डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वर निबंध – वाचा येथे Marathi Essay on Dr. Babasaheb Ambedkar

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना

भारत ही एक पवित्र भूमी आहे. या भारत सारख्या पवित्र भूमीवर अनेक महान पुरुषांनी जन्म घेऊन या देशासाठी आणि समाजासाठी दिन – रात्र एक करून देशकार्य केले आहे.

त्यांनी आपल्या देशासाठी आपले संपूर्ण जीवन त्याग केले आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे कार्य केले आहे.

त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक आणि दिशा दर्शक व प्रेरणादायक ठरला आहे. या सर्वांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आदराने आणि साम्मान्पुर्वक घेतले जाते.

जन्मडॉ. बाबासाहेब आंबेडकर1

आमच्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी मध्य प्रदेशातील इंदौर जिल्यामधील महू या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर असे होते.

त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांच्या वडिलांना वाचनाची भरपूर आवड होती. तसेच ते आपल्या मुलांना चांगली पुस्तके वाचण्यास आणून देत असत.

शिक्षणडॉ. बाबासाहेब आंबेडकर5

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मराठी परिवाराशी संबंधित होते. ते महार जातीतील असल्यामुळे त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक भेदभाव केला जात असे. त्यांचे वडील आर्मीत असल्यामुळे मुलांना शिक्षणात मिळणाऱ्या विशेष अधिकारांचा फायदा झाला.

परंतु ते दलित असल्याने त्यांना शिक्षण घेताना फार संघर्ष करावा लागला. त्यांना विद्यार्थ्यांसोबत वर्गात बसण्याची आणि शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भरपूर अन्याय सहन करावा लागत असे.

त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले. त्यांनी सन १९०७ साली मॅट्रिकची डिग्री मिळवली. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून सन १९१५ साली मास्टर डिग्री प्राप्त केली. तसेच त्यांनी आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, लंडन विद्यापीठ या संस्थांमधून पूर्ण केले.

भारतीय संविधानाचे जनक किंवा शिल्पकारडॉ. बाबासाहेब आंबेडकर4

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार केले. या संविधान मागचा मुख्य उद्देश होता कि, देशातील जातीपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला समाप्त करणे. तसेच अस्पृश्य मुक्त समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देणे हा होता.

या भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला.

अस्पृश्तेला संपूर्ण पणे नष्ट केले.

तसेच महिलांना अधिकार मिळवून दिले.

त्याच बरोबर समाजात असलेल्या जाती आणि धर्म भेदभावाला संपवले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधान तयार करण्यासाठी २ वर्ष ११ महिने आणि ७ दिवसांचा कालावधी लागला. त्यांनी २६ नोव्हेंबर, १९४९ ला भारतीय संविधान तयार करून तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करत देशातील नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि स्वाभिमानी व्यक्तीची जीवन पद्धतीने भारतीय संस्कृतीला गौरविण्यात आले. म्हणून त्यांना ‘भारतीय संविधानाचा जनक व शिल्पकार’ असे म्हटले जाते.

महाडचा सत्याग्रहडॉ. बाबासाहेब आंबेडकर3

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरनी सन १९२७ साली अस्पृश्यते विरुद्ध जागृत चळवळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी दलित लोकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी आणि हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चालवली आणि मोर्चे काढण्यास सुरु केले.

त्यावेळी समाजात दलित लोकांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा आणि पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी दलित लोकांना अधिकार मिळवून देण्यासाठी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला.

बौद्ध धर्माचा स्वीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सन १९५० साली श्रीलंकेत एका बौद्ध संमेलनात सहभागी झाले. तिथे जाऊन ते बौद्ध धर्मातील विचारांनी प्रभावित झाले.

त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बौद्ध धर्माविषयी बरीच पुस्तके लिहिली. तसेच त्यांनी सन १९५५ ला बौद्ध महासभेची स्थापना केली.

निष्कर्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा या महामानवाने देशासाठी आणि समाजासाठी अन्य कार्य केले आहेत. आज समाजात दलित वर्गाला जे स्थान प्राप्त झाले आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. म्हणून त्यांना दलितांचा उद्धारकर्ता म्हणून ओळखले जाते. म्हणून म्हटले जाते कि,

            “देशप्रेमापुढे ज्यांनी स्वतःच्या जीवनाचा त्याग केला

               माणसाला स्वाभिमाना शिकवला,

             ज्यांनी आम्हाला संकटांशी सामना करणे शिकवले

                 असा या आकाशात एकमेव तारा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर”.

For any other query regarding the Marathi Essay on Dr. Babasaheb Ambedkar, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment