प्रस्तावना:
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आईचे स्थान हे खूप महत्वाचे असते. कारण कोणतीही व्यक्ती आईशिवाय आपले जीवन जगू शकत नाही. आई ही एक ईश्वराची एक सुंदर निर्मिती आहे.
ईश्वराने आईला यासाठी बनवलं आहे की, ईश्वर हा प्रत्येक मुलासोबत नाही राहू शकत. म्हणून त्याने आईला बनवलं आहे. आई हा शब्द खूप सोपा आहे.
परंतु या शब्दामागे अपरंपार माया दडली आहे. आई या शब्दात संपूर्ण जगच सामावलेले आहे. म्हणून स्वामी विवेकानंद यांच “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” हे वाक्य अगदी खर आहे.
आपल्या जवळ खूप धन आहे. परंतु जर डोक्यावर मायेन हात फिरवणारी आईच जर नसेल तर आपले जीवन व्यर्थ आहे.
माझी आई
त्या सर्वांसारखी माझी आईसुद्धा एक सामान्य व्यक्ती आहे. माझ्या आईचे नाव अंजली असे आहे. तिचे वय ४० वर्ष आहे. माझी आई ही माझ्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. माझ्या आईचा स्वभाव अत्यंत सरळ आणि शांत आहे.
माझी आई केवळ मेहनतीचं नव्हे तर ती आपल्या कामांसाठी समर्पित सुद्धा आहे. माझी आई सूर्योदय होण्यापूर्वीच उठते आणि तिचे दैनंदिन कार्य सुरु होते. माझी आई खूप सुंदर आणि दयाळू सुद्धा आहे.
माझी आई माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेते. माझी आई नेहमी सर्वांसाठी जेवण बनवते. माझी आई प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनुसार पदार्थ बनवून खायला घालते.
तसेच ती माझ्या रोजच्या कामात मदत करते. माझ्या आईने कुटुंबामध्ये एक वेगळीच भूमिका निभावली आहे. जर कोणी कुटुंबामध्ये आजारी पडले तर त्याची काळजी करते आणि देखभाल सुद्धा करते.
शिक्षकाची भूमिका
माझी आई माझ्या आयुष्यामध्ये महत्वाची भूमिका निभावते. तिने मला पावलोपवी योग्य मार्गदर्शन केले आहे. माझी आई मला गृहकार्य करण्यास मदत करते. तसेच ती मला सर्व उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करते.
माझी आई मला नेहमी योग्य मार्ग दाखवते. ती मला जीवनाचे नैतिक मूल्य शिकवते. कधी – कधी जर मी अभ्यास करताना अडकलो तर ती एक शिक्षकांची भूमिका निभावते. माझी प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी माझी मदत करते.
कुटुंबासाठी एक वृक्ष
मी माझ्या आईच्या नैतिक शिक्षणात वाढलो. तिने मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केले आहे आणि माझ्या वाईट काळात माझा आधार बनून राहिली आहे. माझी आई मला शिस्तबद्द, विश्वासार्ह व्यक्ती म्हणून शिकवते.
माझी ही माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी एका वृक्षाप्रमाणे आहे. ज्या प्रमाणे एक वृक्ष छाया प्रदान करतो. त्याच प्रमाणे माझी आईसुद्धा आम्हाला छाया देते.
माझ्यासाठी प्रेरणास्रोत
माझी आई ही माझ्यासारही एक प्रेरणा आहे. माझ्या आईने मला माझ्या जीवनात खूप प्रभावित केले आहे. प्रेमाच्या आणि काळजीच्या बाबतीत माझ्या आईची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही. माझी आई ही माझ्यासाठी एक गुरु आणि मित्राप्रमाणे आहे.
ममतेचा सागर
आई ही एक ममतेचा सागर आहे. आपल्यावर संसार करण्यात आईचा सर्वात मोठा आणि महत्वाचा वाटा आहे. कारण ती आपल्या मुलांना चांगले संस्कार देते.
म्हणून आईची तुलना ही जगात कोणाशी करता येणार नाही. अशी आपली आई असते. तसेच माझ्यासाठी माझी आई ही सर्वकाही आहे. त्याच प्रमाणे ती माझा देव सुद्धा आहे.
निष्कर्ष:
मला माझ्या आईसोबत नेहमी सावली प्रमाणे उभे राहायचे आहे. कारण आज तिच्यामुळे मी हे सुंदर जग पाहू शकलो. म्हणून मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आईची सेवा करू इच्छितो.
तसेच मला माझी आई सर्वात प्रिय आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मला माझी आई खूप – खूप आवडते. आपल्या देशात आईचे आभार मानण्यासाठी १३ मे या दिवशी मातृ दिवस साजरा केला जातो.