gudi padwa1

गुढीपाडवा मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Gudi Padwa

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना

आमचा भारत देश हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. या देशाचे सर्व सण हे समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. या देशात सगळे भारतीय सण मोठ्या आनंदाने साजरे केले जातात.

तसेच हे सण विविध धर्माच्या आणि जातीच्या लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्यास मदत करतात. भारत देशामध्ये साजरे केले जाणाऱ्या प्रत्येक सणामागे त्याचे धामिक महत्त्व, पावित्र्य आणि इतिहास असतो.

अशाच सगळ्या सणांपैकी गुढी पाडवा हा हिंदू धर्माचा मुख्य सण आहे. हा सण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

गुढी पाडवा केव्हा साजरा करतात 

gudi padwa

गुढी पाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रा बरोबर भारतातील अनेक प्रांतामध्ये साजरा केला जातो.

तसेच हा शालिवाहन संवत्सराचा सगळ्यात पहिला दिवस होय. या चैत्र महिन्याची सुरुवात ही गुढी पाड्व्यानेच होते. या दिवसापासून रामाचे नवरात्र सुरु होते आणि राम नवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मनाला जातो.

गुढी पाडवा सणाचा इतिहास ram and ravan

असे मानले जाते कि, गुढी पाडव्याच्या दिवशी ब्रह्म देवाने विश्वाची निर्मिती केली होती. तसेच दुसऱ्या कथेनुसार गुढी पाडव्याच्या दिवशी भगवान श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आणि रावणाचा वध करून अयोध्या नगरीत परत आले होते.

त्यांचे स्वागत करण्यासाठी अयोध्येतील जनतेने गुढ्या आणि तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले होते. त्याच बरोबर गुढी पाडव्याचा तिसरा इतिहास आहे तो म्हणजे शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यसाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले होते.

त्याने या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून शाकांचा पराभव केला होता. म्हणून शालिवाहन राजाच्या नावाने जी कालगणना सुरु केली त्याला ‘शालिवाहन शक’ असे म्हटले जाते.

गुढी पाडवा हा सण कसा साजरा केला जातो गुढी पाडवा2

गुढी पाडव्याच्या दिवशी सुर्योदयानंतर गुढी उभारली जाते. ही गुढी म्हणजे एक बांबूपासून काठी तयार केली जाते. ही काठी स्वच्छ धुवून काठीच्या टोकाला तांबडे किंवा रेशमी वस्त्र व साडी गुंडाळली जाते.

त्या काठीला कडूनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून तांब्याच्या किंवा चांदीच्या धातूचा गडू बसवला जातो. तसेच गुढी लावायची जागा स्वच्छ करून एका पाटावर गुढी उभारली जाते. त्या पाटाभोवती रांगोळी काढली जाते. काठीला गंध, फुले आणि अक्षता वाहतात व त्यानंतर गुढीची पूजा केली जाते.

निरंजन आणि उदबत्ती दाखवतात. गुळ किंवा साखरेचा नैवेद्य दाखवतात. दुपारी गुढीला श्रीखंडाचा नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी सुर्यास्ता वेळी गुढी उतरली जाते.

गुढी पाडवा सणाचे सामाजिक महत्त्वगुढी पाडवा

गुढी पाडवा या सणाला हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ दिवस मानला जातो. असे मानले जाते कि, या दिवशी हातात घेतलेले काम यशस्वी होते.

तसेच यादिवशी सर्व हिंदू धर्माचे लोक आपल्या पारंपारिक पोषाखामध्ये एकत्र जमा होतात आणि एकमेकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतात. यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.

तसेच गुढी पाडव्याच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. यातून असे सूचित हिते कि, गुढी पाडव्याच्या दिवशी लोकांची मदत आणि दान धर्म करणे शुभ असते.

निष्कर्ष

गुढी पाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. हा सण प्रसन्नतेचा साज घेऊन येतो. गुढी पाडवा हा सण गोड – धोडाचा, पंचाग पूजेचा, संवत्सर फल वाचनाचा, चैत्र पालवीने नटलेला आणि वसंत ऋतूच्या आगमनाच्या उत्साहाचा दिवस आपणा सगळ्यांनी मिळून साजरा केला पाहिजे. त्याच बरोबर गुढी पाडवा हा सण विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

For any other query regarding the Marathi Essay on Gudi Padwa, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment