ये काम करण्यासाठी करतात. यामुळे त्यांना बरीच किंमत मिळते.

मुख्य निवास स्थान

पोपट या पक्ष्याचे मुख्य निवास स्थान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहे. येथे हा पक्षी सतरंगी रंगांमध्ये सापडतो.

तसेच येथून पकडून त्याला अन्य देशामंध्ये पाठवले जाते. पोपट या पक्ष्याला इंग्रजी मध्ये Parrot आणि हिंदी मध्ये तोता म्हटले जाते.

निष्कर्ष:

पोपट हा एक सर्वात सुंदर पक्षी आहे. तसेच पोपट हा पक्षी बराच काळ हा मानवासोबत राहतो. पोपट हा पक्षी लहान मुलांना खूप – खूप आवडतो.

Updated: नवम्बर 27, 2019 — 11:50 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *