शेतकरी मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Farmer
By hindiscreen
प्रस्तावना
आमचा भारत देश कृषिप्रधान देश आहे. या देशातील बहुतेक लोक हे गावात राहतात. भारत हा गाव – गावांचा देश आहे. गावातील लोकांचा शेती का मुख्य व्यवसाय आहे. हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे.
या शेतीवरच शेतकऱ्याचा उदर निर्वाह होतो. जर या शेतकरी बंधूने काही पिकवल नाही तर आपल्यावर उपाशी राहायची वेळ येईल. आम्ही सर्व आपले जीवन जगू शकणार नाही.
जगाचा पोशिंदा
शेतकरी हा जगाचा पोशिंदाअसतो. तो दिवसभर आपल्या शेतात राबून खूप मेहनत करतो आणि सगळ्यांसाठी धान्य पिकवतो. म्हणूनच तर म्हटले आहे कि,
“मेरे देश कि धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश कि धरती”
यासारख्या ओळी ओठांवर येतात. जर शेतकरी सुखी असेल तर हे जग सुखी राहील. त्याच बरोबर “जिथे राबती हाथ तेथे हरी” अशी शेतीच्या महतीची वचने आपण कौतुकाने लिहतो, बोलतो आणि ऐकतो. तसेच लाल बहादूर शास्त्री यांनी म्हटले आहे “जय जवान, जय किसान.” म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवितो.
शेतीची प्रथम सुरुवात
मानवाने सगळ्यात प्रथम जेव्हा शेतीची सुरुवात केली तेव्हा डोंगर – टेकड्यांवर लाकडाच्या साहाय्याने शेती करीन धान्याची निर्मिती केली.
त्यानंतर मानव एका जागी मानव स्थिर झाला आणि अधिक प्रमाणात क्षेत्रावरशेती करण्यास सुरुवात केली. कालांतराने भारत देशामध्ये हरित क्रांती झाली आणि देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये मोठे बदल झाले. अन्न – धान्याची उत्पादन क्षमटा वाढली.
परंतु त्या काळी उत्पादित केलेले धन्य साठवून ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे धान्याची नासाडी होत होती. त्याच बरोबर गरीबांना धान्य ही मिळत नव्हते.परंतु त्याला कधी – कधी अन्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो.
विविध साधन यंत्रे विकसित
आज शेतकऱ्याला शेती करण्यासाठी कृषीची विविध साधने विकसित झाली आहेत. या यंत्रांमुळे शेतकऱ्याला शेती करणे सोपे जात आहे.
तसेच अन्य प्रकारची बी – बियाणे सुद्धा उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे पिकांचे प्रमाण वाढले आहे. त्याच बरोबर मानवाचे शारीरिक कष्ट सुद्धा कमी झाले आहेत.
या सगळ्याचा फायदा श्रीमंत लोकच करू शकतात. कारण गरीब शेतकऱ्यांकडे शेतीची सामग्री खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध नसतो.
शेतकऱ्यांना सवलती
भारत सरकारने स्वातंत्रोत्तर काळात अनेक सवलती देऊ केल्या. तसेच त्यांना आयकरातून शेती उत्पादनाला सवलत देण्यात आली. त्याच बरोबर त्यांना काही कारणांसाठी कर्जे दिली जातात आणि प्रसंगी ती माफही केली जातात.
परंतु आजही शेतकऱ्याच्या परिस्थितीत बदल झालेला नाही. काही शेतकरी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करू लागला आहे.
शेतकऱ्याच्या जीवनात बदल
आज देशात शेतीची सर्व साधन सामग्री उपलब्ध असून सुद्धा शेतकऱ्याच्या जीवनात बदल झालेला नाही. शेतकरी एवढे कष्ट आणि अंग मेहनत करून त्याच्या कष्टाला मोल राहत नाही.
असा हा शेतकरी नेहमी खचला जातो. परंतु कष्ट न करता व्यापारी आणि दलाल शेतकऱ्याला लुबाडत असतात. त्याच बरोबर त्याच्या मालाला कमी किमतीत खरेदी करून शेतकऱ्याला नाराज केले जाते. त्याच्या कष्टला किमत राहत नाही.
शेती मुख्य आधार
शेतकऱ्याचा शेती हा मुख्य आधार आहे. शेती ही संपूर्ण पणे पाण्यावर अवलंबून असते. जर शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असेल तरच शेती चांगल्या प्रकारे होते. या शेतीवरच शेतकऱ्याचे जीवन अवलंबून आहे आणि त्याच्या जीवनाचा मुख्य आधार आहे.
निष्कर्ष
आपण सर्वांनी मिळून शेतकऱ्याचे जीवन सुखी होण्यासाठी शेतकऱ्याला सहकार्य केले पाहिजे. तसेच शेतकरी बांधवाचे दु:ख जाणून घेतले पाहिजे.
कारण जर हा शेतकरी सुखी तर जगातील सर्व लोक सुखी राहतील. तसेच शेतकऱ्या प्रमाणेच या धरतीला सुजलाम – सुफलाम बनवण्यासाठी परिसरात एक तरी झाड लावले पाहिजे.
For any other query regarding the Marathi Essay on Farmer, you can ask us by leaving your comment below.