प्रस्तावना:
ईश्वराने या निसर्गाची रचना खूप सुंदर प्रकारे केली आहे. पृथ्वी हा एक सर्व ग्रहांमध्ये एकमेव ग्रह व या पृथ्वीवर जीवन बहरण्याचे कारण म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग आहे. कोणत्याही ग्रहावर निसर्गाशिवाय जीवन हे बहरू शकत नाही.
म्हणून आम्ही सर्वजण पृथ्वी सारख्या ग्रहावर राहतो आहे. कारण या निसर्गातून मानवाला आपले जीवन जगण्यासाठी विविध वस्तू उपलब्ध आहेत. जसे कि वातावरण, पाणी, झाडे – झुडपे, प्राणी, पक्षी, जमीन, हवा, डोंगर, नदी – नाले इ.
म्हणूनच या निसर्गातूनच मानवाचा जन्म आणि विकास झाला आहे. या निसर्गाशिवाय मानव आपले जीवन जगूच शकत नाही.
पूर्वीचा मानव
पूर्वी मानव हा निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळून आपल्या जीवनाची प्रगती करू लागला. त्याने दगडावर दगड घासून आगीचा शोध लावला. विविध हत्यारे बनवली आणि चाकाचा शोध लावला.
या सर्वांमुळे मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. या सगळ्यासाठी लागणारी साधन – सामग्री ही मानवाला निसर्गाकडूनच मिळाली. तसेच मानव नवीन बनवलेल्या दगडांच्या हत्याराने शिकार करू लागला.
आगीच्या साहाय्याने शिकार शिजवून आणि विविध कंदमुळे खायला लागला. त्यानंतर मानव चाकाच्या मदतीने विविध ठिकाणी पोचू शकला.
निसर्ग एक चित्रकार
निसर्ग हाच एक खरा चित्रकार आहे. तो नेहमी किती चित्र रंगवतो आणि प्रेरणा देतो. निसर्ग हा आपल्यासाठी एक मोठे वरदान आहे. निर्मल वाहणारे झरे, अथांग सागर, घनदाट जंगल, उत्तुंग पर्वत, कमळांनी भरलेली सरोवरे, नारळी केळ्यांच्या बागा, डोंगरा आडून उगवणारा सूर्य आणि सोनेरी आकाशात गुलाल उधळणारी सूर्य किरणे हे सर्व सुंदर आहे. या सगळ्याच्या अनुभव आम्ही दररोज घेत असतो.
निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी
हजारो वर्षाच्या प्रगती नंतर मानवाचे जीवन सुधारू लागले. निसर्गातून मानवाला फळे, फुले, भाज्या इ सर्व मिळू लागले.
तसेच त्याला झाडांपासून शुद्ध हवा मिलायली लागली. झाडांपासून मानवाला शुद्ध ऑक्सिजन मिळू लागला आणि झाडे मानवाला हानिकारक असलेल्या कार्बन डाय ऑक्साईडला अवशोषित करू लागले.
तसेच मानवाला झाडांच्या लाकडापासून इंधन प्राप्त होऊ लागले. या सर्वाचा वापर मनुष्य आपल्या मानव आपल्या जीवनामध्ये करू लागला.
झाडांचा उपयोग
मनुष्य निसर्गातून मिळणाऱ्या झाडांचा उपयोग आपल्या जीवनात करू लागला. झाडाच्या लाकडापासून इमारती बांधू लागला. तसेच झाडाच्या लाकडापासून विविध वस्तू तयार करू लागला. जसे कि दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करू लागला.
मानवाला निसर्गातून अन्य प्रकारची औषधे मिळू लागली. त्यामुळे मानवाचे आयुष्य वाढू लागले. मृत्यू दर कमी होऊ लागला आणि जीवन काळ वाढू लागला. यामुळे लोकसंख्या वाढू लागली. तसेच त्यांच्या गरजाही वाढू लागल्या.
मानवाचा विकास
या निसर्गाने मानवाची प्रगती पथावर नेहमी साथ दिली. मानवाला आपल्या प्रगतीसाठी लागणारी सर्व साधन – सामग्री निसर्गाने दिली.
मानवाने विजेचा शोध लावला, रस्ते बांधले, नौका बनवल्या, समुद्र प्रवास चालू केला. यामागची सर्व कल्पना आणि प्रेरणा ही माणसाला निसर्गाकडूनच मिळाली. मनुष्य आज खूप प्रगत झाला आहे.
निसर्गाला हानी
आज मानव आपली सुख – सुविधा पूर्ण करण्यासाठी निसर्गाला नुकसान पोहचवत आहे. आज मानव मोठ – मोठी स्वप्न पाहू लागला आहे. त्याच्या मुलभूत गरजा भागवू लागला आहे. आज मानव भौतिक सुखांच्या मागे पळू लागला आहे.
या धरतीवर असलेल्या सुंदर निसर्गाचा दिवसेंदिवस ऱ्हास करता आहे. त्यामुळे प्रदूषण आणि ग्लोबल वार्मिंग सारखी समस्या निर्माण होत आहे.
निष्कर्ष:
या निसर्गाने आपल्याला जन्म दिला आहे आणि आपलं त्याचे संगोपन केले पाहिजे. त्याच बरोबर तो आपला सोबती झाला.
जर आपण त्याला नुकसान पोहचवले तर तर निसर्गाकडे विनाश करण्याची ताकद आहे. म्हणून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त झाडे लावून या धरतीला सुजलाम, सुफलाम बनवले पाहिजे.