होळी सण मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Holi

प्रस्तावना

होळी हा सण भारत देशामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व सणांपैकी हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे. हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

भारत देशामध्ये राहणारे सर्व धर्माचे आणि जातीचे लोक हा सण साजरा करतात. तसेच या सणाला कोकणामध्ये शिमगा असे म्हटले जाते. होळी हा एक रंगाचा सण आहे.

होळी केव्हा साजरी करतात 

आमच्या संपूर्ण भारतामध्ये होळी हा सण हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. या होळी सणाला होळी पौर्णिमा असे सुद्धा महटले जाते.

होळी म्हणजे असत्यावर सत्याचा झालेला विजय तसेच वाईटावर चांगलेपणाचा विजय होय. होळी हा सण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी साजरा केला जातो.

होळी सणाची पौराणिक कथा

भारतामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणामागे कोणती न कोणती कथा ही जोडलेलेई असते. त्याच प्रमाणे होळी या सणाविषयी अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत. पण त्या मागील प्रचलित कथा म्हणजे – भक्त प्रल्हादाची.

फार वर्षांपूर्वी एक हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होलिका ही त्याची बहिण आणि प्रल्हाद त्याचा पुत्र होता. प्रल्हाद हा एक विष्णू भक्त होता. तो नेहमी भगवान विष्णूची पूजा करता असे. परंतु हे त्याच्या वडिलांना मान्य नव्हते. त्याचे वडील त्याला सांगायचे कि, तू मला आपला देव मान आणि माझी पूजा कर.

परंतु त्यांचे म्हणणे प्रल्हाद ऐकले नाही. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला जीवे मारण्याचा कट रचला. त्यांनी आपल्या बहिणीला सांगितले कि, तू प्रल्हाद घेऊन आगीमध्ये बस. होलिका हिला ईश्वराकडून वरदान मिळाले होते कि, ती आगीपासून जळू नाही शकत.

एके दिवशी होलिका प्रल्हाद घेऊन आगीत बसली. परंतु त्या आगीमध्ये होलिका जाळून खाक झाली आणि प्रल्हाद विष्णू भाकत असल्याने त्याचा जीव वाचला. म्हणून होळी या सणाची प्रथम सुरुवात या दिवसापासून झाली.

होळी हा सण

होळी हा सण दोन दिवसांचा सण आहे. होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते. तसेच या दिवसाला छोटी होळी असे म्हटले जाते. या दिवशी लोक होलिका दहन करून पूजा करतात.

त्याच प्रमाणे होळीचा दुसऱ्या दिवशी लहान – थोर माणसे एकमेकांना गुलाल व अबीर लावून होळी साजरी करतात.

होळी सणाची शिकवण

होळी हा सण आपल्याला अशी शिकवण देतो कि, अंधाऱ्या रात्री टिकून राहायचे असते व पहाटेच्या सूर्य किरणांची वाट बघायची असते. प्रत्येक रात्री नंतर दिवस हा येतोच. होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे.

परंतु होळीचा हा संदेश आजही तितकाच संबंधित आहे. या होळीला धार्मिक रंग दिला जातो. म्हणून होळी ही कुठल्याही धर्माची नाही तर ती सर्व मानव जातीची आहे.

विविध प्रांतात होळी हा सण

होळी हा सण संपूर्ण भारतात साजरा करतात. परंतु हा सण उत्तर भारतात जास्त प्रमाणात साजरा केला जातो.

वृंदावन, वज्र, गोकुळ या ठिकाणची होळी ही सर्वात प्रसिद्ध आहे. या ठिकाणची होळी पाहण्यासाठी देश – विदेश मधून लोक येतात. होळीच्या दिवशी वज्र येथे पुरुष महिलांना रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात.

काही ठिकाणी होळी ही फुलांनी खेळली जाते. तसेच नाच – गाण्यांसोबत एकमेकांना भेटून होळी हा सण साजरा केला जातो.

निष्कर्ष

होळी हा सण असत्यावर सत्याचा विजय झाला म्हणून साजरा केला जातो. या सणादिवशी होलिका दहन बरोबर मानावाने आपल्या वाईट विचारांचे सुद्धा दहन केले पाहिजे.

आपण सगळ्यांनी या सुंदर सणामागची शिकवण, संदेश समजून घेणे आवश्यक आहे. होळी हा एक अद्भुत सण आहे. तसेच हा सण उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे.

For any other query regarding the Marathi Essay on Holi, you can ask us by leaving your comment below.

Updated: नवम्बर 7, 2019 — 6:18 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *