प्रस्तावना:
पृथ्वी हा एक सर्वात सुंदर ग्रह आहे आणि आपण सर्व या सुंदर ग्रहावर राहतो. पृथ्वीवर मनुष्य वस्ती अस्तित्वात आहे कारण या ग्रहावर मानवाला आपले जीवन जगणे अतिशय सोपे आहे. मानवाला प्रत्येक गोष्ट या निसर्गातून प्राप्त होते. निसर्ग हि देवाने मानवाला दिलेली एक सर्वात महत्वाची देणगी आहे. म्हणून निसर्ग आणि मानव यांचा संबंध अतूट आहे.
निसर्ग म्हणजे –
निसर्ग म्हणजे सृष्टी होय. ही सृष्टी पृथ्वी, अग्नी, आकाश, वायू, पाणी या पाच तत्त्वांनी बनलेली आहे. या निसर्गाचे आणि मनुष्याचे नाते हे जन्मापासूनच आहे. मनुष्याच्या जन्म या निसर्गाच्या पाच तत्वांमधूनच झाला. या निसर्गतःच मानवाचा जन्म होतो, वाढतो आणि इथेच विलीन होतो.
निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी
मानवाला या निसर्गातून अनेक गोष्टी प्राप्त होतात. निसर्गातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. या सर्वच उपयोग मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. तसेच निसर्गातून मानवाला शुद्ध हवा मिळते. मानवाला आणि सर्व सजीवांना आपले जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो.
झाडांचे महत्त्व आणि उपयोग
झाड ही निसर्गाचं एक महत्वाचा घटक आहेत. मानवाच्या जीवनात झाडांचे खूप महत्त्व आहे. जर या धरतीवर झाडेच नसतील तर मानव आपले जीवन जगू शकत नाही. या झाडांपासून मानव उद्योगांना लागणार कच्चा माल तयार करतो.
तसेच झाडांपासून रबर, माचीस, गोंद इत्यादी वस्तू तयार केल्या जातात. त्याच प्रमाणे मानव झाडांच्या लाकडाचा उपयोग हा घरे बांधण्यासाठी करतो. झाडाच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी सुद्धा तयार केली जातात.
निसर्ग दानशूर
निसर्ग हा खूप दानशूर आहे. निसर्ग काही बोलत नाही पण कृती करतो. निसर्ग कधीही भेदभाव करत नाही. माणूस जसा विषमतेने वागतो. तास निसर्ग कधीच विषमतेने वागत नाही. हा निसर्ग मानवाला खूप काही देतो पण त्या बदल्यात मानवाकडे कधीच काही मागत नाही.
निसर्ग आपला गुरु
निसर्ग हाच आपला गुरु आहे. ज्या प्रमाणे गुरु आपल्या शिष्याला अन्य प्रकारचे ज्ञान देऊन त्याला एक चांगला माणूस म्हणून घडवतो. तसेच हा निसर्ग सुद्धा आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान देत असतो, बोधप्रद धडे शिकवतो.
निसर्ग कधीच कोणाला काही सांगत नाही. पण आपल्या कृतीतून बरेच काही शिकवतो. म्हणून आपण निसर्गाशी एकरूप झाले पाहिजे. म्हणून हा निसर्ग आपला गुरु असतो.
निसर्ग एक खरा चित्रकार
निसर्ग हा एक खरा चित्रकार आहे. कारण तो नेहमी अनेक चित्रे रंगीत असतो आणि आपल्याला प्रेरणा देत असतो.
जसे कि खोल दऱ्या, अथांग सागर, झुळझुळ वाहणारे झरे, घनदाट जंगल, उत्तुंग पर्वत, कमळांनी भरलेली सरोवरे, वाऱ्याच्या झोक्यावर डोलणारी हिरवीगार शेते, डोंगर आडून उगवणारा सूर्य, सूर्याची आकाशात उधळणारी सोनेरी किरणे हे सर्व किती सुंदर आहे.
निसर्ग प्राण्यांचे घर
माणसाला निसर्गामध्ये जेवढे महत्त्व आहे तेवढेच प्राण्यांचे सुद्धा आहे. ज्या प्रमाणे माणसाला राहायला घर हवे असते. त्याच प्रमाणे निसर्ग हाच सर्व पक्षी आणि प्राण्यांचे घर आहे. कारण काही पशु – पक्षी हे झाडांवर आपला घरटा बांधून राहतात.
निसर्गावर परिणाम
हा निसर्ग मानवाला खूप काही देतो. पण मानव आपल्या स्वार्थपायी इतका आंधळा झाला आहे की, लगातार निसर्गामध्ये असणाऱ्या झाडांची तोड करत करत. तो झाडांची तोड करताना विसरून गेला आहे की, स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. झाडांची तोड झाल्यामुळे अनेक प्रकारच्या प्रदूषणाच्या समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस सारख्या समस्या निर्माण होत आहेत.
निष्कर्ष:
हा निसर्ग आपल्याला भरभरून देतो. म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, आपण निसर्गाचे संगोपन केले पाहिजे. तसेच जास्तीत – जास्त झाडे लावली पाहिजेत. म्हणून हा निसर्ग आपला खरा सोबती,सखा, मित्र आणि गुरु सुद्धा आहे.