प्रस्तावना:
आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये पाण्याचे सर्वत मोठे स्थान आहे. कारण कोणताही सजीव म्हणजेच मानव असू दे किंवा पक्षी – प्राणी असू दे. कोणीही सजीव या पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. मानव एक वेळ अन्नाशिवाय जगू शकतो.
परंतु पाण्याशिवाय एक दिवस सुद्धा जगू शकत नाही. मानवी जीवन हे संपूर्णपणे पाण्यावरच अवलंबून आहे. म्हणून पाणी हेच जीवन आहे असे म्हटले आहे. म्हणून पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी व धरतीवरील पाणी साठवून ठेवण्यासाठी पाऊस खूप महत्वाचा आहे.
या पृथ्वीवरील गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे – पाऊस होय. जर एकदा असे झाले की, सर्व सजीव सृष्टीला आवश्यक असणारा हा पाऊस पडलाच नाही तर ? जर हा पाऊस पडलाच नाही तर मानव आणि इतर सजीवांचे जीवन कोलमडून जाईल.
कृषिप्रधान देश
आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश आहे. तसेच हा गावा – गावांचा देश आहे. या देशातील बहुतेक लोक हे गावात राहतात आणि शेती हा व्यवसाय करतात. भारत देशातील संपूर्ण शेती ही पाण्यावरच अवलंबून असते.
शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन हे पाण्यावर अवलंबून असते. कारण शेतकरी भर उन्हाळयात आपल्या जमिनीची मशागत करून ठेवतात आणि चातक पक्षासारखी पावसाची आतुरतेने वाट बघत असतात.
जर या भागामध्ये पाऊसच पडला नाही तर त्या भागात दुष्काळ पडू शकतो. त्याच बरोबर मानवाला आपले जीवन जगणे सुद्धा कठीण होऊन जाईल. कारण शेतकरी लोक हे मुख्यतः शेतीवरच अवलंबून असतात आणि आपली आजीविका चालवितात.
जर त्यांना शेती करण्यास वेळेवर पाऊस पडला नाही तर त्यांच्या पुढे अनेक समस्या निर्माण होतील. त्यांना अन्नाच्या सोबत आपली तहान भागवणे सुद्धा कठीण होऊन जाईल.
पाण्याचे स्रोत
नदी – नाले, समुद्र, तलाव, विहिरी, सरोवरे हे सर्व पाण्याचे स्रोत आहेत. जर पाऊसच पडला नाही तर नद्या – नाल्यांमध्ये, तलावांमध्ये आणि विहिरींमध्ये पाणी कुठून येणार ?
जर हा पाऊस पडला नाही तर सर्व पाण्याचे स्रोत ओस पडून जातील. मानव आणि इतर पशु – पक्षी यांना पाणी मिळणार नाही व त्यांना नाईक यातना सोसाव्या लागतील. जर हा पाऊस नाही तर मानवी जीवन सुद्धा नाही.
जमिनीची भूजल पातळी
जर पाऊस पडला नाही तर जमिनीमध्ये पाणी मुरणार नाही. जमिनीतील भूजलाची पातळी लवकरच संपून जाईल. जमिनीत पाणी नसेल तर त्या जमिनीला भेगा पडतील.
तसेच या धरतीवरील सर्व झाडे ही बिना पाण्याशिवाय मरून जातील. कारण झाडे ही आपल्या मुळांमधून जमिनीतील पाणी शोषून घेतात आणि शाखांपर्यंत पोहचवतात.
तसेच वनस्पतींवर राहणारे आपले जीवन जगणारे सर्व पक्षी – प्राणी हे अन्नाशिवाय आणि पाण्याशिवाय मरून जातील.
संपूर्ण जीवनचं नष्ट होऊन जाईल. पृथ्वी हा ग्रह इतर ग्रहांप्रमाणे एक मातीचा निर्जीव गोळा बनून जाईल. अकासातून सुंदर निळी – हिरवी दिसणारी पृथ्वी वेगळीच दिसू लागेल.
कवींना प्रेरणा
पाऊस पडताच मोर आपला सुंदर आणि रंगीबिरंगी पिसारा फुलवून नाचू लागतो. कोकिळा कुहू – कुहू असे बोल बोलून गाणे गायला लागते. जर हा पाऊस पडलाच नाही तर मोर नाचताना दिसणार नाही व कोकिळा गाणे सुद्धा गाणार नाही.
या पावसावर कविता करणारे कवी यांना कविता लिहायला प्रेरणा मिळणार नाही. तसेच लहान मुलांना पावसाळ्यात इंद्रधनुष्य पाहायला मिळणार नाही. त्याच बरोबर पाणी हे सर्वात अनमोल काम करते ते म्हणजे – वीजनिर्मिती.
जर हा पशु पडलाच नाही तर वीजनिर्मिती सुद्धा होणार नाही. म्हणून ज्या – ज्या ठिकाणी विजेचा वापर केला जातो. ती सर्व ठिकाणे बंद पडतील. जसे की उद्योग, कारखाने, हॉस्पिटल, शाळा व महाविद्यालय.
निष्कर्ष:
जर हा पाऊसच पडला नाही तर आपली धरणीमाता ही सुकून ओसाड पडेल. म्हणून पाऊस पाडण्यासाठी आपण सर्वानी निसर्गाचे रक्षण केले पाहिजे.
तसेच वेळेवर पाऊस पडण्यासाठी जास्तीत – जास्त झडे लावून या धरणीमातेला सुजलाम – सुफलाम बनवल पाहिजे. आपण सर्वानी पाणी हे जपून वापरले पाहिजे.