कुत्रा वर मराठी निबंध – वाचा येथे Marathi Essay on Dog

प्रस्तावना

आमच्या भारत देशामध्ये अन्य प्रकारचे प्राणी सापडतात. त्या सर्व प्राण्यांपैकी एक आहे तो म्हणजे – कुत्रा.

कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. तसेच पाळीव प्राण्यांपैकी सर्वात लोकप्रिय प्राणी आहे. काही लोक कुत्र्याला आपल्या घरी नेऊन पाळतात.

कुत्रा माणसांची खूप मदत करतो. हा एक इमानदार प्राणी आहे. तसाच माणसाचा खरा मित्र सुद्धा मानला जातो.

कुत्र्याचा इतिहास

प्राचीन काळापासून कुत्रा हा प्राणी मनुष्याच्या सानिध्यात राहिला. वैदिक वाड्मयात सुद्धा कुत्र्याचे उल्लेख आढळतात.

परंतु वेद काळात कुत्रा हा प्राणी काही कारणांमुळे अशुभ मानला जात असे. पण कुत्र्याला श्री दत्तगुरूंच्या सान्निध्यात सर्वात मोठे स्थान मिळाले आहे.

कुत्रा प्राण्यांची शरीररचना

कुत्र्याला चार पाय आणि दोन डोळे असतात. तसेच एक शेपूट सुद्धा असते. कुत्र्यांचे आयुष्यमान हे १० ते १४ वर्ष असते. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अधिक असते. कुत्र्याच्या पुढील पायाला पाच आणि मागील पायाला चार नखे असतात.

कुत्रा हा प्राणी २४ मीटर अंतरावरील आवाज स्पष्ट ऐकू शकतो. त्यांची नजर तीक्ष्ण असते. पण त्याची रंग ओळखण्याची क्षमता कमी असते.

कुत्रा हा प्राणी चांगल्या प्रकारे पोहू शकतो. परंतु त्याला झाडावर चढता येत नाही. त्यांचा पळण्याचा वेग सरसरी ताशी एकोणीस मैल आहे.

कुत्र्याचा उपयोग

कुत्रा हा एक इमानदार प्राणी असून त्याचा उपयोग घराची राखण करण्यासाठी, संरक्षणासाठी, शिकार करण्यासाठी तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी केला जातो.

तसेच काही प्रशिक्षित कुत्रे आंधळ्या व्यक्तींना, आजारी व्यक्तींना मदत करतात. हाऊंड जातीचे कुत्रे अनेक तासानंतर वासाने शिकाराचा शोध घेतात. तसेच बर्फाळ प्रदेशात कुत्र्यांचा उपयोग स्लेज गाडी ओढण्यासाठी केला जातो.

कुत्र्यांच्या प्रजाती

संपूर्ण जगात कुत्र्यांच्या सुमारे ४०० हून अधिक प्रजाती आढळतात. ग्रेहाउंड, जर्मन शेपर्ड, अल्सेशियन, बुलटेरिअर, पोमेरेनियन इ. काही प्रसिद्ध पाळीव कुत्र्यांच्या प्रजाती आहे.

कुत्रा हा प्राणी नेहमी आपली जीभ बाहेर ठेवतो व जीभेवरील लाळेच्या बाष्पी भवनामुळे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

संवेदनशील

कुत्रा हा प्राणी त्यांच्या क्षेत्राबद्दल खूप संवेदनशील असतो. त्या ठिकाणी कोणी अनोळखी व्यक्ती आल्यास तथा इतर कुत्र्यांचा प्रवेश त्यांना सहन नाही होत. ते जोर – जोराने भूकू लागतात. तसेच गुरगुरणे, भुंकणे आणि अंगावर धावून जाणे अशा प्रकारे व्यक्त करतात.

सस्तन प्राणी

कुत्रा हा एक सस्तन प्राणी आहे. म्हणून कुत्र्याची मादी ही एका वेळेस ८ ते १० पिल्लांना जन्म देते. ही पिल्ले जन्मत: असहाय असते. तेव्हा मादी त्यांची काळजी घेते.

त्या पिल्लांचे डोळे लगबग २१ दिवस बंद असतात. उभे कान असलेले पिल्लू आक्रमक कुत्रा बनते आणि खाली पडलेले कान असलेले पिल्लू सहसा तुलनेत सौम्य स्वभावाचे असते.

काही कुत्रे हे मांसाहारी असतात तर काही कुत्रे हे शाकाहारी असतात. परंतु मांसाहारी कुत्रे जास्त आक्रमक असतात.

निष्कर्ष

कुत्रा हा एक पाळीव प्राणी असून मानवाचा एक चांगला मित्र सुद्धा आहे. म्हणून काही लोकांना कुत्रा पाळायला आवडतो.

For any other query regarding the Marathi Essay on Dog, you can ask us by leaving your comment below.

Updated: नवम्बर 6, 2019 — 6:59 पूर्वाह्न

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *