डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निबंध – वाचा येथे Marathi Essay on Dr. Sarvepalli Radhakrishnan

Photo of author

By hindiscreen

 

प्रस्तावना

भारत देश हा महान पुरुषांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत भूमीवर अनेक महान पुरुषांचा जन्म आहे. त्या सर्वांपैकी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान पुरुष होते. तसेच भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ होते.

तसेच ते आपल्या थोर कार्यांसाठी ओळखले जातात. त्यांचा जन्म दिवस हा संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

जन्म Dr. Sarvepalli Radhakrishnan

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९८८ साली आंध्रप्रदेश मधील तिरुतानी  या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विरास्वामी आणि आईचे नाव सिताम्मा असे होते.

शिक्षणडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार प्रदान

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावी पूर्ण केले. तसेच त्यांनी लाठुराम मिशन स्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर ते उच्च माध्यमिक शिक्ष घेण्यासाठी मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये गेले. त्यांनी तत्वज्ञान हा विषय घेऊन त्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी एम. ए करण्यासाठी नीतिशास्त्र हा विषय घेतला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मद्रास मधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून सन १९१७ पर्यंत कार्य केले.

अन्य पदांवर कार्यडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रसिद्ध पुस्तके

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सन १९३१ ते १९३९ साली राष्ट्रसंघात भारत देशाचे प्रतिनिधित्व केले. तसेच सन १९४९ ते १९५२ मध्ये भारत सरकारने रशियातील राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केली.

त्यांनी भारत देशात सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी सन १९५२ मध्ये भारत देशात परत आल्यावर सन १९५२ ते १९६२ पर्यंत प्रथम उपराष्ट्रपती पदावर कार्य केले.

त्याच बरोबर त्यांना भारताचे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता. १३ मे, १९६२ साली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची राष्ट्रपती पदासाठी निवड करण्यात आली.

कार्यडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन उनका कार्य

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी धर्म आणि तत्वज्ञान या दोन्ही विषयावर अभ्यास केला होता. तसेच स्वतंत्र भारत देशाला शिक्षण विषयक धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. म्हणून सन १९४८ साली भारत सरकारने पहिला शिक्षण आयोग सुरु केला.

त्यासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी अनेक लेखनही केले आहे व त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ गाजले आहेत. त्याच बरोबर भारतीय धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारे ग्रंथ सुद्धा आहेत. त्यांनी शिक्षक हा कसा असावा व त्याचे गुण कसे असावेत. याचे उदाहरण दिले आहे.

आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे. आपले चांगले विचार दुसऱ्याला सांगावेत. तसेच शिक्षण क्षेत्रात गुण – दोष पाहून त्यावर मात करता येईल असे लक्ष ठेवावे. म्हणजेच एक आदर्श शिक्षक बनता येईल असा संदेश दिला.

शिक्षक दिनडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 1

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस हा संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस यासाठी साजरा केला जातो ते म्हणजे शिक्षकांचा सम्मान करण्यासाठी याच उद्देशाने.

या शाळेतील जीवनातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. गुरुजनाच्या संबंधी आपण आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

पुरस्कार प्रदानडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना उत्कृष्ट कार्य केल्यामुळे आणि कर्तुत्वामुळे सन १९५८ साली भारताच्या सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले. तसेच त्यांना सन १९३१ साली इंग्लंडने ‘सर’ ही मनाची पदवी बहाल केली.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशासाठी महान कार्य केले. आपल्या महान कार्यातून देशाची सेवा केल्यावर १७ एप्रिल, १९७५ साली त्यांचा मृत्यू झाला.

निष्कर्ष

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्वात प्रसिद्ध शिक्षक, आदर्शवादी व एक लेखक सुद्धा होते. ते एक महान व्यक्ती होते ज्यांना आम्ही सर्व शिक्षक दिनाच्या दिवशी स्मरण (आठवण) करतो.

For any other query regarding the Marathi Essay on Dr. Sarvepalli Radhakrishnan, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment