माझा देश निबंध – वाचा येथे Marathi Essay on Maza Desh

प्रस्तावना:

भारत हा माझा देश आहे. तसेच माझा भारत देश सर्वात प्राचीन आणि महान आहे. माझा भारत देश हा आपल्या संस्कृती आणि विविधतेसाठी ओळखला जातो. माझ्या भारत देशाची संस्कृती आणि सभ्यता ही हजारो वर्षे पुरानी आहे.

तसेच माझ्या भारत देशाची संस्कृती ही इतर देशांपेक्षा सर्वात वेगळी आहे. म्हणून माझ्या भारत देशात जेवढी विविधता आहे तेवढी कोणत्याच देशात नाही आहे. माझा भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे.

धार्मिक विविधता

माझ्या भारत देशामध्ये धार्मिक विविधता दिसून येते. कारण माझ्या भारत देशात अनेक धर्माचे आणि जातीचे लोक नांदतात.

जसे की हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन इत्यादि अनेक धर्माचे लोक हे नांदतात. म्हणून माझ्या भारत देशाला ‘धर्मनिरपेक्ष देश’ असे म्हटले आहे.

भारताचा इतिहास

माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवीन देण्यासाठी अनेक स्वतंत्रता सैनिकांनी आणि भारतीय लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य केले आहे. या सर्वांच्या योगदानामुळे माझ्या भारत देशाला १५ ऑगस्ट, १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.

माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांनी अहिंसक आणि सत्याच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.

त्याच प्रमाणे माझ्या भारत देशाचे २६ जानेवारी, १९५० साली भारतीय संविधान लागू झाले. या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आणि हक्क हा देण्यात आला.

विविध भाषा

माझ्या भारत देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. जसे की हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलगू, कन्नड, मल्याळम, इत्यादि अनेक भाषा या बोलल्या जातात. पण माझ्या भारत देशाची मातृभाषा हिंदी आहे.

महान पुरुषांची भूमी

माझी भारत भूमी ही महान पुरुषांची भूमी मानली जाते. माझ्या या भारत भूमीवर राम, कृष्ण, महावीर, बुद्ध अशा अनेक महान पुरुषांनी जन्म घेतला आहे.

तसेच महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू इत्यादि अनेक महान नेत्यांनी या भारत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे आणि या भारत भूमीला अधिक पवित्र बनविले आहे.

माझा भारत देश हा तितकाच साहित्यासाठी प्रसिद्ध आहे. या भारत भूमीवर संत कबीर, संत तुलसीदास आणि प्रेमचंद इ कितीतरी कवी आणि लेखक जन्माला आले आहेत.

भारताचा भूगोल

माझ्या भारत देशातून अनके पवित्र नद्या वाहतात. जसे की गंगा, नर्मदा, तापी, सतलज, कृष्णा, कावेरी, रावी इत्यादि अनेक नद्या वाहतात.

परंतु गंगा नदी भारत देशाची सर्वात पवित्र नदी समजली जाते. तसेच माझ्या भारताचा भूगोल सांगायचा झाला तर माझ्या भारत देशाच्या उत्तरेला गगनाला भिडणारा हिमालय पर्वत आहे.

ऐतिहासिक ठिकाणे

तसेच भारत हि एक अशी जागा आहे. जिथे लाल किल्ला, फतेहपूर सीकरी, सुवर्ण मंदिर, ताजमहाल, ऊटी, खजुराहो, नीलगिरी, काश्मीर, अजिंठा आणि एलोरा लेणी अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. दरवर्षीं माझ्या भारत देशात हजारो लोक पर्यटनाच्या दृष्टीने येतात.

कृषिप्रधान देश

माझा भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतांश लोक हे गावात राहतात. म्हणून माझ्या या भारत देशाला गावा – गावांचा देश असे म्हटले जाते. गावात राहणारे लोक हे शेती हा व्यवसाय करून आपली आजीविका चालवतात.

तसेच माझ्या भारत देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. माझ्या भारत देशमंडई तांदूळ, मका, गहू, ऊस इत्यादि अनेक पिके घेतली जातात.

निष्कर्ष

माझा भारत देश हा फार सुंदर आहे. तसेच माझा भारत देश हा थोर आणि पुण्यवान माणसांचा देश आहे. अशा विविधतेने भरलेला माझा देश मला खूप – खूप आवडतो. तसेच मला माझ्या देशाबद्दल खूप अभिमान आहे.

Updated: दिसम्बर 16, 2019 — 10:36 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *