अब्दुल कलाम3

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम वर निबंध – वाचा येथे Marathi Essay on Dr. APJ Abdul Kalam

Photo of author

By hindiscreen

प्रस्तावना

या भारत भूमीवर अनेक महान नेत्यांचा जन्म झाला आहे. ही मातृभूमी थोर नेत्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यापैकी सर्वांपैकी डॉ. ए पी जे अब्दुल कलाम हे, एक वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक आणि भारत देशाचे राष्ट्रपती होते.

हे आपल्या कार्य पद्धतीमुळे देशात लोकांचे राष्ट्रपती म्हणून प्रसिद्ध झाले होते. यांनी आपल्या कार्यकाळात देशासाठी अनेक कार्य केले आहेत. त्यांनी राष्ट्रपती पदाच्या पांच वर्षाच्या काळात भारतीयांच्या मनात मनाचे स्थान निर्माण केले आहे.

अब्दुल कलाम यांचा जन्मएपीजे अब्दुल कलाम

काळा रंग हा भावनात्मक दृष्टीच्या हेतूने वाईट असतो मात्र जेव्हा काळा फलक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला उज्जवल करतो, असे महान उद्गार सांगणारे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी तामिळनाडू येथील रामेश्वरम येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला.

त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकिर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाबदिन कलाम असे होते. त्यांचे वडील हे व्यवसायाने नावाडी होते.

शिक्षणअब्दुल कलाम

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना लहान पणापासूनच वाचनाची आवड होती. अब्दुल कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुर मला पूर्ण केले. परंतु लहान वयातच त्यांनी वडिलांचे छत्र गमावले.

त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कलाम यांच्यावर आली. त्यांनी गावात वर्तमानपत्रे विकून आणि लहान मोठी कामे करून पैसे कमावत असत व घरी मदत करत असत. त्यांचे लहानपण हे भरपूर कष्ट गेले.

शाळेत असताना त्यांना गणित या विषयात विशेष रुची होती. नंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला झाले. तेथे बी.एस्‌‍सी झाल्यानंतर त्यांनी “मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत” प्रवेश घेतला.

परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्या बहिणीने आपले स्वतचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्यांनी डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संस्थेत एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

अब्दुल कलाम यांचे कार्य अब्दुल कलाम उनका जीवन

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी भारतीय अणु संशोधन, अवकाश तंत्रज्ञान आणि संरक्षण विभागात आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवला.

त्यांनी पोखरण येथी अणु चाचणी आणि अवकाश तंत्रज्ञानात स्वदेशी बनावटीचा उपग्रह बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच अब्दुल कलाम यांनी सुरक्षा विभागात बनावट मिसाइल बनवण्यात फार मोठा वाटा आहे. म्हणून त्यांना ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते.

त्यांना असे वाटायचे कि यान, उपग्रह मिसाइल हे संपूर्णपणे बनावट स्वरूपाचे असावे. कारण त्यामुळे देश स्वयंपूर्ण बनेल. या सर्वामधून त्यांना देश बद्दल असेलेली देशभक्ती आणि देशप्रेम दिसून येते.

पुरस्काराने सन्मानितअब्दुल कलाम

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. जसे कि, त्यांना सन १९८१ साली पद्मभूषण, सन १९९० मध्ये पद्मविभूषण आणि सन १९९८ मध्ये भारताच्या सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केले गेले. कलाम यांना देश – विदेशातील एकूण १९ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

प्रसिद्ध पुस्तकेअब्दुल कलाम1

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे स्वप्न होते कि, भारत देश २०२० साली महासत्ता बनेल. असा त्यांचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी इंडिया २०२० आणि व्हिजन २०२० हे पुस्तक लिहिले.

या पुस्तकातून तरुणांना संदेश दिला. त्याचबरोबर त्यांनी अग्निपंख हे आत्मचरित्र लिहिले. तसेच त्यांनी मिशन इंडिया आणि प्रज्वलित मने ही पुस्तके सुद्धा लिहिली. त्यांचे लिखाण तरुण वर्गाला मार्गदर्शन करत आहे.

निष्कर्ष

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम हे असे नेता होते, ज्यांनी देशाला अवकाश क्षेत्रात पुढे नेण्याचे कार्य केले, मिसाइल आणि शस्त्रास्त्र मध्ये स्वयंपूर्ण बनवले, तरुण – युवकांना देशकार्यासाठी जोडणारे आणि विद्यार्थ्यांसोबत रमणारे व त्यांना मार्ग दाखवणारे असे कलाम होते. अशा या महान नेत्याला माझा प्रणाम.

For any other query regarding the Marathi Essay on Dr. APJ Abdul Kalam, you can ask us by leaving your comment below.

Leave a Comment