प्रस्तावना:
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे खूप महत्त्व असते. कारण कोणतीही व्यक्ती आईशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करु शकत नाही. म्हणून म्हटले आहे की ‘आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही’.
आई हे ईश्वराचं दुसरं रूप आहे. ईश्वराने आईला यासाठी बनवलं आहे की, ईश्वर प्रत्येक मुलासोबत नाही राहू शकत. म्हणून आईची निर्मिती केली आहे. आई हा शब्द खूप सोपा आहे, पण या शब्दामागे अपरंपार माया दडली आहे.
समुद्राची शाई, हिमालयाची लेखणी आणि आकाशाचा कागद करून आईच्या मायेचे गुणगान लिहिण्यासाठी बसलो तरी आईची माया लिहून कधीच संपणार नाही.
म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे स्वामी विवेकानंद यांचे वाक्य अत्यंत खरे आहे. कारण आपल्याजवळ भरपूर पैसा आहे. परंतु आपल्या डोक्यावर मायेन हात फिरवणारी जर आसिह नसेल तर हे जीवन व्यर्थ आहे.
आई म्हणजे काय –
आई हे दैवत साऱ्या जगतातील एक थोर दैवत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या मखमली पेटीत ‘आई’ ही दोन लष्करे कोरलेली असतात.
लहानपणी आपल्या मुलांना जपणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी आणि आपल्या जीवनातील सर्वात पहिला गुरु म्हणजे आई होय.
माझी आई
सर्वांप्रमाणेच माझी आई सुद्धा माझ्या जीवनातील एक सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. माझ्या आईचे नाव सविता देशमुख असे आहे आणि तिचे वय ४० वर्ष इतकं आहे. ती खूप सुंदर आणि प्रेमळ आहे.
माझी आई रोज सकाळी लवकर आमच्यासाठी चहा बनवते, नाश्ता तयार करते. तसेच मला शाळेत जाण्यासाठी तयार देखील करते. माझ्या बाबांना आणि मला डबा करून देते. माझी आई कुटुंबाची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेते.
आमच्या उठण्यापूर्वीच माझ्या आईच्या दैनंदिन कामाची सुरुवात होते. माझी आई कुटुंबातील प्रत्येक वस्तू व्यवस्थापित करून ठेवते. म्हणून तिला कुटुंबाचे व्यवस्थापक म्हटले जाते. माझी आई आमच्या कुटुंबासाठी खूप काही करते. माझी आई ही माझ्या कुटुंबाचा सर्वात मोठा आधार आहे.
माझी पहिली शिक्षक
मी माझ्या आईचा खूप आदर करतो. तशीच ती माझ्या जीवनातील सर्वात पहिला गुरु आणि शिक्षक आहे. ती मला नेहमी योग्य मार्ग दाखवते. माझी आई नेहमीच व्यस्त राहिली तरी माझ्यासाठी वेळ काढून कधी – कधी माझ्यासोबत खेळते.
मला माझे गृहपाठ करण्यास मदत करते . तसेच मला सर्व उपक्रमांमध्ये मला मार्गदर्शन करते. माझी आई प्रत्येक कृतीमध्ये माझ्या पाठीशी उभी राहते.
नैतिक शिक्षण
आज मी माझ्या आईच्या नैतिक शिक्षणात वाढलो आहे. तिने मला प्रत्येक पावलात मार्गदर्शन केले आहे. माझी आई माझ्या प्रत्येक भावना समजते आणि अडचणीच्या काळात मला आधार देते.
तसेच चांगल्या क्षणांमध्ये मला प्रेरणा देते. माझी आई ही माझ्या कुटुंबासाठी एक वृक्ष आहे जी आम्हाला छाया प्रदान करते. माझी आई परिस्थितीत तिचा राग आणि धैर्य कधीच गमावत नाही.
कुटुंबाची देखभाल
माझी आई माझी खूप काळजी घेते. मी आजारी पडलो की, मला डॉक्टरकडे घेऊन जाते आणि मला वेळेवर औषधे देते. तसेच ती कुटुंबातील जर कोणताही सदस्य जर आजारी असेल तर ती त्याची रात्रभर काळजी घेते. माझी आई कुटुंबाच्या फायद्यासाठी हसत्या चेहऱ्याने आपले जीवन बलिदान करते.
निष्कर्ष:
जशी माझी आई माझ्या सोबत सावलीसारखी उभी राहिली त्याच प्रमाणे मला सुद्धा माझ्या आईसोबत सावलीसारखे उभे राहायचे आहे. आज मी माझ्या आईमुळे हे सुंदर जग पाहू शकलो. म्हणून मी माझ्या आईची आयुष्यात सेवा करू इच्छितो.
मला माझी आई मला खूप आवडते आणि ती खूप सुंदर आहे. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो. आईचे आभार मानण्यासाठी दरवर्षी १३ मे ला ‘मातृ दिवस’ साजरा केला जातो.