माँ का कार्य

आई मराठी निबंध – येथे वाचा Marathi Essay on Mother

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना:

आई ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. आईसारखा त्याग आणि प्रेम कोणीही करु शकत नाही. आई ही संपूर्ण विश्वाची जननी असते. तसेच आईशिवाय कोणताही व्यक्ती आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही.

असे म्हटले जाते कि, ईश्वर हा प्रत्येक मुलांसोबत राहू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवलं आहे. आई ही एक सुंदर आणि काळजी घेणारी व्यक्ती असते. जी आपल्या जीवनात प्रत्येक छोट्या – मोठ्या गोष्टींची काळजी घेत असते.

आई हा शब्द

maata आई हा एक सोपा शब्द आहे. परंतु या शब्दामागे अपरंपार माया दडलेली आहे. संपूर्ण जगच यात सामावलेले आहे. आपल्याला जन्म देऊन जगात आणणारी ही सर्वप्रथम आपली आईच असते.

तसेच लहानपणापासून ओंजारून – गोंजारून आणि लाडाने खायला – प्यायला देणारी ही आपली आई अन्नपूर्णा असते. म्हणून म्हटले आहे कि,  आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही.

वात्सल्याचा झरा

maa आई म्हणजे वात्सल्याचा अविरत वाहणारा झराच आहे. साऱ्या दैवतात आई हे दैवत सर्वात श्रेष्ठ आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मखमलीच्या पेटीत आई ही कोरलेली दोन अक्षरे आहेत.

आई ही आपल्या मुलांना बालपणी जपणारी आणि त्यांच्यावर योग्य संस्कार देणारी आई म्हणजे आपला पहिला गुरु होय. म्हणून साने गुरुजी नेहमी म्हणतात – ‘आई माझा गुरु, आई कल्पतरू.’

जीवनामध्ये महत्त्व

Dadi Maa प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईचे खूप महत्त्व आहे. कारण तिच्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. आई आपल्याला अनेक वेदना सहन करून आपल्यासाठी जीवन देत असते.

ती लहानपणापासून आपली काळजी घेते आणि आमची प्रत्येक गरज पूर्ण करते. ती स्वतः भुकी राहते पण आपल्याला अन्न देते. आई आपल्यासाठी संपूर्ण जीवन बलिदान करते. आई नेहमीच आपल्या विसरून आम्हाला आनंदी ठेवते.

ईश्वर आणि आई

आईच्याआईचे प्रेम आणि आपुलकी मिळविण्यासाठी या धरतीवर देवाने सुद्धा जन्म घेतला आहे. म्हणून याचे एक उदाहरण स्पष्ट केले आहे, भगवान श्रीकृष्णाला एक नव्हे तर दोन मतांचे प्रेम आणि आपुलकी मिळाली होती. यावरून असे स्पष्ट झाले की, देवसुद्धा आईची पूजा करतो.

आई आणि मुलाचा संबंध

Mother Esaay in Hindi 2 आई आणि मुलाचे एक खास नाते व बंधन असते. जे कधी संपत नाही. कोणतीही आई ही आपल्या मुलावरचे प्रेम आणि पालन पोषण कमी करत नाही. ती आपल्या प्रत्येक मुलावर समान प्रेम करते. म्हणून आईचे आभार मानण्यासाठी आणि तिचा सम्मान करण्यासाठी आपल्या भारत देशात दरवर्षी ५ मे ला मातृदिवस साजरा केला जातो. या दिवशी आईला ग्रीटिंग कार्ड, पुष्पगुच्छ किंवा अनेक भेटवस्तू या दिल्या जातात.

आईच्या “प्रति” आपले कर्तव्य

Mother Esaay in Hindi 1 आई आपल्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करते. परंतु त्या बदल्यात आपण तिला दोन वेळेची भाकर सुद्धा देत नाही.

ज्या आईने अनेक अडचणी आणि त्रास सहन करून आमच्यासाठी जीवन दिले. प्रत्येकाला आनंद दिला आणि एक चांगली व्यक्ती म्हणून घडविले. अशा आईसाठी आपण मोठे झाल्यावर काही कर्तव्ये आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आईची प्रत्येक गरज पूर्ण केली पाहिजे.

तिला आनंदी ठेवले पाहिजे. वृद्ध काळात तिची सेवा केली पाहिजे. तसेच आपण दररोज आईचा आशीर्वाद घेतला पाहिजे. कारण आईच्या आशिर्वादाशिवाय कोणतीही संपत्ती नाही.

निष्कर्ष:

आईसारखे त्यागी, पवित्र, धैर्यवान, निर्भय आणि परोपकारी कोणीही होऊ शकत नाही. या अनमोल जीवनाचे आपण कधीही ऋण फेडू शकत नाही. म्हणून आपल्याला शक्य होईल तेवढी आईची सेवा केली पाहिजे. तिला प्रत्येक आनंद देऊन तिचे व्यक्तिमत्व वाढविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले पाहिजे.

Leave a Comment