गणेश चतुर्थी वर निबंध – वाचा येथे Marathi Essay on Ganesh Chaturthi
By hindiscreen
प्रस्तावना
आमचा भारत देश हा सणांचा देश आहे. या भारत देशामध्ये विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. त्या सर्व सणांपैकी गणेश चतुर्थी हा सण हिंदू धर्माचा सर्वात महत्वाचा सण आहे.
हा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. असे म्हटले जाते कि, भगवान श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरले होते.
त्याच प्रमाणे असे मानले जाते कि गजमुख असेलले भगवान श्रीगणेश म्हणजेच सर्व प्रकारची बुद्धीमत्ता, ऐश्वर्य आणि सौभाग्य मिळवून देणारा देव आहे आणि शिव – पार्वतीचा पुत्र आहे.
गणेश चतुर्थी हा सण केव्हा साजरा केला जातो
गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भारत देशात आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो. हा सण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये येतो.
लोकमान्य टिळक यांनी समाजामध्ये एकोप्याची भावना टिकून राहण्यासाठी गणेश उत्सव या सणाला सुरुवात केली होती. भगवान श्री गणेश हे हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहे.
गणपतीची जन्मकथा
एके दिवशी माता पार्वती यांना स्नान करायला जायचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती तयार करून ती जिवंत केली आणि त्याला पहारेकरी नेमून आतमध्ये कोणाला येऊ द्यायचे नाही असे सांगितले.परंतु काही वेळाने तिथे भगवान शंकर आले आणि ते आत जाऊ लागले.
तेव्हा पहारेकऱ्याने त्यांना रोखले आणि संतप्त झालेल्या भगवान शंकरांनी त्याचे शीर उडवले. माता पार्वती ही स्नान करून परतल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून ती संतापली. तेव्हा महादेवांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला सांगितले कि, बाहेर जो किणी भेटेल त्याचे शीर घेऊन या असा आदेश दिला.
गण बाहेर पडल्यावर त्याला हत्ती दिसला आणि त्याचे मस्तक कापून घेऊन आला. ते हत्तीचे डोके पुतळ्याला लावून जिवंत केले.म्हणून पार्वती मातेचा पुत्र गज (हत्ती) व आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकरांचा गणाचा ईश म्हणून गणेश हे नाव पडले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चातुर्तीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
गणेशाची पूजा
महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण मुख्य म्हणजे ११ दिवसांचा असतो.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. तसेच रोज सकाळी आणि संध्याकाळी गणेश मूर्तीची पूजा आणि आरती केली जाते. त्याच बरोबर १० दिवस गणपतीला गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या १० दिवसात भजने सुद्धा गायिली जातात.
गणपतीचा ११ दिवस हा अनंत चतुर्थीचा दिवस असतो. या दिवशी गणेश मूर्तीचे तलाव, नद्या किंवा समुद्रात विसर्जन केले जाते.
भारतातील विविध राज्यात गणेश चतुर्थी
भारत देशा बरोबर विविध राज्यांमध्ये गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. जसे कि कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच विदेशात सुद्धा साजरी करतात.
हिंदू मान्यतेनुसार हा भगवान श्रीगणेश यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच राजस्थान मध्ये हा सण गणगौर या नावाने साजरा केला जातो. मुंबई आणि पुण्यामध्ये हा सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुण्यात पांच मानाचे गणपती आहेत.
प्रसिद्ध गणेश मंडळ
भव्य देखाव्यासाठी पुण्यातील हिरा बाग हे मंडळ सर्वात प्रसिद्ध आहे. तसेच मुंबईमधील लालबागचा राजा हे मंडळ सर्वात प्रसिद्ध मंडळ आहे. लालबागचा राजा हा सर्वात मानलेला गणपती आहे. या व्यतिरिक्त दगडूशेठ, बाबू गेनू, मंडई आणि जिलब्या मारुती ही मोठी गणेशा मंडळे आहेत. गणेश चतुर्थी दिवशी लाखो भक्तजण या ठिकाणी जातात.
निष्कर्ष
गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध सण आहे. तसेच आपल्यातील गणेश तत्वाला जृत करणे हीच गणेश चतुर्थी मागची खरी भावना आहे.
For any other query regarding the Marathi Essay on Ganesh Chaturthi, you can ask us by leaving your comment below.